शुक्रवार, ९ जून, २०२३

रविवारच्या सुट्टीचा इतिहास

*रविवारच्या सुट्टी मागचा इतिहास?*

आज शनिवार, १० जून,२०२३.

महात्मा जोतीराव फुले यांचे निष्ठवंत सत्यशोधक कार्यकर्ते, कर्तृत्ववान सहकारी, दीनबंधू या वृत्तपत्राचे संपादक, झुंझार पत्रकार, लेखक, स्वत:च्या कुटुंबियांचा विचार न करता मुंबईतील हजारो गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी स्वत:ला झोकून देऊन संघटनेच्या माध्यमातून चळवळ उभा करणारे भारतीय कामगार चळवळीचे *आद्यजनक रावबहादूर नारायणराव मेघाजी लोखंडे तथा "जस्टीस ऑफ पीस" जे.पी यांनी "बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन" या कामगार संघटनेच्या संघशक्तीच्या माध्यमातून दिनांक १० जून, १८९० रोजी सर्वच थरातील कामगारांना रविवारची साप्ताहिक सुटटी मंजूर करुन घेतली या ऐतिहासिक दिनाला आज १३३ वर्षे होत आहेत.* 
*यासाठी रविवारची साप्ताहिक सुटटी उपभोगणाऱ्या तमाम शासकीय, निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तथा खाजगी उद्योग धंदे मध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी तसेच कामगार बंधू आणि भगिनींचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. कामगार नेते नारायणराव मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून मिळालेला हा अभूतपूर्व विजय होता त्यांच्या विचार आणि सत्यशोधक कार्यास विनम्र अभिवादन. कोटी कोटी नमन.*

मित्रहो आज आपण रविवार या सुट्टीच्या दिवसामागचा इतिहास जाणून घेणार आहोत रविवारच्या सुट्टी मागचा इतिहास नेमका काय आहे?

कामगार चळवळीचे आद्य जनक रावबहादूर नारायणराव मेघाजी लोखंडे यांचा जन्म सन-१८४८ मध्ये पुणे जिल्ह्यातील सासवड येथे झाला. येथे त्यांचे मॅट्रीक पर्यंत शिक्षण झाल्यानंतर उदरनिर्वाहासाठी मुंबई येथील भायखळा भागात त्यांचे आगमन झाले. गिरणी कामगारांच्या कल्याणासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी तन-मन-धन अर्पण करुन जीवनभर कार्य केले ते सत्यशोधक विचारांचे होते. सर्वच सत्यशोधक कार्यकर्ते सर्वसामान्यपणे प्रसिद्धीपासून जाणीवपूर्वक दूर राहत असत. यामुळे अनेक सत्यशोधक नेते, कार्यकर्ते यांचा इतिहास आपल्याला त्यांच्या नावापलिकडे फारसा माहिती नाही. रावबहादूर नारायणराव मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत आल्यानंतर प्रथम रेल्वेत नोकरी धरली ती नोकरी सोडून त्यांनी पोष्टात नोकरी स्वीकारली, तीही नोकरी सोडून त्यांनी शेवटी मांडवी भागातील एका गिरणीत कोठी-कारकून म्हणजे भांडारपाल म्हणून नोकरी धरली त्यांची ही शेवटची नोकरी होती येथेच गिरणी कामगार चळवळीचा उदय आणि विकास झाला.

श्री कासवजी दावर यांनी मुंबई प्रांतात ¨स्पिनिंग अँड विव्हिंग कंपनी° हि पहिली गिरणी दिनांक ७ जुलै, १८५४ रोजी चालू केली. श्री कासवजी दावर हे अवघे ३९ वर्षे वयाचे तरुण उद्योजक होते. महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य आरंभिले होते. वास्तविक भारत देशात गिरण्यांची मूळ कल्पना सत्यशोधक डॉ.भाऊ दाजी लाड या विचारवंत आणि दूरदृष्टीच्या सत्यशोधकांनी मांडली होती. या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख ¨कॉटन मिल्स इन इंडिया° इंग्रजी ग्रंथात पान ७ वर आपल्याला आढळेल. सन- १८७५ मध्ये मुंबईत ४१, कलकत्त्यात ५, मद्रासमध्ये २, कानपूरमध्ये ३, हैदराबाद, इंदूर, नागपूर मध्ये प्रत्येकी १ अशा एकूण-५४ गिरण्या चालू होत्या.

सन-१८९५ च्या दीनबंधू च्या अंकातील छापील माहितीप्रमाणे मुंबईत ६७, अहमदाबादेत १४, बडोचमध्ये ३, सुरतमध्ये ३, ठाणे येथे २, आणि खेडा, जळगाव, नाशिक, पुणे, सोलापूर, बेळगाव, धारवाड या ठिकाणी प्रत्येकी १ अशा एकूण ९६ सुताच्या व कापडाच्या गिरण्या अस्तित्वात होत्या.

यावेळी गिरणीत काम करणाऱ्या कामगारांची अत्यंत दयनीय अवस्था होती. दिवस-रात्र मुक्या जनावरासारखे गिरणीत काम करावे लागत असे. मालक या कामाचा जेवढा मोबदला देत असत तेवढा मोबदला घेऊन अगदी गरीबासारखे कुरकुर न करता, लाथा बुक्याचा मार खाऊन मालक देईल ते काम निमुटपणे करावे लागे. या कामगारांमध्ये स्त्री कामगार आणि बालकामगारांच्या अवस्था तर अत्यंत भयानक आणि भीषण होती. त्यांचे अघोरी शोषण आणि अत्याचार ही नित्याचीच गोष्ट होऊन बसली होती. दर दिवशी किमान १४ तास कोंदट जागेत, कोदंट हवेत मरमर काम करावे त्यातून थोडासा मोकळ्या हवेत जाण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याच्याकडून ०४ आणे दंड घेतला जाई. ०४ आणेची किंमत त्या वेळी मिळणाऱ्या पगाराच्या मानाने किती मोठी असणार? याची आपण कल्पना करु शकता. कोंडलेल्या अवस्थेत कापसाचे बारीक बारीक धागे नाकातोंडात जाण्यामुळे स्वच्छ हवेच्या अभावी कित्येक महिला आणि पुरुष कामगार क्षयरोग, दमा व इतर आजारांना बळी पडत असत. लहान-मोठे अपघात होऊन यात मनुष्यहानी जरी झाली तरीही त्याचा मोबदला मिळण्याची कोणत्याही प्रकारची सोय नव्हती. अपघातात सापडलेल्या कामगारांना नोकरीला मुकावे लागे आणि त्यांचा संसार उघड्यावर पडत असे. अपघातामुळे मृत्यू पावलेल्या मजुरांच्या कुटुंबाची अवस्था दयनीय होत होती. ही दैन्यावस्था दूर होऊन कामगारांना संरक्षण व स्वास्थ्य मिळावे म्हणून भारतीय कामगार चळवळीचे आद्यजनक रावबहादूर नारायणराव मेघाजी लोखंडे यांनी अहोरात्र प्रयत्न केले.

भारतातील समाजक्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले यांची प्रेरणा नारायण मेघाजी लोखंडे यांना लाभली सत्यशोधक समाजाच्या कामाच्या निमित्ताने जोतीराव फुले मुंबईत वारंवार जात-येत असत गिरणीत काम करणारे स्त्री-पुरुष कामगारांचे आणि बालमजूर यांची दयनीय अवस्था त्यांच्या नजरेतून सुटणे शक्य नव्हते.

भारतीय कामगार चळवळीचे आद्यजनक रावबहादूर नारायणराव मेघाजी लोखंडे या सत्यशोधकांच्या नेतृत्वाखाली ¨बॉम्बे मिलहॅन्डस असोसिएन° हि भारतातील पहिली संघटना स्थापन झाली. या पहिल्या संघटनेचे अध्यक्ष होत नारायण मेघाजी लोखंडे. या संघटनेचे चिटणीस होते डी.सी.अथेड कामगार क्षेत्रात नव्या पर्वाचा आरंभ झाला. कामगार जागृती आणि कामगार कल्याण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून अहोरात्र प्रयत्न केले गेले. या कामगार संघटनेच्या माध्यमातून सादर केलेल्या मागण्याचा सखोल विचार करुन १८९० मध्ये सरकारने "फॅक्टरी कमिशन" नियुक्त केले. या कमिशनने मुंबई, अहमदाबाद या मोठया शहरातील कामगारांच्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी सहकारी सदस्य म्हणून भारतीय कामगार चळवळीचे आद्यजनक रावबहादूर नारायणराव मेघाजी लोखंडे यांची निवड केली. या सन्मानपूर्वक निमंत्रणामुळे भारतीय कामगार चळवळीचे आद्यजनक रावबहादूर नारायणराव मेघाजी लोखंडे यांचे चळवळीतील स्थान आणि अधिकार यावर एका प्रकारे शिक्कमोर्तबच झाले. कमिशनने सरकारला सादर केलेल्या अहवालात श्री.लोखंडे यांचा खास उल्लेख केलेला आहे.

भारतीय कामगार चळवळीचे आद्यजनक रावबहादूर नारायणराव मेघाजी लोखंडे यांनी ज्या निष्ठेने कुशलतने तडफेने कामगार चळवळीत मोलाचे योगदान दिले याबददल त्यावेळेच्या इंग्रजी सरकारने सन-१८९० मध्ये रावबहादूर हा बहुमानाचा किताब देऊन ¨जस्टीस ऑफ पीस° जे.पी.हि पदवी बहाल केली.

यासाठी सन-१८९१ मध्ये इंग्रज सरकारने शाही कमिशन स्थापन केले.  या कमिशनसमोर भारतीय कामगार चळवळीचे आद्यजनक रावबहादूर नारायणराव मेघाजी लोखंडे यांनी भारतातील कामगारांच्या दयनीय अवस्था प्रभावीपणे मांडल्या. कमिशनला त्यांच्या सुचनांचा गांभिर्याने विचार करावा लागला आणि त्यानुसार त्यांना अनेक महत्वपूर्ण निर्णय घ्यावे लागले.

सन-१८९३ मध्ये मुंबईत दंगल उसळली होती यावेळी भारतीय कामगार चळवळीचे आद्यजनक रावबहादूर नारायणराव मेघाजी लोखंडे यांनी शांतता निर्माण होण्यासाठी मोठया धैयाने जाहिर सभा घेऊन सभेत आपल्या अमोघ वाणीने लोकांना शांत करण्याचा कौशल्याने प्रयत्न केला आणि यात यशही मिळविले.

सन-१८९५ मध्ये त्यांनी 'दिनबंधू' मध्ये प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरुन त्या काळात दुखापत झालेल्या महिला आणि पुरुष कामगारांची संख्या १०४५ आणि ठार झालेल्या कामगारांची संख्या १० होती.

गिरणीमालक आणि उच्चपदस्थ अधिकारी यांच्या मनमानी अमानवीय कारभाराला आळा बसावा म्हणून "फॅक्टरी इन्स्पेक्टर"ची नियुक्ती करावी असा आग्रह कामगार नेते नारायणराव मेघाजी लोखंडे यांनी धरला, या फॅक्टरी इन्स्पेक्टरने गिरण्यांना भेट देऊन गिरणी मालकांनी कामगारांसाठीच्या कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करुन द्यावयाच्या असतात त्याची पाहणी करावी यासाठी कामगारांचे हित आणि संरक्षणाची बाजू घ्यावी अशी अपेक्षा होती. परंतू भांडवलदार गिरणीमालक पैशांच्या आणि बुध्दीच्या जोरावर उच्च्पदस्थ अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानुसार फॅक्टरी इंस्पेक्टरांना सरळसरळ विकत घेत असत.

गिरणी कामगारांना शुध्द हवा, पिण्यासाठी इतर कारणासाठी पाणी, औषधोपचार, सुट्ट्या, कामाचे तास आणि इतर सुखसोयीबाबत फॅक्टरी इंस्पेक्टर कटाक्षाने नजर ठेवून कामगार कल्याणाची काळजी घ्यावी ही अपेक्षा पुरेपुर फोल ठरली आहे.

याविषयी कामगार नेते नारायणराव मेघाजी लोखंडे यांनी दिनांक-१४ जुलै, १८९५ च्या दिनबंधू च्या अंकात दिलेल्या माहितीप्रमाणे फॅक्टरी इंस्पेक्टरने

सन-१८९५ या वर्षात २७२ कारखान्यांपैकी २११ कारखाने ३ पेक्षा जास्त वेळा,

२८ कारखाने ३ वेळा,

२१ कारखाने २ वेळा,

१२ कारखाने केवळ एकदाच तपासले. खानदेशातील कारखाना एकदाही तपासण्यात आला नाही.  याचा अर्थ या तपासण्या म्हणजे केवळ फार्स उरला होता. फॅक्टरी इंस्पेक्टर बहुदा गिरणी मालकांच्या आमिषाला बळी पडत असल्यामुळे गिरणी कामगारांची दयनीय आणि संतापजनक अवस्थेबद्दल कामगार नेते नारायणराव मेघाजी लोखंडे यांनी यांनी भांडवलदार गिरणीमालक व त्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि तत्कालीन इंग्रजी सरकार यांचा आपल्या 'दीनबंधू' या वृत्तपत्रात वेळोवेळी खरपूस समाचार घेऊन गिरणी कामगार आणि इतर संबंधित सर्वांनाच धोक्याचा लाल कंदील दाखवून सावधगिरीचा इशारा दिला.

कामगार नेते नारायणराव मेघाजी लोखंडे यांनी दिनांक ०१ एप्रिल, १८९४ रोजी दीनबंधू मध्ये ¨इंग्रजी सरकारचे राज्यात मोगलाई° या शीर्षकाखाली अग्रलेख लिहिला आणि त्यात त्यांनी म्हटले की, "पोटापुरते मिळण्यास रक्ताचे पाणी करून घ्यावे लागते." सरकारी यंत्रणा भांडवलदार गिरणी कामगारांची बाजू घेऊन कामगारांवर दोघेमिळून अन्याय करतात. अज्ञान व गरिबीमुळे गिरणी मालकापुढे कामगारांचा टिकाव लागत नाही.

यावेळी सुपारी बागेजवळील गिरणीमधील त्यांनी उदाहरण दिले आहे सुमारे ४०० गिरणी कामगार महिला कामाच्या मानाप्रमाणे मजुरी मिळावी म्हणून काम सोडून उभ्या राहिल्या. तर त्यांना दाद न मिळता यातील २९ कामगार महिलांवर धांदल केल्याचा आरोप ठेवून ५-६ रुपयाचा दंड बसवला. नऊ दहा रुपयाचे काम करून पाच सहा रुपये हाती पडत असत त्यातही सर्वच पगार दंडात गेला म्हणजे हा जुलमी अन्याय. याच अग्रलेखात संतापाने कामगार नेते नारायणराव मेघाजी लोखंडे यांनी म्हटले की, ¨गरीब बिचारे पोटार्थी मजूर लोकांवर जुलुम केल्याने ईश्वराचे गुन्हेगार व्हावे लागते, हे व्यवस्थापकाने पक्के लक्षात ठेवले पाहिजे कारण या सर्व कृत्यांचा झाडा यापुढे द्यावा लागेल."

दिनांक ३ जून, १८९४ रोजीच्या दीनबंधूच्या अग्रलेखात कामगार नेते नारायणराव मेघाजी लोखंडे म्हणतात, "कमी तास मजूरी यातच फायदा आहे. पाश्चिमात्य देशात कामगारास अधिक मोल देऊन व त्याचकडून कमी तास पगार घेऊन आणि चांगले उत्पन्न येऊन जर त्या देशातील व्यापारास तेजी येते, तर तीच योजना आमच्या देशात आणली असता फायदा होणार नाही कशावरून? पण बाबा आदमच्या वेळेपासून वंशपरंपरेने चालत आलेल्या चालींचे मेंढराप्रमाणे अनुकरण करणाऱ्या आमच्या श्रीमान गिरणीमालकांचे व कारखानदारांचे याबाबतीत डोळे उघडतील तेव्हा ना!"

दिनांक १८ नोव्हेंबर, १८९४ रोजीच्या दीनबंधूच्या अग्रलेखात कामगार नेते नारायणराव मेघाजी लोखंडे यांनी आपल्या गाढया अभ्यासाबरोबर परंपरावादी भांडवलदार गिरणी मालकांबद्दल रोषही स्पष्ट करताना लिहिले आहे ते म्हणतात, "इंग्रजी सरकारच्या राज्यात असली बेकायदा कृत्ये करणाऱ्यास तुरुंगाची शिक्षा होत असूनही लुटारु लोक मात्र राजरोस आपला धंदा चालवीत आहेत. तिकडे कोणी ढुंकूनही पाहात नाही हे नवल नव्हे काय?"

सन-१८९१ मध्ये कामगार हिताच्या दृष्टीने जो फॅक्टरी ॲक्ट सरकारने मंजूर केला त्यामध्ये लोखंडे यांनी सादर केलेल्या कामगारांच्या आणि कामगार संघटनेच्या तक्रारींची विशेष नोंद घेण्यात आली.

भारतीय कामगार चळवळीचे आद्यजनक रावबहादूर नारायणराव मेघाजी लोखंडे यांचे साहित्य.

 (१) पंचदर्पण अथवा सर्व जातींचे उपयोगी पडणारे नियम.

(२) सत्यशोधक निबंधमाला अथवा हिंदू धर्माचे खरे ज्ञान - भाग-१ ला.

(३) सत्यशोधक निबंधमाला अथवा हिंदू धर्माचे खरे ज्ञान - भाग-२ रा.

महात्मा जोतीराव फुले यांचे निष्ठवंत सत्यशोधक, कर्तृत्ववान सहकारी, दीनबंधू या वृत्तपत्राचे संपादक, झुंझार पत्रकार, लेखक, स्वत:च्या कुटुंबियांचा विचार न करता मुंबईतील हजारो गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी स्वत:ला झोकून देऊन संघटनेच्या माध्यमातून चळवळ उभा करणारे भारतीय कामगार चळवळीचे आद्यजनक रावबहादूर नारायणराव मेघाजी लोखंडे तथा "जस्टीस ऑफ पीस" जे.पी यांनी "बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन" या कामगार संघटनेच्या संघशक्तीच्या माध्यमातून दिनांक १० जून, १८९० रोजी सर्वच थरातील कामगारांना रविवारची साप्ताहिक सुटटी मंजूर करुन घेतली या ऐतिहासिक दिनाला आज १३३ वर्षे होत आहेत. यासाठी रविवारची साप्ताहिक सार्वजनिक सुटटी उपभोगणाऱ्या तमाम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तथा कामगार बंधू आणि भगिनींचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. कामगार नेते नारायणराव मेघाजी लोखंडे यांच्या विचार आणि सत्यशोधक कार्यास विनम्र अभिवादन. कोटी कोटी नमन. 
धन्यवाद.
🙏🏻🌷
✍🏻 शीतल खाडे सांगली.

बुधवार, ८ मार्च, २०२३

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्वातंत्र्याच्या भारतातील आद्य उद्गात्या होत्या. ज्या कालात महिलांना गोषातच रहावे लागे, शिक्षणावर बंदी होती त्या काळात मल्हाररावासारख्या ख-या पुरोगाम्याने अहिल्येला शिकवले. नुसते लिहिणे-वाचणे नव्हे तर अहिल्यादेवी भालाफेकीत इतक्या तरबेज झाल्या कि खुद्द टिपू सुलतानानेही त्याबाबत गौरवोद्गार काढले. "तत्वज्ञ महाराणी" हा किताब त्याने अहिल्यादेवींना दिला. 
अहिल्यादेवी तेथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी अन्य महिलांनाही लष्करी शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र काढले. महिलांच्या लष्करी प्रशिक्षणासाठी जगात निघालेले हे पहिले विद्यालय. त्या काळात देशभर संतती नसलेल्या विधवांची मालमत्ता सरकार दरबारी जमा करायचा कायदा होता. अहिल्यादेवींनी तो कायदा रद्द तर केलाच पण विधवांना कोणतेही मुल दत्तक घेण्याचीही कायदेशीर तरतूद केली. महेश्वरला वस्त्रोद्योगात आघाडीवर आणत असतांनाच महिला विणकरांनाही प्रोत्साहन दिले. त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. ती मोडून काढण्यासाठी त्यांनी स्वत:च्या मुलीचा प्रौढ विवाह करुन स्वत: आदर्श घालून दिला. एवढेच नव्हे तर जो तरुण माळव्यातील दरवडेखोरांचा उपद्रव नष्ट करीन अशा कोणाही युवकाशी तिचा विवाह लावून देईन असे दरबारात घोषित करून जातीची अटही काढून टाकली. हे काळाच्या फार पुढचे पाऊल होते हे आम्ही कधीच लक्षात घेतले नाही.महिला सबलीकरण म्हणजे काय हे त्यांनी अठराव्या शतकात कृतीतून दाखवले. आजच्या सरकारांनाही त्यापासून शिकायला हवे.
युरोपात एकोणिसाव्य शतकापर्यंत स्त्रीया दास्यातच होत्या. काही लेखिका स्त्री स्वातंत्र्याबद्दल दबकत बोलत असल्या तरी त्यांचे सामाजिक स्थान दुय्यमच होते. युरोपातील महिलांना जोन माल्कममुळे अहिल्यादेवी माहित झाल्या. युरोपातील महिलांसाठी हे नुसते आश्चर्य नव्हते तर त्यांनी अहिल्यादेवींत आपले आदर्श पाहिले. इतके कि जोआना बेली या इंग्रज कवयित्रीने अहिल्यादेवींवर खंडकाव्य लिहिले. विदेशी साहित्यिकाने कोणाही भारतीयावर लिहिलेले हे पहिले खंडकाव्य. युरोपातील स्त्रीयांच्या स्वातंत्र्यलढ्याचा आदर्श निर्माण करणारी महिला अहिल्यादेवी असुनही आमच्यासमोर त्यांची प्रतिमा केवळ हातात पिंड घेतलेली साध्वी अशी निर्माण केली गेली. थोडक्यात खरा आदर्श पुसला गेला. भारतीय स्त्रीयांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली असती तर परंपरावाद्यांचे तेंव्हाच नाक ठेचले गेले असते व आज महिला अधिक आत्मसामर्थ्याने जगल्या असत्या. 
कोणाच्या हातून काही काढून घेतले तर त्याला पर्यायही दिला पाहिजे हे सूत्र अहिल्यादेवींनी घालून दिले. भिल्ल समाज त्याकालात यात्रेकरुंना लुटून उपजीविका चालवत. अहिल्यादेवींनी त्यांचे मन वळवून त्यांच्यावरच यात्रेकरुंच्या रक्षणाची जबाबदारी सोपवत यात्रेकरुंकडुन भिलकवडी नावाचा कर घ्यायची परवानगी दिली. एवढेच नव्हे तर त्यांना कसायला जमीनीही दिल्या. 
आज भारतातील वंचितांचे असंख्य पारंपारिक रोजगार नष्ट झाले अथवा केले गेले तरी त्यांना जगायचे अन्य पर्याय दिलेले नाहीत. आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्याच पारंपारिक व्यवसायांत पुरवले नाही. सर्वांना नोकरीची गाजरे तेवढी दाखवली. वंचितांचे अधिक वंचितीकरण होत त्यांची ससेहोलपट मात्र होत आहे. येथे अहिल्यादेवींचे आदर्श घेत पर्याय उपलब्ध करुन दिले पाहिजेत. पण या अहिल्याबाई सांगणे त्यांच्या अडचणीचे आहे.
-संजय सोनवणी

सोमवार, ६ मार्च, २०२३

तुकोबाच्या हत्येचा पंचनामा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    *🏴 तुकोबाच्या हत्येचा पंचनामा 🏴*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

*🚩 धुलीवंदन ! एक पूर्णसत्य !*

*लेखक : शैल जेमिनी कडू*

तुझा नावाने शिमगा घालू का? का रे, माझ्या नावाने शिमगा करतोस? ह्या म्हणी तुम्ही सरांस ग्रामीण भागात ऐकल्या असतील. याचे खरे कारण शिमगा करणे म्हणजे.. खोटी बोंब उठविणे आणि नेमके हेच झाले आहे आमच्या जगत गुरु तुकोबांच्या बाबतीत.

मनुवादी, सनातनी आणि कर्मठ असलेल्या भटांनी प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या, आपल्या अभंगातून लोकांचे प्रबोधन करून लोकांना खरा ‘देव’ दाखविणाऱ्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना कायमचे वैकुंठात पाठविण्याच्या खोट्या पराक्रमाला शिमगा घालू का? असे म्हणतात. हि म्हण सोळाव्या शतकात प्रचलित झाली आहे.

धार्मिक सण होळी.. धुळवड.. आणि याच वेळेस धुलीवंदन या दिवशी मंबाजी भट आणि सालोमालो भट व कंपूने तुकाराम महाराजांची हत्या केली आणि इंद्रायणी नदीत महाराजांचा देह सोडून दिला. अन नंतर अशी आवई उठवली कि, तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला निघून गेले.

इंद्रायणीच्या डोहात रडले मासे
सांगा ओ सांगा वैकुंठीचे विमान कसे होते?

सतराव्या शतकात विमान येणे व त्याचा चालक गरूड होता यावर कोणत्याही जिवंत माणसाचा विश्वास बसणार नाही, कारण तेव्हा तंत्रज्ञान जन्माला आले नव्हते. प्रगत नव्हते.

तुकाराम महाराज यांची हत्या करताना ‘पांडू मांग’ नावाच्या तरुणाने बघीतली होती. गावात येवून त्याने तुकारामांच्या पत्नीला सांगितलं होते. पण भटांनी आवई उठवली महाराज वैकूंठाला गेले, बरे गेलेच असे समजले तरी ते भटांच्या पोथीनुसार. एकादशी सारख्या पवित्र दिवशी न जाता धुलवडीला अभद्र दिवशी का गेले होते?

ते विमान वैकूंठावरून आले होत म्हणे. मग आतापर्यंत च्या इतिहासात एकदाच का आले? मग आता काय त्याची फेरी बंद पडली का? कि वैमानिक फरार आहे?

बरे आपण मानले तुकाराम महाराज वैकूंठाला गेले मान्य आहे, मग सर्व जगात फक्त तुकाराम महाराज यांचा बोलबाला व्हायला पाहीजे होता. एकाही बामणाच्या तोंडात तुकाराम महाराजांचे नाव का येत नाही?

सर्व बामन रामदासाला गुरु मानतात. किती ब्राह्मण देहुला दर्शन घ्यायला जातात?

आळंदी इतका विकास देहूचा का झाला नाही? कारण ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण व तुकाराम कुणबी मराठा. बहुजन होते हे मराठ्यांनो का लक्षात घेत नाही? उभ्या जगात ही एकमेव घटना घडली मग बामणांच्या तोंडी रामदासाचेच का नाव येते? आषाढी एकादशीला ज्ञानेश्वरांच्या पालखी समोर, तुकोबाची आरती का होवू दिली जात नाही?

नाही वैकुठासी गेला, 
तुका मारुनी टाकला !
डाव्या हाताचा कलंक, 
उजव्या हातानी झाकला !

अंधश्रद्धा, कर्मकांड आणि वैदिक व्यवस्थे विरुद्ध तुकोबांनी बंड केले होते. ते विद्रोही होऊन लोकांना जागृत करीत होते. तुकोबांचे अभंग लोकांच्या तोंडपाठ झाले. दिवसेंदिवस तुकाराम महाराज यांची लोकप्रियता वाढत होती. लोकांना कर्मकांड, थोतांड यातील सत्य समजू, उमजू लागले. याउलट सनातनी आणि भोंदू लोकांची दुकाने बंद पडू लागली, लोक त्यांना झिडकारू लागले. याचा राग येवून तुकारामांची हत्या मंबाजी भट व इतरांनी केली व आवई उठवली कि, तुकाराम वैकुंठाला गेला !

इंद्रायनीचा मासा विचारतो नभा
वैकुंठाला तुका नेला कैसा ।
माझा भोळा देव कारे तु चोरला 
मोह कैसा आवरला नाही तुला ।
मारोनी त्यासी भट झाला थोर
जीवासी खेळ कैसा केला ।
दादा म्हणे माझा तुका देहभाव
गाथा रुपी अमर जगी झाला ।

© खरा इतिहास

*लेखक : शैल जेमिनी कडू*

*संदर्भ : तुकोबाच्या हत्येचा पंचनामा*

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬