रविवार, १७ जानेवारी, २०२१

महत्वाची नाटके लिंक

*सर्व नामांकित नाटकं पाठवत आहे.* 
*रोज एक नाटक पहा.* 
*भरभरून आनंद लुटा आणि* 
*आपल्या मराठी भाषेला समृद्ध करा*...



• सुंदर मी होणार
https://youtu.be/L0BD4s5FQgM

• हसवा फसवी
https://youtu.be/v4-MqXYJq6o

• बटाट्याची चाळ
https://youtu.be/5i1xaSZeyOM

• श्रीमंत दामोदर पंत
https://youtu.be/U7350LnlKCk

• शांतता ! कोर्ट चालु आहे
https://youtu.be/QG_Pi051qao

• नटसम्राट
https://youtu.be/yTFPT7-v-Ws

• ती फुलराणी
https://youtu.be/PLHfek5SO_Q

• तो मी नव्हेच
https://youtu.be/8TAToq08YuQ

• पती सगळे उचापती
https://youtu.be/6IZXCmrE09s

• मोरुची मावशी
https://youtu.be/eCOeRK9N7QM

• एका लग्नाची गोष्ट
https://youtu.be/JZl_zwm_IPI

• गेला माधव कुणीकडे
https://youtu.be/1gEZ0WePqV4

• तुझे आहे तुजपाशी
https://youtu.be/sTZGYKAWc_4

• असा मी असामी
https://youtu.be/S38SOv4f95w

• शांतेच कार्ट चालु आहे
https://youtu.be/twOnQ3JCTxE

• श्री तशी सौ
https://youtu.be/N4pwOnoY7zY

• वासु ची सासू
https://youtu.be/-m3iruEQoJE

• अखेरचा सवाल
https://youtu.be/DmuCU9Y33sg

• शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही
Part 1 - https://youtu.be/07R2IFyyJ9E
Part 2 - https://youtu.be/GsOOVwUmqx8

• चल कहितरीच काय
https://youtu.be/blOdn2nbDgw

• चार दिवस प्रेमाचे
https://youtu.be/PD-mBpCvTAw

• मी नथुराम गोडसे बोलतोय
https://youtu.be/PD-mBpCvTAw

• कुर्यात सदा टिंगलम
https://youtu.be/LHBWfTRQvvo

• तुझ्या माझ्यात
https://youtu.be/94YChmH9GYo

• खर सांगायच तर
https://youtu.be/uMJ9gA2TFrM

• सखाराम बाईंडर
https://youtu.be/NIMIgL-OLXc

• कुसूम मनोहर लेले
https://youtu.be/2AH8SgZ2qSI

• अशी पाखरे येती
https://youtu.be/kqo2tjug3AU

• सेलीब्रेशन
https://youtu.be/dR6r75iUGXE

• अप्पा आणी बाप्पा
https://youtu.be/2z4ndcpOLJU

• कार्टि काळजात घुसली
https://youtu.be/p_FgFnDnFGc

• बॅरिसटर
https://youtu.be/ZW73zW21eXQ

• मित्र
https://youtu.be/tKpPpGWJTzw

• अश्रूंची झाली फुले
https://youtu.be/5HZYa1s1OXo

• डाॅक्टर तुम्हीसुद्धा
https://youtu.be/SVY0mq7FO1Y

• डबल गेम
https://youtu.be/v3EFucCuMdM

• सूर राहु दे
https://youtu.be/ZeT8mqNDkss

• गोड गुलाबी
https://youtu.be/XZ5pC8x8nQY

• अधांतर
https://youtu.be/ECwRnB8n2z4

• नातीगोती
https://youtu.be/F7dlUMpA5JU

• गाभण
https://youtu.be/LqQWHhxVaK4

रविवार, ३ जानेवारी, २०२१

बोटीचा अपघात व एक जोडपे कथा

एक छानशी कथा

एका प्रवासी बोटीचा भर समुद्रात अपघात होतो.

त्याच बोटीवर एक 
जोडप (पती-पत्नी) प्रवास करत असतात. 

ते दोघेही एकमेकांचे जीव की प्राण असतात. बोटीच्या अपघातामुळे ते एकमेकांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात. 

त्यांची नजर आधारासाठी काहीतरी शोधण्यासाठी चहूकडे भीरभीरत असते. 

आणि अचानक त्यांना एक जीवरक्षक बोट दिसते. 

एका म्हणीत म्हटलेल आहे की, 

"डुबत्याला काठीचा आधार"

अगदी तसच होते, ते दोघेही जिवाच्या आकांतान त्या जीवरक्षक बोटीजवळ येतात.

परंतु त्यांची घोर निराशा होते.  त्यांना दिसत की, बोटीत फक्त एकच जागा शिल्लक आहे. 

पती, पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो. 

पत्नी बुडत्या बोटी वर थांबते.

बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगण्यांचा प्रयत्न करते. 

शिक्षक गोष्ट सांगायचे थांबवतात. 

वर्गात निरव शांतता 

वर्गातील प्रत्तेक विद्यार्थी अगदी मन लावून तल्लीन होवून गोष्ट ऐकण्यात गुंग झालेला असतो. 

अनपेक्षितपणे शिक्षकांनी गोष्ट सांगायची का थांबवली हा प्रत्तेकालाच प्रश्न पडलेला असतो. आणि तेवढ्यात शिक्षक  वर्गातील मुलांना विचारतात की, 
 
पत्नी पतीला काय म्हणाली असेल?

बहुतेक विद्यार्थी तर्क करुन सांगतात की, पत्नी पतीला म्हणाली असेल, 

'मला तुम्ही धोका दिलात, मी तुम्हाला ओळखलेच नाही, तुम्ही स्वार्थी आहात..!'

प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपआपली मते मांडली. तेवढ्यात शिक्षकांचे एका विद्यार्थ्याकडे लक्ष जाते. 
 
एक मुलगा मात्र गप्पच असतो.
शिक्षक त्याला विचारतात, "अरे, तुला काय वाटते ते पण सांग!"

तो मुलगा म्हणतो, 

"गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल, मुलांना सांभाळा..!"

शिक्षक चकित होउन विचारतात, "तुला ही गोष्ट माहीत आहे का?"

तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, "नाही गुरुजी, मला माहित नाही". पण; माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!"

"तुझे उत्तर बरोबर आहे!"
शिक्षक हलकेच म्हणाले.
बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केल.

खूप वर्षानंतर, वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले तेंव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या मुलीला एक डायरी सापडते.

त्यातून असे समजते की, तीच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो. 

आणि ती त्यातून वाचणार नसते. त्यामुळे पतीला स्वत: जीवंत रहाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्यायच नसतो.

त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, "तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती. पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून याव लागल!"

ही गोष्ट आपल्याला सांगण्या मागचा एवढाच उद्देश की,  चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठीमागे, कधी कधी मोठी गुंतागुंत असते. जी आपल्या सहज लक्षात येत नाही.

त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवून घेउ नये.

जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात, ते मुर्ख असतात म्हणून नव्हे तर त्याना त्यांची जबाबदारी कळते म्हणून.

जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे,तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.

साभार...😔😊

मी पाहिलेला सुखी माणूस व त्याचा ७०% चा मंत्र

*मी पाहिलेला सुखी माणूस व त्याचा ७०% चा मंत्र*

१) दोन वर्षापूर्वीची एक घटना : मी एका सॉफ्टवेअर कंपनीसाठी लीगल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होतो. ती एक अमेरिकन कंपनी होती, व त्या कंपनीचा Chief Technology Officer (CTO) हा जर्मन माणूस होता. तो भारतातील काही बँकासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेवा पुरवायचा तो जर्मनीमध्ये जन्मलेला, त्याचे बारावी पर्यंतचे शिक्षण जर्मनी मध्ये झाले. त्यानंतर त्याने पार्टटाईम नोकरी करून त्याचे इंजिनीअरिंग शिक्षण पूर्ण केले. नंतर तो त्या सॉफ्टवेअर कंपनीत CTO म्हणून काम करू लागला. त्याच्यासोबत बर्याच वेळा संपर्क होत असल्याने बर्यापैकी ओळख झालेली. त्यावेळी त्याचे घर ७०० ते ८०० स्क्वेअर फुट इतके लहान आहे. परंतु त्याचे वार्षिक वेतन तीन लाख डॉलर्स आहे. म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे तब्बल २ कोटी रुपये होतात. त्याची पत्नी पेशाने डॉक्टर आहे, तरी सुध्दा त्याचे घर हे लहान आहे म्हणजे अमेरिकेत अशी घरे सर्वात लहान समजली जातात, तो साधी कार व आयफोनचे साधे मॉडेल वापरतो. मोजकेच कपडे, एक छोटीशी डायरी, मोजकेच ८-१० मित्र.. कमीत कमी तणावात काम करणारा व कामानिमित्त जगभर फिरणारा असा हा माणूस त्याच्याशी चांगली ओळख झाल्यावर त्याने ७०% चा एक मंत्र सांगितला. 
२) *महाग फोन :* आपल्या देशात बरेच जण स्टाईल व दिखावा करण्यासाठी महागडा आयफोन वापरतात. सध्याचे आयफोनचे नवीन मॉडेल हे एक लाख पर्यंत मिळते. परंतु त्यातले ७०% फंक्शन आपल्यासाठी निरुपयोगी असतात. आपल्याकडे कॉल्स व्यतिरिक्त फोनचा वापर हा सोशलमीडिया, गेम्स खेळण्यासाठी किंवा व्हिडीओ पाहण्यासाठीच केला जातो. ही कामे १० हजाराच्या स्वस्त फोनमध्ये सुध्दा केली जाऊ शकतात, म्हणजे महागड्या फोनमध्ये ७०% फंक्शन व अॅप निरुपयोगी, काही कामाची नसतात.
३) *महागडे घर :* आजकाल मोठे मोठे बंगले बांधले जातात किंवा उच्चभ्रू वसाहतीत थ्री-बीएचके, फोर-बीएचके फ्लॅट किंवा डयुप्लेक्स खरेदी करण्याचे बर्याच जणांना फॅड असते, परंतु या मोठमोठ्या घराचा केवळ ३०% उपयोग आपण करतो. जे अशी घरे कर्ज काढून घेतात, ते आपला ७०% वेळ घराबाहेर घालवत असतात. त्यांना घराचे हफ्ते भरण्यासाठी  अधिक काम करावे लागते.
 *४) महागडी कार:* हल्ली बरेच लोक कार खरेदी करतात. मध्यमवर्गीय यामध्ये हे प्रमाण वाढत आहे, कार घेतली तर महागडीच व नामवंत ब्रॅंडची घेतात. परंतु त्याचा वापर हा केवळ ३०% च होत असतो. मुंबईत तर लोक कार तर घेतात. परंतु सुरूवातीचे काही दिवस वगळता नंतर लोकल ट्रेननेच जातात. कुटुंबियासोबत बाहेर प्रवास हा क्वचितच होतो. तेव्हा महागडी कार घेऊनही ती जवळ जवळ ७०% उपयोगात आणली जात नाही. तिचा वापर हा सरासरी ३०% च केला जातो.

५) *महागडे कपडे :* उच्च, आधुनिक जीवन शैलीचा भाग म्हणून लोक ब्रॅंडेड रेडीमेड कपडे वापरू लागले आहेत. कपाट अशा ब्रॅंडेड महाग व विविध प्रकारच्या महागड्या कपड्यांनी भरलेले असते. परंतु हे कपडे खूप कमी  वापरले जातात, बाकी ते कपाटातच पडून राहतात आपण घेतलेले महागडे कपडे हे ७०% निरुपयोगी असतात, ते फक्त ठराविक वेळीच वापरतो नंतर ते कपाटात ठेवून देतो. लग्नातला सूट ९९% जण परत वापरतच नाहीत. 

*️⃣✔️●६) *मित्र/नातेवाईक :* प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक मित्र व नातेवाईक असतात. जे आपल्या आनंदाच्या क्षणी, कार्यक्रमांना आपल्या सोबत सहभागी होतात, परंतु यातले ७०% नातेवाईक हे निरुपयोगी असतात , कारण जेव्हा तुम्ही अडचणीत असता किंवा आर्थिक संकटात असता तेव्हा आपले मित्र व नातेवाईकांपैकी ७०% लोक हे आपल्यापासून दूर होतात, किंवा गरजेच्या वेळी मदत नाही करत. गर्दी पेक्षा दर्दी लोकांत रहा. 
७) *कमाविलेला पैसा :* आपण मिळवलेल्या पैशांचेही तसेच असते, ज्या व्यक्ती जवळ प्रचंड संपत्ती असते, केवळ ३०% संपत्तीचाच त्याला उपयोग करत असतो. आपल्याकडे खूप संपत्ती असेल तर त्यापैकी आपण ७०% संपत्ती अशीच पडून असते. त्यामुळे सतत डोक्यावर ओझे तयार होते व अतिप्रमाणात संपत्ती असूनही लोक सुखी नसतात. कुणासाठी व कशासाठी काम करतो व कामवितो हेच कळत नाही. पोरांसाठी कितीही कमवून ठेवा, तुम्ही मेल्यावर ते विकूनच  खाणार. काही मूर्ख रिटायर झाल्यावर बंगला बांधतात व दोन-तीन वर्षानी मरून जातात, शेवटी त्या बंगल्यात त्याचा हार घातलेला फोटो असतो. फोटो अडकवायला बंगला बांधता का? 
८) *भांडी व साड्या :* आपल्या घरात अनेक विविध प्रकारची भांडी असतात. परंतु त्यापैकी ७०% भांडी ही विनावापरामुळे धूळ खात पडलेली असतात व दैनंदिन वापरासाठी ठरलेलीच ३०% भांडी आपण वापरतो. तसेच बायकांजवळ असलेल्या महागड्या साड्या त्या रोज नेसत नसतात. बर्याच ठिकाणी आधुनिक लाईफ स्टाईल म्हणून फार कमी बायका साड्या नेसत नाहीत. इतर कपडे वापरतात. आजकाल फक्त ठराविक कार्यक्रम समारंभात साड्या वापरल्या जातात त्यामुळे त्यांचा वापरही ७०% ही होत नाही.
आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात काम करताना आपण कळत नकळत ७०% पैसा, वेळ, संसाधने, वस्तु वाया घालवत असतो. प्रत्येकाला खूप पैसा कमावण्याचे, महागड्या वस्तु खरेदी करण्याचे वेड असते. परंतु पाश्चात्य देशातील लोक आवश्यक तेवढ्याच गोष्टी बाळगतात आणि ते त्यांच्या बुध्दीमत्ता विकास, अनुभव व जीवनातील खरा आनंद मिळविण्यावर अधिक भर देतात. यामुळे त्यांचे मन हे संतुलित असते व फारशा अवास्तव अपेक्षा नसल्याने ते नेहमी समाधानी असतात. त्यांच्याकडे अनावश्यक गोष्टींचे ओझे नसते. 
*Do not collect assets...* *Collect happiness,*  *&achievement,* *experience  & enjoyment* *in life... Earn honour...* *Earn respect...Earn Name*
CTO च्या वेतनाच्या तुलनेत त्याचा खर्च फक्त २०% होता.  त्यामुळे तो ९९% तणावरहित काम करू शकत होता व खूप आनंदी होता. 
त्याने एकच अत्यंत महत्वाचा संदेश दिला,  *"Do not buy, hold, own anything which you can't use, consume,* *monitor.* *Do not carry any unnecessary weight or burdens on your head, mind and brain."