बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

📓 *भारतीय संविधानावर आधारित सर्वात मोठी*

📓 *भारतीय संविधानावर आधारित सर्वात मोठी*
👉 *"प्रश्नावली"* 👈

*JayBhim Today | Special*

💁‍♂️ भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने घटनेबद्दल प्रश्नोत्तरांरुपी अनन्यसाधारण माहिती आम्ही पोहोचवत आहोत. भारतीय संविधानाची मुख ओळख लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत व्हायला हवी, या उद्देशाने जास्तीत जास्त वाचकांना खालील प्रश्नावली पाठवावी. व आपणही काळजीपूर्वक वाचावी.

http://www.jaybhim.today

*१)* अस्पृश्यता पाळणे हा कोणत्या कलमाने दंडनीय गुन्हा आहे?
👉 कलम १७

*२)*  संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*३)* संविधानात एकूण किती परिशिष्टे आहेत?
👉 १२ परिशिष्टे

*४)* संविधानात एकूण कलमे किती ?
👉 मूळ ३९५ कलमे (सध्यस्थितीत ४४८)

*५)* घटनेनुसार संघराज्याची अधिकृत भाषा कोणती?
👉 हिंदी {इंग्रजीचाही वापर होऊ शकतो} (हा घटनासमितीतील सर्वाधिक वादाचा मुद्दा होता, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आठवणीत नमूद केले आहे.)

*६)* संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?
👉 २ वर्ष ११ महिने १८ दिवस

*७)* भाषणस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य कोणत्या कलमाच्या अधिकारात येते?
👉 कलम १९ ते २२

*८)* नवीन राज्यांची निर्मिती कोणत्या कलमांतर्गत येते?
👉 कलम २

*९)* कोणत्या कलमांतर्गत समाजातील मागास घटकांच्या (विशेषतः आदिवासी व दलित घटकांना) उन्नतीस शासन बांधील आहे?
👉 कलम ४६

*१०)* संविधानात कोणाचे हस्तलेखन आहे?
👉 बिहारी नारायण रायजादा (कॅलिग्राफी पद्धत), संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले.

http://www.jaybhim.today

*११)* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या अधिकाराचे वर्णन 'संविधानाचे हृदय आणि आत्मा' असे केले होते?
👉 घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क

*१२)* संविधान सभेची प्रथम बैठक केव्हा पार पडली?
👉 ९ डिसेंबर १९४६

*१३)* संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना काय म्हणतात? 
👉 मूलभूत कर्तव्य

*१४)* १. भारतीय संविधानाने कोणते मूल्य स्वीकारले आहे?
👉 धर्मनिरपेक्षतेचे

*१५)* घटनेनुसार निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते? 
👉 निवडणूक आयोग

*१६)* संघशासनाला कोणत्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार नाही?
👉 कायदा आणि सुव्यवस्था

*१७)* संघशासनाच्या अधिकारांविषयीच्या सूचीला काय म्हणतात?
👉 संघसूची

*१८)* 'शोषणाविरुद्धचा हक्क' या अंतर्गत संविधानाने कोणत्या बाबींवर बंदी घातली आहे?
👉 माणसांची खरेदी-विक्री, गुलामगिरी व वेठबिगारी, कारखाने, खाणी किंवा इतर धोकादायक ठिकाणी मुलामुलींना कामावर ठेवणे.

*१९)* मूलभूत अधिकारांचे रक्षक (fundamental rights protector) कोणाला म्हंटले जाते?
👉 सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय

http://www.jaybhim.today

*२०)* भारतीय संविधान संपूर्ण ताकदीने केव्हा लागू झाले?
👉 २६ जानेवारी १९५०

*२१)* कोणत्या कलमान्वये ६ ते १४ वर्षांपर्यंत मुलांना प्राथ. शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली? (right to education)
👉 कलम २१

*२२)* सत्तेचे भारतात कोणत्या तीन प्रकारे विकेंद्रीकरण झाले आहे?
👉 कार्यकारी (प्रशासकीय), कायदेकारी (विधिमंडळे), न्यायालयीन

*२३)* न्यायालयीन सत्तेचे सर्वोच्च अधिकार कोणाकडे असतात?
👉 सर्वोच्च न्यायालय

*२४)* आणीबाणीचे कोणते तीन प्रकार आहेत?
👉 राष्ट्रीय आणीबाणी, प्रादेशिक आणीबाणी, आर्थिक आणीबाणी (३५८व्या कलमानुसार कलम १९ मधील नागरिकांचे अधिकार आणीबाणीच्या काळात आपोआप समाप्त होतात.)

*२५)* भारतीय संविधानानुसार देशाचा प्रथम नागरिक कोणास म्हंटले जाते?
👉 राष्ट्रपती

*२६)* संविधानातील मूलभूत कर्तव्यांची संख्या किती? (Fundamental duties)
👉 ११

*२७)* भारतीय सैन्याचा सर्वोच्च सेनापती कोण? (Supreme commander)
👉 राष्ट्रपती

*२८)* लोकसभेची व राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती?
👉 ५५२,   २५०

*२९)* लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त वेळेचे अंतर किती असावे?
👉 ६ महिने

http://www.jaybhim.today

*३०)* राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो?
👉 राज्यपाल

*३१)* भारतात एकूण किती राज्यांत विधान परिषड अस्तित्वात आहे?
👉 ६   (सध्या प.बंगाल मध्येही)

*३२)* विधानसभेचे वर्षातून कमीतकमी किती अधिवेशन होणे गरजेचे आहे?
👉 २ अधिवेशने

*३३)* सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? व एकूण संख्या किती आहे?
👉 राष्ट्रपती करतात,   एकूण संख्या ३४

*३४)* मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते?
👉 लोकसभेला

*३५)* कोणत्या कलमांतर्गत बालमजुरी व मानवी तस्करी (human trafficking) पासून सं‍रक्षण मिळाले आहे?
👉 कलम २३ व कलम २४

*३६)* अल्पसंख्याकांना संरक्षण व स्वतःच्या शिक्षणसंस्था स्थापण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमांतर्गत प्राप्त झाले?
👉 कलम २९ व कलम ३०

*३७)* मूलभूत अधिकारांचे हनन झाले आहे असे वाटल्यास कोणत्याही व्यक्तीला कलम ३२ अन्वये कुठे तक्रार करता येते?
👉 थेट सर्वोच्च न्यायालयात

*३८)* अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित संवर्धन कोणत्या कलमांतर्गत करण्यात आले आहे?
👉 कलम ४६

*३९)* भारतीय संविधान लागू करण्यापूर्वी संविधान सभेच्या किती बैठका झाल्या?
👉 ११ सत्रे (बैठका)

*४०)* राज्यघटनेच्या अंतिम मसुद्याची एकूण किती वाचने झाली?
👉 तीन
• प्रथम वाचन (४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर १९४८)
• दुसरे वाचन (१५ ऑक्टोबर  ते १७ ऑक्टोबर १९४९)
• तिसरे वाचन (१४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर १९४९)

http://www.jaybhim.today

*४१)* कितव्या वयानंतर सर्वांना सार्वत्रिक प्रौढ मताधिकार दिलेला आहे?
👉 सुरुवातीला २१ वर्षे, परंतु १९८९ साली झालेल्या ६१ व्या घटनादुरुस्तीनंतर १८ वर्षे

*४२)* संविधानाच्या सरनाम्यातील शब्दांचा योग्य क्रम कोणता?
👉 सार्वाभोम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य

*४३)* कायद्यामोर सर्वाना समान वागणूक ही बाब कोणत्या मूलभूत हक्कांर्तगत येते?
👉 समानतेचा हक्क

*४४)* भारतीय संविधानानुसार कोणत्या अधिकारांवर निर्बंध टाकता येत नाही? किंवा उल्लंघनही करता येत नाही?
👉 मूलभूत अधिकार

*४५)* सध्यस्थितीत अस्पृश्यता निर्मूलन कायद्याचे नाव काय आहे?
👉 नागरी संरक्षण अधिनियम

*४६)* राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाची निर्मिती कोणत्या कलमांतर्गत झाली?
👉 कलम ५२,      कलम ६३

*४७)* कलम ७८ नुसार राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे कोणाचे कर्तव्य आहे?
👉 प्रधानमंत्री यांचे

*४८)* राष्ट्रपतीला वटहुकुम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत आहे?
👉 कलम १२३

*४९)* भारतीय संविधानाचे नागरिकांप्रती मुख्य उद्दीष्ट काय?
👉 न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता

*५०)* भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हंटले जाते?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कारण संविधान बनवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्णपणे सिंहाचा वाटा व महत्त्वाचे योगदान होते आणि त्यांनी ते अथक परिश्रमाने, जोमाने व प्रभावीपणे जोपासले. 

📱 *सर्व क्षेत्रातील अपडेट्ससाठी तुमचा Whatsapp Number रजिस्टर करा.*
http://www.jaybhim.today

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

अखेरचा सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकर*

*अखेरचा सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकर*

*-संजय सोनवणी*

संकटांची वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रुरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता *महाराजा यशवंतराव होळकर यांची पुण्यतिथी २८ ऑक्टोबरला आहे. त्या निमित्ताने यशवंतराव होळकरांच्या कर्तृत्वाचा घेतलेला हा वेध...*

यशवंतराव होळकरांचा (३-१२-१७७६ ते २८-१०-१८११) एकूण जीवनप्रवास थक्क करणारा आहे. असा थरारक रोमांचक जीवनप्रवास, संकटांची एवढी वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रूरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल.

यशवंतरावांना राज्य सोडा साधी बोटभर जहागीर वंशपरंपरेने मिळालेली नाही. ती त्यांना भिल्ल-पेंढारी व पठाणांच्या स्वत: उभारलेल्या अल्प सन्याच्या जिवावर प्रशिक्षित पलटनींशी लढून मिळवावी लागली. त्यांनी िशदे-पेशव्यांच्या घशातून जप्त झालेले होळकरी प्रांत अविरत लढत-लढतच मुक्त केले. एवढेच काय, पण िशद्यांनी कैदेत टाकलेली पत्नी आणि अल्पवयीन कन्येलाही लढूनच मुक्त केले. *६ जानेवारी १७९९ रोजी राज्याभिषेक करून घेऊन सावभौमतेची द्वाही फिरवली. शिवरायांनंतर स्वत:चे राज्य स्वत:च्या हिमतीवर मिळवणारा, शेवटपर्यंत स्वतंत्र राहणारा, स्वत:हून एकही तह कोणाशीही न करणारा हा एकमेव महायोद्धा होता.**

दौलतराव िशद्यांनी व पेशव्यांनी त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर आपत्तीमागून आपत्ती कोसळवल्या. त्यांचे बंधू दुसऱ्या मल्हाररावांचा खून केला. यशवंतराव व विठोजीरावांना कोवळ्या वयात आश्रयासाठी वणवण भटकावे लागले. रघोजी भोसल्यांनीही विश्वासघात केला. त्या क्षणापासून यशवंतरावांचे जीवन पूर्ण पालटलेले दिसते. त्यांनी स्वत: आपला मार्ग निर्माण केला, स्वत:च स्वत:चे नियम बनवले आणि आपली अविरत वाटचाल सुरू ठेवली.

पेशव्यांनी त्यांचा थोरला भाऊ विठोजीरावाला अत्यंत क्रूरतेने ठार मारले. शत्रूलाही कोणत्याही राजसत्तेने अशी शिक्षा दिलेली नाही, तरीही संतापाच्या भरात आततायी कृत्य करणे त्यांनी टाळले. हडपसरच्या युद्धात त्यांनी स्वत: ऐन जंगेत उतरून जो पराक्रम गाजवला त्याचे गुणगान त्यांचा कट्टर शत्रू मेजर माल्कमही करतो. खरे तर *पेशव्यांनी यशवंतरावांच्या पराक्रमाचा दौलतीसाठी उपयोग करण्याची थोडीतरी दूरदृष्टी दाखवली असती, तर इंग्रजांचे राज्य या देशात कदापि आले नसते, हे यशवंतरावांनी एकटय़ाच्या जिवावर इंग्रजांशी जी युद्धे केली-जिंकली त्यावरून सहज स्पष्ट होते.*
.
वसईचा तह झाल्यानंतर इंग्रजांच्या आसुरी आकांक्षांचा अंदाज आलेला हा पहिला भारतीय शासक. िशदेंशी परंपरागत हाडवैर असूनही, त्यांनी होळकरांचे एवढे अपराध केले असूनही त्यांनी िशदेंना व भोसलेंना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. 

*यशवंतरावांची युद्धनीती इंग्रजांना नेहमीच बुचकळ्यात टाकत राहिली. गनिमीकाव्याचा खरा उपयोग शिवरायांनंतर केला तो फक्त यशवंतरावांनी. गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशांत उपयुक्त असतो हे खोटे आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.* मोन्सनचा भीषण पराभव हा गनिमीकाव्याचा अभिनव आणि कल्पक नमुना होता. युद्धशास्त्राच्या अंगानेही त्याचे विश्लेषण व्हायला हवे. आधी शत्रूला आपल्या मागे आणून, मग त्याला उलटे पळायला लावून, बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवून भर पावसाळ्यात गाळाच्या जमिनीत त्याची फजिती करत तब्बल २५० मैल पाठलाग करत, क्रमाक्रमाने त्याची शक्ती कमी करत नेत कसे संपवावे याचे हे एकमेव उदाहरण. या युद्धात इंग्रजांचे दहा हजारापेक्षा अधिक सन्य ठार झाले..


खरे तर इंग्रजी सैन्य हे खूप प्रशिक्षित आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते. भारतातच काय फ्रान्समध्ये नेपोलियनलाही धूळ चारणारे हे इंग्रजी सन्य. त्यात इंग्रजांनी यशवंतरावांवर कोण सोडला तर जनरल जेरार्ड लेक. अत्यंत अनुभवी आणि कडवा सेनानी. त्याला यशवंतरावांनी भरतपूरच्या युद्धात धूळ चारली. त्याचा पराभव हा इंग्रजांच्या जिव्हारी लागणारा होता. जनरल स्मिथ, कर्नल मोन्सन, मरे, फोसेटसारख्या दिग्गजांचा पराभवही यशवंतरावांनी लीलया केला. याचे कारण म्हणजे यशवंतरावही आधुनिकतेचे भोक्ते होते. इंग्रजांएवढी नसली तरी त्यांच्या सैन्याला त्यांनी पाश्चात्य शिस्त लावली होती. पेंढाऱ्यांसारख्या तशा बेशिस्त आणि बेबंद सन्यालाही त्यांनी आपल्या कडव्या शिस्तीच्या जोरावर कह्य़ात ठेवले होते. *उज्जैन व पुण्यावरील मोठय़ा विजयानंतरही त्यांनी पेंढाऱ्यांना शहरे लुटू दिली नाहीत. ज्यांनी प्रयत्न केले त्यांना हात-पाय तोडायच्या शिक्षा दिल्या. इंग्रजांनीही त्यांच्या या कठोर शिस्तप्रियतेचे कौतुक केले आहे.* 

अहिल्याबाई व नंतर तुकोजीरावही गेल्यानंतर होळकरांचे राज्य बेवारस असून ते गिळता येईल असाच दौलतराव व बाजीराव पेशव्यांचा होरा होता. आणि ते शक्य केलेही. पण यशवंतराव एवढे पराक्रमी निघतील व जप्त केलेले होळकरी राज्य ते परत जिंकून घेतील याचा त्यांना अदमास आला नाही.

तत्कालीन िहदवी राज्यकर्त्यांमध्ये आस्तित्वातच नसलेले यशवंतरावांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे *त्यांना उमगलेली राष्ट्रभावना. यशवंतरावांसमोर फक्त स्वत:चे राज्य कधीच नव्हते.. तर संपूर्ण देश होता.* त्यासाठी ते सर्व राजेरजवाडय़ांना, िशदे-भोसलेंना जी पत्रे धाडत होते त्यातील राष्ट्रीयता दाहक आहे. ते पत्रांत म्हणतात..*‘पहिले माझे राष्ट्र, माझा देश. आज धर्म, जात, प्रदेश याच्यापलीकडे जाऊन देश-राष्ट्रहित पाहण्याची गरज आहे.* माझ्यासारखेच तुम्हा सर्वाना इंग्रजांविरुद्ध संघर्षांने युद्धास उभे राहिले पाहिजे.’ पुढे यशवंतराव भोसलेंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘पूर्वी स्वराज्यात ऐक्यता बहुत. येणे करोन आजपावेतो व्यंग न पडता एकछत्री अंमल फैलावला होता..’ स्वराज्याची आठवण करून देत यशवंतराव पुढे तेच स्वराज्य घरापुरते करण्यात जमीनदार ते सरदार कसे गर्क झाले आहेत ही कटु वस्तुस्थिती विषद करत खंत व्यक्त करतात. *यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गव्हर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली.*

कलकत्त्यावर आक्रमण करून एकटय़ाच्या जिवावर भारत स्वतंत्र करण्याची त्यांची उमेद अखेरच्या क्षणापर्यंत अभंग होती. मला वाटते कोणत्याही महाकवीला स्फूर्ती देईल असेच हे वादळी जीवन होते. दुर्दैवाने २८ ऑक्टोबर १८११ रोजी ऐन तारुण्यातच वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी  त्यांचे निधन झाले. असा महान  पहिला  स्वातंत्र्ययोद्धा  आपल्या धर्तीवर जन्माला आला हे आपले भाग्यच आहे. त्यांना पुण्यस्मरण  दिनानिमित्त विनम्र अभिवादन!


*संजय सोनवणी*
9860991205

सोमवार, ७ जून, २०२१

काही आठवणी बाबासाहेबांच्या*

*काही आठवणी बाबासाहेबांच्या*         *वाचल्या सिवाय डीलिट करु नका*

मघाशी बाबासाहेबांची आठवण म्हणून मी एक पोस्ट केली होती,बाबासाहेबानी राष्ट्रपतीपदाचा अर्ज नाकारला, बऱ्याच जणांनी बाबासाहेबांचे असे माहीत नसलेले पैलू वाचायला आवडतील असे मत व्यक्त केले, म्हणून लागलीच हे लिहायला घेतलं, 

*राष्ट्रपती पद नाकारणारे बाबासाहेब*

"डॉ.बाबासाहेब आंबेडकर  आणि विनोद",या पुस्तकाचे लेखक,प्राध्यापक,दामोदर मोरे,आणि पुणे विद्यापीठ कुलगुरू डॉ.नरेंद्र जाधव यांचे"डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वसमावेशक सामाजिक धोरण" या विषयावर सह्याद्री चॅनलवर "सखी-सह्याद्री" या कार्यक्रमात चर्चासत्र घेतले होते,त्यावेळी प्रा.दामोदर एक महत्वाची आठवण सांगतात की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शताब्दी वर्षांमध्ये डॉ.माईसाहेब आबेडकर यांची मुंबई दुरदर्शनला मुलाखत घेतली होती,आणि त्यानंतर प्रा.मोरे, माईसाहेबांसोबत उत्तर भारताच्या प्रवासासाठी गेले होते,त्यावेळी प्रवासादरम्यान बाबासाहेबांच्या आठवणी त्या सांगत होत्या.

अशीच एक आठवण सांगताना त्या म्हणाल्या की,भारताच्या पहिल्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होती,त्यावेळी नेहरु प्रधानमंत्री होणार होते,पण,स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती बाबासाहेबानी व्हावे अशी नेहरूंची इच्छा होती,आणि त्यामुळे नेहरूंनी बाबासाहेबांना फोन केला,त्यावेळी बाबासाहेब घरी नव्हते,नंतर नेहरूंनी घरी उमेदवारी अर्ज पाठवला,बाबासाहेब घरी आल्यानन्तर माईसाहेब म्हणाल्या की,तुम्ही तो नेहरूंनी पाठवलेला राष्ट्रपती पदाचा अर्ज भरून पाठवा,त्यावेळी बाबासाहेब काहीच म्हणाले नाहीत,शांत होते,पुन्हा नेहरूंचा फोन आला,तेव्हा माईसाहेबांनी,बाबासाहेबांना तो अर्ज भरून पाठविण्याची आठवण करून दिली,शांत असलेले बाबासाहेब अचानक उसडून उभे राहिले आणि म्हणाले *माझी लायकी पंतप्रधान होण्याची आहे मला स्टॅम्प व्हायचे नाही.*

बाबासाहेबांचा स्वतःच्या ज्ञाना विषयीचा आत्मविश्वास आपल्याला इथे दिसून येतो,

बाबासाहेब हे नाव इतकं जिवंत आहे की,एखादा प्रसंग लिहिताना,वाचताना किंवा सांगताना आपल्या समोर ते चित्र उभं राहतं, आणि आपण ही त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत असे वाटू लागतं, बाबासाहेबांचे जीवन संघर्षमय होतेच पण त्यापेक्षा बाबासाहेबानी आणि रमाईंनी समाजासाठी फक्त त्याग केला.त्या त्यागाची आठवण म्हणून दोन किस्से सांगतो. एक विनंती करतो,खालील दोन्ही प्रसंग वाचताना तुम्ही अगदी जवळ उभे राहून हे सगळं पाहताय,या घटनेचे तुम्ही ही साक्षीदार आहात या दृष्टीने वाचा,तर आणि तरच बाबांचा त्याग तुम्हाला लक्षात येईल.

बाबासाहेबांना गोलमेज परिषदेसाठी लंडनला जायचे होते, परंतु त्याच दिवशी त्यांचा मुलगा राजरत्न याचे निधन झाले, बाबासाहेबांचे मोठे बंधु बाबासाहेबांना म्हणाले,"भिवा,तू कोठे चालला आहेस? राजरत्न आता राहिला नाही. बाबासाहेब सुन्न झाले होते, रमाईची अवस्था ही रडून-रडून वाईट झाली होती, काहिक्षणात स्वतःला सावरून बाबासाहेब म्हणाले,"जर मी लंडनला पोहचलो नाही तर,करोडो अस्पृश्य जनतेच्या हक्कांची आणि अधिकारांची हत्या होईल"...मी एका मुलासाठी माझ्या करोडो मुलांना नाही मारू शकत" 
हा प्रसंग जेव्हा डोळ्यासमोर येतो,तेव्हा आपसूकच डोळे डबडबतात..

दुसरा प्रसंग असा की,बाबासाहेबानी ग्रंथासाठी राजगृह बांधले,पण ते बांधताना बाबासाहेबाना किती अडचणींना सामोरे जावे लागले याची आपल्याला कल्पनाही नसेल, राजगृह बांधताना त्या भवन निर्मात्या कारागिराला बाबासाहेबानी आधीच बजावले होते की,एकूण खर्च किती येईल ते आताच सांग,नंतर असे व्हायला नको की,जास्तीचे पैसे लागतील आणि ते माझ्याजवळ द्यायला नसतील,आणि घडलेही तसेच कारागिराने अतिरिक्त चाळीस हजार मागितले,पण बाबसाहेबांकडे त्याला द्यायला पैसे नव्हते,तेव्हा त्याने बाबासाहेबांना नोटीस पाठवली,ही आठवण सांगताना माईसाहेब म्हणतात की,आम्ही तळघरात बसलो होतो,तेव्हा मी बाबासाहेबांना विचारले की,हे चाळीस हजार फीटणार कसे? त्यावेळी बाबासाहेब ढसा-ढसा रडू लागले,त्यांना रडताना पाहून मी ही रडू लागली"

बाबासाहेबानी त्यावेळी समाजाकडे एक-एक रुपया जरी मागितला असता तर हे पैसे अगदी सहज फिटले असते,पण बाबासाहेबांचा तो स्वभाव नव्हता,आपल्या फाटलेल्या आयुष्याची भोकं शिवलेल्या,आपल्या आयुष्याचं सोनं केलेल्या आपल्या बापाला त्यावेळी असं रडावं लागलं हे लिहिताना डोळे ओले झालेत, त्यागाचे जिवंत उदाहरण म्हणजेच आपला बाप अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आपली आई रमाई...

*रमाई आणि बाबासाहेब.*(अंतिम क्षण)
रमाईचा ताप वाढला होता डॉक्टर निदान करत होते तपासणी आणि गोळ्या देऊन डॉक्टर निघाले तेवढ्यात मी उठलो त्यांची बॅग घेतली आणि विचारलं... डॉक्टर साहेब  बरी आहेना तब्येत आता रामूची डॉक्टरांनी दीर्घ श्वास घेतला. आणि म्हणाले आंबेडकर रमाबाई अर्धउपाशी राहायच्यात त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती नष्ट झाली आहे बऱ्याचदा आपण काही काम करतो थकवा आल्यानंतर भूक लागते आणि आपण शरीराला हवं तेवढं अन्न सेवन करतो, पण रमाबाईंनी कष्ट घेतले पण परिपूर्ण आहार घेतला नाही कदाचित यामुळेच त्या ह्या अवस्थेत आहेत काळजी घ्या.
डॉक्टर आले आणि निघून गेले पण विचारांचं चक्र सुरु झालं. एकामागे एक चार मूल गेली पण माझ्या शिक्षणावर कधीच परिणाम होऊ दिला नाही.
 खूप कष्ट घेतले पोटाला मारून पै पै जमवली माझ्या शिक्षणासाठी कसे फेडायचे तिचे उपकार काही कळत नाही.
खंत तर एकच आहे की तिला सुख देता नाही आलं.
मी रमा जवळ गेलो रमाचे डोळे डबडबले होते.
मी तिचा हातात हात घेतला आणि म्हटलं लवकर बरी हो तुला अजून चांगल्या दवाखान्यात न्यायचं आहे.
 रामू म्हणाली साहेब आता त्याची आवश्यकता नाही माझी जाण्याची वेळ आली.
साहेब मी अनेक मृत्यू पाहिले मला मृत्यूची भीती वाटत नाही.
 माझे आईवडील तुमचे आईवडील आणि आपले चार मुले बाहेर पाऊस सुरु होता भायखळाच्या बाजारात पाऊस सुरु झाला तेव्हा रमाचा हात माझ्या हातात होता आजही पाऊस सुरु आहे. 
तेव्हा पाऊस सुरु होता तेव्हा रमाने माझा हात घट्ट पकडला होता.आणि आज तोच हात थरथरत होता.जिथून तिच्या आणि माझ्या जगण्याचा प्रवास सुरु झाला त्याच एक एक चित्र डोळ्यासमोर येत होत.
चार मुलांना दिलेली माती कुटुंबाचा गाडा ओढताना तिची झालेली धावपळ.
मी कुठे ही गेलो तरी अगदी मानाने ओवळणीचे ताटं घेऊन ओवळणारी माझी रमा डोळ्यासमोर येत आहे. खूप आक्रोश करावा आणि ओरडाव की,रमा उठ अजून तुझ्या साहेबाला खूप जिंकायचं आणि अजून तुझी गरज आहे मला.
 उठ आणि हस एकदा पाठीवर हात ठेवून म्हण मला की साहेब मी सदैव तुमच्या पाठीशी आहे.
माझा एकदा सत्कार होता सत्कार सुरु होता पण माझी रामू मला नजरेस पडत नव्हती सत्कार समारंभ संपणार तेवढ्यात रामू दिसली आणि तिच्या अंगावर शाहू महाराजांनी मला भेट दिलेला फेटा दिसला माझी रमा तो फेटा नेसून आली होती. 
आणि तेव्हा कळालं मला की माझी रामू आतापर्यंत का दिसली नाही.
माझ्या रामुला एक चांगल लुगडं घालायला नव्हतं जेव्हा घरी गेलो तिने पाट टाकला त्यावर बसलो ती ओवाळत होती.
आणि मी तिच्या चेहऱ्यावरचा आंनद पाहत होतो.
खरंतर मी जे घडलो किंवा काही करू शकलो रामुमुळे. 
माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते थरथरत्या हाताने रमाने ते अश्रू पुसले आणि म्हणाली साहेब मी जेव्हा नसेल तेव्हा निराश होऊ नका,
आपला जो समाज आहे त्यांच्यासाठी खूप काही करा. कारण हा समाज आपल्या चार मुलाचं बलिदान कधी विसरणार नाही. 
रमा बोलत होती समाजाबद्दल तिच्या शब्दात तळमळ होती बोलता बोलता माझी रामू शांत झाली.
रामू रामू रामू रामू रामू,
 मी ढसाढसा रडू लागलो मी पोरका झालो माझं सर्वस्व मला सोडून गेल. 
साहेब थोडी विश्रांती घ्या अस म्हणणार तो आवाज कायम शांत झाला.
 मी डोक्याला हात लावला मी हरलो होतो,
 माझं जग पोरक झालं सगळं सुनेसुने वाटू लागलं. जीवनातील गोडी संपली होती कारण साहेब कधी रमाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
 तिला अग्नी देताना अंतःकरण जड झालं अजून, 
अन आतून आक्रोश होता रामू आणि रामू.
रामू गेली होती साहेबाला एकटं सोडून, 
कायमची दूर निघून..….....
         
     *हिंदू कोड बिल*
" बाबासाहेब दिल्लीवरून नेहरूंची तार आली आहे ते म्हणतायेत की,
हिंदू कोड बिल ला देशात सर्वत्र विरोध सुरू आहे.
त्यामुळे हे बिल संसदेत पारित होणार नाही.
" स्त्रियांच्या शैक्षणिक,घटस्फोट आणि पुनर्विवाह या मागण्यांना प्रचंड विरोध आहे.
" देशात जर स्त्रियांना हे हक्क जर यावेळी दिले तर देशात  असहिष्णुता जन्म घेईन आणि नव्या वादाला वाचा फुटेल. 
त्यामुळे देशात स्थेर्य राखण्यासाठी सदर बिल आम्ही रद्द करीत आहोत....
" तुमच्या स्त्रियांच्या उन्नतीच्या तळमळीला आम्ही समजू शकतो आमच्या या निर्णयाला तुम्ही ही समजून घ्या.....
"" बाबासाहेब रागावले,क्षणभर विचार केला.
" आणि ते नेहरूंना लिहतात...
स्त्रियांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळावे म्हणून हे बिल मी संसदेत मांडले होते परिणामी ते पारित न होता खारीज होत आहे याचे मला अतोनात दुःख होत आहे...
खरंतर स्त्रियांच्या प्रगतीसाठी मी मंत्रिमंडळात सहभागी झालो होतो... स्त्रियांना मूलभूत अधिकार देणे हाच माझा हेतू होता परिणामी तो जर सफल होत नसेल तर मी माझ्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा देत आहे तो स्वीकार करावा ...... कळावे....
देशातल्या बहुधा स्त्रियांना हे माहित नसेल की त्यांच्या अधिकारासाठी जे आज मिळत आहेत त्यासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारे प्रथम व्यक्ति हे बाबासाहेब होते......
ते स्वंतत्र भारतातील पाहिले कायदेमंत्री होते...
" पहिले राष्ट्रपती, पाहिले पंतप्रधान सगळं काही लक्षात असेल तर पहिल्या कायदेमंत्र्यांचे विस्मरण होणे दुःखदायक आहे........! 
नंतर हे बिल एकूण चार टप्यात पास करण्यात आले.
"वर्षानुवर्षे केवळ चूल आणि मूल यात बंदिस्त असणारी स्त्री मुक्त झाली........!! 

*बाबासाहेब आणि रमाई काही क्षण*
          अनेक प्रतिनिधिकडून बरीच पत्रे आली होती.. सगळ्या पत्रांना उत्तर देणे शक्य नव्हतं.. पण एखादं महत्वाचं पत्र सुटू नये म्हणून.. नजरेखालून काढत होतो हल्ली पुस्तकात मन रमत नाही हल्ली जेवायची इच्छा मरूनच गेली.. रामू अंथरुणावर खिळली होती तिचं शरीर क्षीण झालं होतं आणि तिच्या त्या आजारपणाने माझ्यावर खूप दडपण आहे...! मला अजून आठवतो तो भायखळाचा बाजारातील दिवस ज्या दिवशी रमा माझ्या आयुष्यात आली नुकतच  लग्न लागलं आणि पाऊस सुरु झाला रमा भिजली होती आणि मी ही एक टोपली डोक्यावर घेऊन आम्ही दोघे उभे होतो..! नऊ वर्षाची रमा माझ्याकडे बघत होती आणि मी तिच्याकडे.. संसार सुरु झाला आणि मग हळूहळू रमा मला कळत गेली माझी रामू म्हणजे रामू आयुष्याचं सोन केलं माझ्या मी परदेशात शिकायला गेलो सारा संसाराचा गाडा एकटीने ओढला आणि एवढं असून सुद्धा माझी रमा पैसे पाठवत राहिली.
माझ्या रामुन कधी आयुष्यभर मला दागदागिना मागितला नाही..! खूप नम्र स्वभाव तिचा साहेब साहेब म्हणून नेहमी माझ्याभोवती असायची माझी सावली..!
एकदा तर तिला ताप आला होता आणि मी विचारलं गोळी वगैरे घेतली का तर ती नाही म्हणाली बाहेर पाऊस सुरु होता आणि तिचा ताप वाढत चालला होता मी तसाच छत्री न घेता बाहेर पडलो मेडिकल वर आलो गोळी घेतली आणि रामुला म्हटलं ही गोळी घे रामू म्हणाली एवढ्या पावसात का गेले आजारी पडले तर मी नाही घेणार गोळी एवढ्या पावसात जाण्याची काही गरज नव्हती ती रुसली होती माझ्यावर मग मी तिला रागाने म्हटले गोळी घे आणि जर तू नाही घेतली तर मी कपडे बदलणार नाही रामू हसली आणि म्हणाली तुमच्या सोबत मला भांडताच येणार नाही तुम्ही खूप जिद्दी आहे...! 
जेव्हा इंदू गेली तेव्हा मी परदेशात होतो तिने मला पत्राने कळवलं पण आईला काय वेदना होतात हे तिच्याशिवाय कोण जाणनार...! रमा मला कायम स्फूर्ती देत आली साहेब तुम्ही शिका मोठे व्हा अन समाजाचं भलं करा..
मी त्यात लै खुश आहे... बाया म्हणतात मला तुझ्या गळ्यात सोन नाणं नाही पण एक सांगू साहेब तुम्हाला तुम्ही इतके शिकेल हायसा की मला लै अभिमान आहे तुमचा.. तिचे हे शब्द आठवले की काळीज भरून येते..! 
रामू आजारी असल्यापासून मी दर क्षणा क्षणाला तिची विचारपूस करत आहे तिला काही होणार तर नाहीना.. तिला जर काही झालं तर हा भीमा एकटा होईल नाही नाही ही कल्पना सहन होत नाही रामुला काही होणार नाही मी तिला अस एकटीला सोडून जाऊ देणार नाही..
ती वेडी मला सोडून जाऊ शकत नाही मला सोडून जाण्याअगोदर तिने विचार करावा... तिला माहित आहे मी तिच्याशिवाय अपूर्ण आहे रमा नसेल तर भीमाला काय अर्थ...! खरंच मी एकटा तर होणार नाही...! 
रामू ने खूप त्रास सहन केला मी तिची ओंजळ सुखाने भरणार आहे.. मी रामुच्या खोलीचा दरवाजा उघडला रामू हसली मी तिच्या जवळ जाऊन बसलो खाटेवर असलेली रामू मी तिचा हातात हात घेतला आणि त्या खाटेवर डोकं ठेवून रामुजवळ बसलो डोळे माझे भरून आले आहे आणि रामू माझ्याकडे बघून स्मितहास्य करत आहे...! 

*रमाई आणि बाबासाहेब.... परत एकदा*
                        
रमाबाई कंदीलाची वात कमी करत.. खोलीभर पसरलेला लख्ख प्रकाश मंद केला..आणि बाबासाहेबासमोरील पुस्तक उचलून घेतलं.. बाबासाहेब म्हणाले अरे रमा एक पान वाचू तर द्यायचं..! रमाबाई हसत म्हणाल्या झोपा आता थोडं शांत.. बाबासाहेबानी डोळ्यावरचा चष्मा काढत रमाबाईकड पाहिलं आणि म्हणाले रामू मलाही वाटत मी शांत झोपावं पण लहानपणी जातीमुळं वर्गात बसता नाही आलं.. वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं ग मला..! शाळेत त्या माठातील पाणी पिता आलं नाही केवळ जातीमुळं कधी बालमित्रांसोबत सहभोजन करता नाही आलं केवळ जातीमुळं.. आणि हो ह्या माझ्या साऱ्या समाजाचा आक्रोश त्यांच्यावर झालेले अमानुष अत्याचार मी डोळे बंद केले की, मला ऐकू येतात मला न्याय मागतात. तूच सांग अश्यावेळी मी शांत झोपू शकेन..
बाबासाहेंबांच्या शब्दात समाजाप्रती अतोनात प्रेम होत..
ते रमाबाईला दिसलं.. रमाबाईंनी परत खोलीत मंद केलेला कंदीलाचा प्रकाश लख्ख केला उचलले पुस्तक परत बाबासाहेबाना दिलं आणि वाचा म्हणाली..!! 
रमाबाई म्हणजे नुसता त्याग पोटची चार पोर नजरेसमोर मेली पण बाबासाहेंबाच्या अभ्यासावर कुठलाही परिणाम होऊ दिला उपाशी राहिली पण कधी त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ दिला नाही...! रमाबाईंनी दिलेले पुस्तक त्याची पाने वाचत असताना बाबसाहेबांच्या चेहऱ्यावर मंद स्मितहास्य आलं.. पुस्तक देऊन आणि कंदीलाचा प्रकाश लख्ख करून झोपी गेलेल्या रमाबाईंच्या त्या निरागस चेहऱ्याकडे बाबासाहेब पाहत होते आणि मग हळूच डोळे डबडबले आणि बाबासाहेब म्हणाले मनाशीच रामू तू सोबतीला आहे म्हणून कसलीही चिंता नाही मला...!! रमाबाईंच्या डोक्यावरून हात फिरवत बाबासाहेबानी रमाबाईंच्या अंगावरील पांघरून व्यवस्थित केलं..!! आणि कंदिलाच्या प्रकाशात हातात पुस्तक परत पुस्तक घेतलं..!! 
 "आणि ते विद्वान परत ते राहिलेलं पान वाचू लागले अन रमाई साहेबांकडे बघत थोडीशी हसली ...
आजच सुख "आई बाबा तुमच्या त्यागामुळे…......

*पुणे करार*
खरं तर स्वंतत्र मतदार संघ बाबासाहेबांची मागणी रास्त होती.
"गेल्या अनेक वर्षापासून इथला वंचित समाज हा राजकीय भूमिकेपासून वंचितच आहे.
त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी हक्काचा प्रतिनिधी हवा आणि असायलाच हवा त्याशिवाय गंत्यतर नाही.
गेल्या कित्येक वर्षापासून इथला शोषित पिढीत समाज लाचारीचे जीवन जगत आला आहे.
" त्यांच्या शैक्षणिक,राजकीय हक्कावर इथले " काही विखारी लोक फणा मांडून बसले आहेत....
आणि ढोंग करून डोळ्यात दोन सहानुभूतीचे अश्रू आणून कोरड्या आणि नाटकी मायेला मातृत्व लाभत नाही....
गांधी कितीही बोलत असले तरी ते अस्पृशांचे कैवारी नाहीत त्यांना अस्पृशांची राजकीय भूमिका नकोच आहे.
"पण हा खटाटोप अस्पृश्याना स्वंतत्र मतदार संघ मिळू नये म्हणून गांधीने जे आमरण उपोषण केले ते मात्र बाबासाहेबांना मान्य नव्हतं.....
गोलमेज परिषेदेच्या वेळेस  गांधीजींना भेटण्यासाठी बाबासाहेब गेले असताना गांधी हे गृहस्थ काहीच बोलले नाही त्यावेळी ते सूत विणत होते.
आणि म्हणाले तर एक मला अस्पृश्याना काही द्यायचे नाही... ही असूया का?
 पुणे कराराच्यावेळी महात्मा गांधींचे प्राण वाचविण्यासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले.. तेव्हा त्यातील एक गृहस्थ पुढे आले आणि बाबासाहेबाना म्हणाले की, आंबेडकर अहो बापूच्या प्राणापेक्षा काही मोठे नाही. अटी मान्य करून, करून टाका करार. तेव्हा बाबासाहेब म्हणाले मला फासावर चढवा पण माझ्या समाज हिताच्या आड जाऊ नका.  ज्यात माझ्या समाजाचे हित नसेल तो करार मी कधीच मान्य करून घेणार नाही. 
"मी माझं वैयक्तीक सुखाचा त्याग करू शकतो बापूसाठी.. ते महत्वाचे आहेत देशासाठी...
पण माझा समाज मला त्यांच्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे...बाबासाहेब म्हणाले......
" पण अखेर करार मान्य झाला,
अस्पृश्याना स्वंतत्र मतदार संघ न देता राखीव मतदार संघ देण्यात आला....
" त्यावेळी बाबासाहेबांनी कदाचित माघार घेतली नसती तर,
गांधींचे प्राण कधीच वाचले नसते.
" एक उरलेला पर्याय म्हणून बाबासाहेबांनी तो करार काही अटीसह मान्य केला...! 

*अर्थ प्रशासक बाबासाहेब*

मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी घेतल्यानंतर,बाबासाहेब अमेरिकेला गेले व कोलंबिया विद्यापीठातून १९१५ साली, एम.ए. ही पदवी मिळवली  व त्याच विद्यापीठातून १९१७ साली त्यांनी अर्थशास्त्रात पी.एच.डी. ही पदवी मिळवली,नंतर ते इंग्लंडला गेले तेथून बॅरिस्टर पदवी मिळवली. नंतर, लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स या जगविख्यात संस्थेतून त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स ही अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी मिळवली, त्यामुळे आपल्या देशात सर्वोत जास्त शिक्षित अर्थतज्ञ व अर्थप्रशासक जर कोणी असतील तर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरच, अमर्त्यसेन नाही..

*गांधी नेहरूंचा जीव वाचविणारे देशप्रेमी बाबासाहेब*

१९४२ ला गांधीजींनी चलेजाव आंदोलन सुरू केले होते,ही गोष्ट चर्चिलला समजली व त्याने भारतातील ब्रिटिश सरकारला व्हाइसरॉय कौन्सिल घेवुन एक ठराव पास करायला सांगितले, तो ठराव असा होता की,भारतातील पुढारी स्वातंत्र्याची मागणी करीत आहेत,ती देशद्रोहाची मागणी आहे,त्यामुळे अशा पुढार्यांना काळ्यापाण्याच्या शिक्षेसाठी पाठविले जाईल" या कौन्सिलचे बाबासाहेब आंबेडकर ही सदस्य होते,तसे त्यात अनेक ब्रिटिश व काही भारतीय असे सदस्य होते. बाबासाहेब या कौन्सिलमध्ये उपस्थित होते, त्यांनी या ठरावाला जोरदार विरोध केला,आणि म्हणाले की,ब्रिटन हा लोकशाहीवादी देश आहे आणि जर का तुम्ही हा ठराव पास कराल तर, ब्रिटनच्या लोकशाहीला लागलेला हा कलंक असेल,तरीही ब्रिटिश व्हाइसरॉय कौन्सिल ऐकत नव्हती, ठराव पास करीत होते, त्यावेळी बाबासाहेबानी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा त्या बैठकीत ठेवला.आता बाबासाहेबांचा राजीनामा म्हणजे कोणी ऐऱ्यागैरयाचा राजीनामा नव्हता, कारण या मंत्रिमंडळात बाबासाहेबांकडे १)मजुरमंत्री २) PWD ( पब्लिक वर्क डिपार्टमेंट) ३) वॉटर मॅनेजमेन्ट ४) ऊर्जा (पॉवर मॅनेजमेंट) ५) मिनरल्स मॅनेजमेंट ..इत्यादी खाती होती.त्यामुळे त्यावेळचे व्हाइसरॉय लिनलिथगो यांनी हा ठराव मागे घेतला.

जर हा ठराव पास झाला असता तर काय झालं असतं? याचा विचार बाबासाहेबांच्या देशभक्तीवर आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी बाबासाहेबानी काय केले? असे उपटसुंभ प्रश्न  विचारणार्यांनी जरूर करावा. हा ठराव पास झाला असता तर, नेहरू व गांधीना अंदमान मध्ये काळ्यापाण्याची शिक्षा झाली असती, आणि स्वातंत्र्य चळवळीतील या नेत्यांना जर शिक्षा झाली असती तर स्वातंत्र्यलढ्याचे काय झाले असते? याचा ही विचार करावा, शेवटी या दोन्ही नेत्यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेवर न पाठवता नेहरूंना नगरच्या तुरुंगात तर गांधींना येरवड्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले.

एकीकडे इंग्रजांशी सनदशीरपणे भांडून आपले हक्क घेणारे व दुसरीकडे आपल्या समाजबांधवांच्या उद्धारासाठी अहोरात्र झटणारे व स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचे प्राण वाचवून देशाच्या स्वातंत्र्याचा व ऐक्याचा विचार करणारे आपले बाबासाहेबच होते

*बाबासाहेब आणि गांधी गोलमेज परिषेद*
होय मी गांधी विरोधी आहे बाबासाहेबांचे उदगार
त्याला कारणही तसंच आहे. मी गांधींचा विरोध करतो ते माझ्या स्वार्थासाठी नाही.. गांधी विश्वासघातकी आहेत याचे माझ्याकडे पुष्कळ पुरावे आहेत.. गांधीना मी विश्वासघातकी का म्हणतो कारण राऊंड टेबल कॉन्फरणसाठी हिंदुस्थानातील दलितवर्गाचा प्रतिनिधी म्हणून इंग्लडला जाण्यापूर्वी मी गांधीना भेटलो होतो..
त्यावेळी गांधी म्हणाले मी अस्पृश्याना स्वतंत्र जागा देण्यास माझा विरोध आहे..
दुसऱ्या वर्तुळ परिषेदेला जेव्हा बाबासाहेब गेले तेव्हा सरोजिनी बाईंनी बाबासाहेबाना गांधीजीकडे नेले.. गांधीजींना अस्पृश्याचे म्हणणे समजून घ्यायचे होते..
रात्रीचे 10 वाजले होते.. बाबासाहेब पोहचले तेव्हा गांधी चरखा चालवत होते.. बाबासाहेब बोलत होते तेही दीड तासापासून तेवढ्या वेळेत गांधीजी एक शब्दही बोलले नाही. शेवटी त्यांचा चरखा थांबल्यावर बाबासाहेब उठले तेव्हा गांधी म्हणाले मी तुमचे बोलणे ऐकले आहे, मी जरूर विचार करेन.
पुढे बाबासाहेबाना निरोप आला की सर्व अल्पसंख्याक प्रतिनिधीला गांधीने बोलावले आहे आणि जेव्हा सगळे प्रतिनिधी गोळा झाले तेव्हा गांधीजी प्रत्येकाला विचारत होतो की कुणाला काय पाहिजे तेव्हा सगळ्यांनी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. बाबसाहेबांनीही आपल्या मागण्या मांडल्या..
तेव्हाही गांधी म्हणाले मी सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे पण मला अस्पृश्याना काही द्यायचे नाही..
जातीभेद करणारा महात्मा ठरू शकतो का? नेहमी अस्पृश्याबद्दल अन्याय करणारा गांधी राष्ट्रपिता कसा ठरू शकतो. 
      
*रामजी बाबा आणि बर्फी.....!!*
          
बाबांची तब्येत बरोबर नाही...! 
बातमी मिळताच मी बडोद्यावरून  निघालो.
डोक्यात विचारचक्र सुरू झालं....! 
आणि राहिलेत अनेक चित्र डोळ्यासमोर, 
एका ब्राम्हण शिक्षकाने मला संस्कृत शिकविण्यासाठी नकार दिला आणि ते त्वेषाने म्हणाले,
की तुझ्याकडून मला ती भाषा अपवित्र करायची नाही.
मी रडत रडत घरी आलो.
बाबा अंगणात होते मला रडण्याच कारण विचारलं..
मी उत्तर दिलं,
मला संस्कृत शिकविण्यासाठी शिक्षकांनी नकार  दिला...
पाठीवर हात ठेवत बाबा म्हणाले---
रडू नकोस भिवा...
तू वाघाचा पोरगा आहे.
डोळे पूस अगोदर..! 
तो पाठीवरचा प्रेमळ स्पर्श मला आजही आठवतो.
माझी जी जडणघडण जी झाली ती केवळ माझ्या वडिलांमुळे---
पुस्तके विकत घेण्यासाठी जेव्हा माझ्याकडे पैसे नसायचे आणि माझी ज्ञानाची भूक बघून माझे वडील---
माझ्या आईचे दागिने गहाण ठेवत असत आणि पैसे आले की सोडवून आणायचे---
माझे बाबा म्हणजे शिक्षणाचे पुरस्कर्ते होते..
आम्हाला संध्याकाळी कबिरांचे दोहे म्हटल्याशिवाय जेवायला मिळत नसे.
बाबांची शिकवण ती! 
रेल्वे स्थानकावर बर्फीची दुकान होती आणि मी बाबांना बर्फी आवडते म्हणून मी   स्टेशवर उतरलो आणि त्या 
घाईत माझी रेल्वे सुटली...! 
तेव्हा मला स्वतःचा खूप राग आला पण बाबांना बर्फी आवडते म्हणूनच उतरलो ना मी..--
रात्री खूप उशिरा गाडी लागली आणि जेव्हा घरी पोहचलो तेव्हा--
केवळ माझ्यासाठी श्वास थांबवून ठेवले होते..
मी पिशवीतली बर्फी काढली एक तुकडा मी चारत असताना आणि मृत्यूच्या दारात असताना मला बघून त्यांचे डोळे आंनदाश्रूने भरून आले....! 
हातात हात घेतला आणि मायेने हात फिरवत म्हणाले की 
भीमा मला आणि या समाजाला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत----
पूर्ण कर....!!
आणि एवढं बोलून माझे बाबा निघून गेले या जगातून कायमचे आणि माझ्यात राहिलेत---
त्यांची शिकवण त्यांची प्रेरणा, त्यांचं शिक्षणप्रेमी बनून अगदी कायमचे

मंगळवार, २३ मार्च, २०२१

झोपेचे फायदे झोप दिनानिमित्त

झोप!...
शास्त्रज्ञांनी अशी एक उपाययोजना शोधली आहे की जी तुम्हाला दीर्घायुषी बनवते, तुमची स्मृती, सर्जनशीलता वाढवते, तुम्ही बारीक राहता, जास्त लक्षवेधक दिसू |लागता. ही उपाययोजना तुम्हाला सर्दी, फ्लूपासूनच नाही तर कर्करोग आणि स्मृतीभ्रंशापासून देखील वाचवू शकते. हृदयविकार, पक्षाघात, मधुमेह होण्याचा धोका कमी करते आणि तुम्हाला जास्त आनंदी आणि तणावमुक्त ठेवते..

काहींना हे वर्णन अतिरंजित वाटेल, पण यातला प्रत्येक शब्द शास्त्रीय चाचणीवर खरा उतरलेला आहे. ही बातमी ना रंजक द्रव्याची आहे ना कुठल्या जादूई औषधाची! ही आहे आठ तासांच्या शांत झोपेमुळे मिळणाऱ्या फायद्याची! आपण मात्र आज या आठ तास झोपेला फारसे महत्त्व देत नाही, ती नियमित घेत नाही आणि खरं सांगायचं तर कित्येकांना ‘ती’ येतही नाही. ती म्हणजे, झोप!

झोप म्हणजे फक्त जागेपणाचा अभाव असा अर्थ होत नाही. ती एक खूप गुंतागुंतीची, चयापचय असलेली प्रक्रिया आहे. झोप सर्वानाच अवश्यक आहे. आपल्या मेंदूत एक घड्याळ असतं, जे अंधार, प्रकाश किंवा तापमानातील बदल यावर चालतं. ‘सरकाडियन ऱ्हिदम’ (circadian rhythm) म्हणतात याला. हे घड्याळ वसलेले असते ‘सुप्राकयाझमॅटिक नुक्लियस’ नावाच्या मेंदूच्या छोट्याशा भागात. सुप्रा म्हणजे वर आणि कयाझमा म्हणजे क्रॉसिंग. हा भाग डोळ्यातून संवेदना घेऊन येणाऱ्या दोन नसांच्या क्रॉसिंगच्या वर असल्यामुळे डोळ्यांतून आलेल्या प्रकाश संवेदना त्याला लगेच कळतात. संध्याकाळ झाली की हे घड्याळ मेलॅटोनीन नावाचा एक दूत मेंदूकडे पाठवते. तो इशारा देतो की, ‘अंधार होतोय, झोपेची वेळ झाली’.

प्रत्यक्ष झोप अडिनोसिन नावाचे रसायन आणते. जशी याची मात्रा वाढते मेंदूत एक प्रकारचा झोपेचा दबाव निर्माण होतो आणि झोप लागते. दिवस उजाडल्यावर प्रकाशाची संवेदना डोळ्यांतून मेंदूकडे जाते. मेलॅटोनिनचे स्रवणे बंद होते. मेंदूला उठण्याचा इशारा मिळतो. मेंदूतील घड्याळ आणि झोपेसाठीचा दबाव हे झोप लागण्यासाठीचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. झोपेला घालवण्यासाठी लोक कॉफी पितात. कॉफीत कॅफिन असते. अडिनोसिन मेंदूच्या पेशींच्या ज्या खाचांमध्ये स्वत:ला फिट करून झोपेचा दबाव निर्माण करते त्या जागा कॅफिन चक्क अनधिकृतरित्या बळकावते. त्यामुळे अडिनोसिनने निर्मिलेला झोपेचा दबाव मेंदूला समजत नाही. आपण जागेच राहतो.

आपण झोपतो तेव्हा आपले सारे स्नायू शिथिल होतात. जलचर प्राणी असा झोपला तर त्याला जलसमाधीच मिळायची. एका वेळेस त्यांचा अर्धाच मेंदू झोपतो, बाकी अर्धा शरीराच्या गतिविधी सांभाळतो. पक्षांमध्येही सुरक्षेसाठी हे घडते. पक्षांच्या मेंदूचा जो अर्धा भाग जागा असतो त्याच्या विरुद्ध बाजूचा डोळाही उघडा असतो. म्हणजे पक्षाचा अर्धा मेंदू संकटावर चक्क ‘डोळा’ ठेवून असतो. आपले पूर्वज दोन भागांत झोपायचे. रात्रीची लांब आणि दुपारची छोटी झोप (nap) आजकाल दुपारची झोप दुर्मिळ झाली. तरीही दर दुपारी आपला जेनेटिक कोड आपल्याला या झोपेशी जोडू पाहतो. जेवणानंतर नवीन गोष्ट लक्षपूर्वक ग्रहण करायची आपली शक्ती कमी होते. जेवणानंतरच्या मीटिंगमध्ये, वर्गांत लोक पेंगतात. ग्रीसमध्ये पूर्वी दुपारी १ ते ४ सारी दुकाने बंद असायची आणि तेव्हा त्या भागातले लोक दीर्घायुषी होते म्हणे. पुण्यातल्या लोकांचे दुपारचे बंद दुकान आणि त्यांची झोप हा चेष्टेचा विषय अनेक वर्षांपासून होता, पण शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून ते बरोबरच होते.

झोपल्यावर आपला मेंदू जास्त क्रियाशील असतो. नवीन गोष्ट शिकण्यासाठी मेंदूला तयार करायला आणि शिकल्यानंतर ती गोष्ट पक्की लक्षात ठेवायला शांत झोप अत्यावश्यक आहे. दिवसभरात मिळालेली माहिती मेंदूत हिप्पोकॅम्पस नावाच्या भागात साठवली जाते. याची साठवण क्षमता यूएसबी ड्राइव्हसारखी छोटी असते. त्यात जर माहिती जातच राहिली तर नवीन गोष्टी साठवल्याच जाणार नाहीत. इथे झोप आपली अहं भूमिका पार पाडते. गाढ झोपेत मेंदूतल्या विद्युत लहरी कुरिअर सर्व्हिससारखे काम करतात. हिप्पोकॅम्पसमधल्या मेमरी फाइल्स मुबलक जागा असलेल्या कॉर्टेक्समध्ये पाठवल्या जातात. मगच त्या गोष्टी आपल्या आठवणीत पक्क्या बसतात. आपली एखादी मेमरी फाइल विस्मृतीच्या कप्प्यात गेली असेल, तर आठ तासांच्या शांत झोपेत मेंदू या फाइल्स शोधून परत आणू शकतो. शांत झोपेतून उठल्यावरचा अनुभव सांगतो, ‘‘अरे, काल मला जे आठवत नव्हतं ना ते आत्ता आठवलं पहा!’’ ही आहे झोपेची करामत.

झोप काय देते यापेक्षा ती घेतली नाही तर ती काय घेऊन जाते हे पाहणे जास्त डोळे उघडणारे ठरू शकते. अपुऱ्या झोपेचा परिणाम सगळ्यात आधी आपल्या एकाग्रतेवर होतो. तिचा पायाच डळमळतो. अशा व्यक्तीने ड्रायव्हींग केलं तर झोपेच्या दबावामुळे ती व्यक्ती मायक्रोस्लीपमध्ये जाऊ शकते. या स्थितीत काही क्षणासाठी मेंदूच्या सगळ्या संवेदना जातात. अ‍ॅक्सिलरेटर दाबायचा की ब्रेक, व्हील कुणीकडे फिरवायचं याची निर्णयक्षमता ४५ सेकंदासाठी पूर्णपणे जाते. भयानक अपघात घडतात. दारू आणि अपुरी झोप याचं एकत्र येणं तर आणखीनच भयावह. वर्तमानपत्रात रोज दिसणारे अपघातांचे फोटो पाहिल्यावर आणि ड्रायव्हरचा ताबा सुटला हे वाक्य वाचल्यावर अपुरी झोप आपल्याला मृत्यूच्या दारात नेऊन उभी करू शकते हे पुरेपूर पटतं.

अपुरी झोप आपले भावनांवरचे नियमनही घालवते. छोट्याशा कारणाने आपण राग, भीती, नैराश्य अशा आदिम भावनांकडे जातो. झोपेपासून वंचित असणाऱ्या माणसाच्या मेंदूत राग, भीती या भावनांच्या पायडलवर विवेकी विचारांचा ब्रेक राहत नाही, कारण मेंदूतल्या जोडण्या विस्कळीत झालेल्या असतात. कित्येक लोक आठवड्यातले पाच दिवस चार ते पाच तासही झोपत नाहीत. आणि म्हणतात, आम्ही शनिवार, रविवारी ही उरलेली झोप भरून काढतो. पण झोपेचं बँकेसारखं नसतं. कर्ज जमा करायचं आणि मग ते भरत जायचं. दिवसभरात गोळा केलेली माहिती आठवणींच्या कप्प्यात पक्की होण्यासाठी त्या दिवशीची झोप त्याच दिवशी घ्यावी लागते. झोपेच्या योग्य काळ वेळेचे महत्त्व न समजल्यामुळे अपुरी झोप जीवन पद्धत बनली आहे. हीच आपल्याला स्मृतिभ्रंशाकडेही नेते आहे. आठ तासांच्या शांत झोपेत मेंदूत स्वच्छता मोहीम राबवली जाते. दिवसभरात तयार झालेली अमिलॉइडसारखी विषारी प्रथिने एका सिस्टीमद्वारे मेंदूतून दूर केली जातात. ही घातक प्रथिने जर नियमित झोपेद्वारे दूर केली गेली नाहीत तर त्याचे छोटे छोटे गोळे मेंदूच्या विविध भागांत साचतात. अल्झायमर होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते.

संकटाच्या क्षणी म्हणजे जेव्हा लढा अथवा पळा अशा परिस्थितीशी आपण सामना करतो तेव्हा ‘सिम्पाथेटीक नव्‍‌र्हस सिस्टीम’ उत्तेजित होते. मग हृदय जोरात पळू लागतं, जास्त रक्त जास्त जोराने शरीरात पंप होतं, रक्तदाब वाढतो. या चेतासंस्थेला परत शांत करण्याच्या कामात रोज रात्रीची शांत झोप खूप महत्त्वाची भूमिका बजावते. जर ही शांत झोप ५ ते ६ तासांपेक्षा कमी मिळाली तर ही चेतासंस्था उत्तेजित स्थितीतच राहते. हे आपल्या शरीरासाठी हानीकारक असते. शरीराला वाटत राहतं की आपण स्ट्रेसमधून जातो आहोत. मग कॉर्टीसाॅल नावाचे द्रव्य पण हिरिरीने पुढे येते. या सगळ्याचा परिणाम असा होतो की हृदयाची गती व रक्तदाब वाढलेलाच राहतो. ही स्ट्रेस हार्मोन्स रक्त  वाहिन्यांनाही हानी पोहोचवतात. साहजिकच हृदयविकार, उच्च रक्तदाब, अर्धागवायू होण्याचा धोका कैकपटीने वाढतो.

जेव्हा शांत झोप कमी होते तेव्हा वजन वाढीस लागतं. विशेषत: पोटाचा घेर. आपली भूक नियंत्रित करणारी दोन हार्मोन्स असतात. लेप्टीन, जे पोट भरल्याचे संकेत देतं. दुसरं घ्रेलिन, जे भूक लागली हे सांगतं. अपुऱ्या झोपेमुळे लेप्टीन कमी होतं आणि घ्रेलिन वाढतं. पोट भरलेलं लेप्टीन सांगत नाही आणि घ्रेलिन सांगत राहतं की, भूक शमलेली नाही. त्यामुळे कमी झोपणाऱ्या माणसाला जेवायचं समाधान मिळतच नाही. जणू अपुऱ्या झोपेचा गुन्हा करणाऱ्याला डबल शिक्षा. जे कमी झोपतात ते दुसऱ्या दिवशी उत्साही नसतात म्हणून ते व्यायाम करत नाहीत आणि खाण्यासाठी जास्त गोड पदार्थ निवडतात. सध्या दिसत असलेल्या लठ्ठपणाचे इतर कारणांसोबतच अपुरी शांत झोप हे पण एक महत्त्वाचे कारण ठरते.

आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्या रक्तातली साखर वाढते. इन्सुलिन नावाचे हार्मोन लगेच शरीरातल्या पेशींना हाकारून सांगते की, ‘‘तुमच्या झडपा उघडा आणि रक्तातल्या साखरेला आत घ्या. पेशी त्याप्रमाणे ऐकतात आणि रक्तातली साखर प्रमाणात राहाते. अपुऱ्या झोपेमुळे शरीरातल्या पेशी इन्सुलिनच्या हाकेला ओ देणं कमी करतात. मग त्यांच्या झडपा उघडत नाहीत आणि रक्तातली साखर वाढलेली राहते. म्हणजे अपुऱ्या झोपेमुळे येणारा लठ्ठपणा, कमी व्यायाम, जास्त गोड खायची इच्छा, शरीरातल्या पेशींनी इन्सुलिनचे न ऐकणे हे सारे काही आपल्याला रेड कारपेट अंथरून टाईप २ डायबेटिजपर्यंत घेऊन जाऊ शकतात.

कुठलाही जिवाणू किंवा विषाणू शरीरात दाखल झाला की त्याच्याशी लढायला शरीरात एक लढाऊ फौज ‘इम्युन सिस्टीम’ असते. साधारण सात तासांची शांत झोप या सैन्याला अधिक शक्तिशाली बनवते आणि नवीन कुमक तयार करते. कोरोना असो की स्वाइन फ्लू या साथींच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांमध्ये एक असते ‘पुरेशी झोप घ्या’. कुठल्याही आजाराशी लढायला ‘अंदरसे स्ट्राँग’ बनण्यासाठी ही सूचना फार महत्त्वाची आहे. या फौजेत एक बटालियन असते किलर सेलची. ही कर्करोगाच्या पेशी नामोहरम करून टाकते. हे किलर सेल सतत सज्ज ठेवायला आपल्याला पुरेशी झोप घ्यायलाच पाहिजे.

सध्या घराघरात दिसणाऱ्या अनेक आजारांच्या मुळाशी अपुरी झोप ही महत्त्वाची गोष्ट आहे याची आपल्याला जाणीव नाही. कारण आपण तिला महत्त्वच देत नाही. आपल्या जगण्याच्या रेट्यात, रंगीबेरंगी स्क्रीन्सच्या वेडाच्या भरात आपण "झोप" या मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष करतो आहोत.

आपल्या दैनंदिन जीवनात रोजच्या धकाधकीच्या जीवनातल्या कुठल्याही कामात यश हवे असेल तर एकाग्रता हवी. ती साधण्यासाठी जीवन मोजके असावे. 
म्हणजे मोजकेच शब्द बोलावे, नियमित पावलांनीं चालावे आणि महत्त्वाचे म्हणजे कोणा एका योग्य वेळी झोपेलाही मान द्यावा. यात जणू आर्जव आहे. झोप आली असता तिचा मान राखा. तिला महत्त्व द्या. आज एकविसाव्या शतकातले विज्ञानही पुन्हा हेच सांगते आहे.

मॅथ्यूवॉकर ह्या न्यूरोसायण्टिस्टचे असे मत आहे की, ‘आता अशी वेळ आलेली आहे की इतर आजारांसाठी औषधोपचार लिहिताना डॉक्टरांनी झोपेचे पण प्रिस्क्रिप्शन द्यावे. अर्थात ते झोपेच्या गोळ्यांच्या प्रकारात नसावे.’

आत्तापर्यंत उपलब्ध असलेल्या झोपेच्या गोळ्या झोप लवकर आणतात, परंतु ही झोप नैसर्गिक झोपेसारखी नसते. आपली स्मृती, एकाग्रता, कलात्मकता वाढवणारे जे नैसर्गिक झोपेचे फायदे आहेत ते ही झोप पूर्णत: देऊ शकत नाही. चांगली झोप येण्यासाठी आपण खालील गोष्टी नक्कीच करू शकतो-

झोपेच्या वेळेत फारसा बदल करू नका. कधी उठायचे यासाठी गजर लावण्याऐवजी कधी झोपायला जायचं यासाठी लावा आणि ती वेळ पाळा.

नियमित व्यायाम करा, पण झोपेच्या आधी दोन-तीन तास नको.
कॉफी, चहा, चॉकलेट दुपारनंतर नको.
दारू आणि तत्सम पदार्थ टाळा.
रात्री उशिरा खूप जड जेवण घेऊ नका.
झोपायची खोली शांत, पुरेशी थंड आणि अंधारी असावी. बिछाना आणि उशी आरामदायी असावी. कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण तिथे नसावे.
झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करा.
खोलीतल्या घड्याळाचे तोंड तुमच्याकडे नसावे. झोप आली नाही तर आपण सारखे त्याकडे पाहतो आणि मग अरे बापरे इतके वाजले अजून आपल्याला झोप येत नाही, या ताणाने येणारी झोप येत नाही.
दिवसाचा प्रकाश ही झोपेचे नियमन करणारी महत्त्वाची गोष्ट आहे. रोज अर्धा तास तरी स्वच्छ सूर्यप्रकाशात वावरा.
रात्री आठनंतर सर्वच घरातले दिवे मंद ठेवा. सगळे स्क्रीन्स नाईट मोडवर ठेवा. टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप कोणतीही स्क्रीन नको.
बिछान्यावर पडल्यावर झोप आली नाही तर तिची वाट पाहात पडून राहू नका, अशा वेळी मोठा दिवा लावून काही वाचूही नका. ताण घालवण्यासाठी मंद संगीत ऐकणे सगळ्यात चांगले.

‘बेटर स्लीप, बेटर लाइफ, बेटर प्लॅनेट.’ हे ब्रीदवाक्य कायमस्वरूपी आपल्याला लागू आहे. अधिक चांगले जग हवे असेल तर सुरुवात स्वत:पासूनच करायला हवी.

गेल्या आठ दिवसांतली आपल्या झोपेची पाने जरा चाळून बघा. ‘कशी होती माझी झोप?’ एकदा का त्यातल्या कमतरता उमजल्या, समजल्या, आपण त्या स्वीकारल्या तर त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करता येतील. हो अगदी आजपासूनच.
-
माहिती स्रोत :
डॉ. प्रकाश ढोकणे
नवी मुंबई.

आज जागतिक निद्रा दिन.
रोज आठ तासांच्या शांत, निवांत, निरामय झोपेसाठी सर्वांना शुभेच्छा!

रविवार, ७ मार्च, २०२१

भारत की प्रथम महिला


  • भारत की प्रथम महिला राष्ट्रपति- श्रीमती प्रतिभा देवी सिंह पाटिल
  • भारत की प्रथम महिला प्रधानमंत्री- श्रीमती इन्दिरा गाँधी(1966)
  • भारत की प्रथम महिला केन्द्रीय मंत्री- श्रीमती राजकुमारी अमृत कौर
  • भारत की प्रथम महिला मुख्यमंत्री- श्रीमती सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)
  • भारत की प्रथम महिला राज्यपाल- श्रीमती सरोजनी नायडु
  • भारत की प्रथम महिला विधानसभा अध्यक्ष- श्रीमती शन्नो देवी
  • भारत की प्रथम महिला सुप्रीम कोर्ट न्यायधीश- श्रीमती मीरा साहिब फातिमा बीवी
  • भारत की प्रथम महिला कांग्रेस अध्यक्ष- श्रीमती एनी बीसेन्ट(1917)
  • भारत की प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष- श्रीमती मीरा कुमारी

सुबारायन

    • भारत की प्रथम महिला शासिका- रजिया सुल्तान
    • नोबल पुरस्कार प्राप्त करने वाली प्रथम भारतीय महिला- श्रीमती मदर टेरेसा
    • उच्च न्यायालय की प्रथम महिला मुख्य न्यायधीश- श्रीमती लीला सेट(हिमाचल प्रदेश)
    • भारत की प्रथम महिला आई. ए. एस. – श्रीमती अन्ना जार्ज
    • भारत की प्रथम महिला आई. पी. एस. – श्रीमती किरण बेदी
    • अशोक चक्र पाने वाली प्रथम महिला- श्रीमती नीरजा भनोट
    • सयुक्त राष्ट्र संघ की प्रथम महिला भारतीय राजदूत- श्रीमती विजयालक्ष्मी पंडित
    • इंग्लिश चैनल को तैरकर पार करने वाली प्रथम भारतीय महिला- श्रीमती आरती साहा
    • ओलंपिक पदक विजेता प्रथम भारतीय महिला- श्रीमती कर्मण मल्लेश्वरी
    • एवरेस्ट शिखर पर पहुँचने वाली प्रथम भारतीय महिला- श्रीमती बच्छेन्द्री पाल
    • एवरेस्ट पर लगातार दो बार चढ़ने वाली प्रथम भारतीय महिला- श्रीमती संतोष यादव
    • मिस वर्ल्ड का खिताब जीतने वाली प्रथम भारतीय महिला- श्रीमती रीता फारिया
    • मिस यूनिवर्स का खिताब जीतने वाली प्रथम भारतीय महिला- श्रीमती सुष्मिता सेन
    • फोर्ड सुपरमॉडल का खिताब जीतने वाली प्रथम भारतीय महिला- श्रीमती बिपाशा बसु
    • एशियाड गोल्ड विजेता प्रथम भारतीय महिला- श्रीमती कमलजीत संधू
      • भारत रत्न से सम्मानित प्रथम महिला – श्रीमती इन्दिरा गाँधी      भारत रत्न विजेता की सूची
      • ज्ञानपीठ पुरस्कार पाने वाली प्रथम महिला- श्रीमती आशापूर्णा देवी
      • अर्जुन पुरस्कार पाने वाली प्रथम महिला- श्रीमती एन. लम्मडेन (हॉकी,1961)
      • अर्जुन एवं राजीव गाँधी खेल रत्न दोनों पुरस्कार पाने वाली प्रथम महिला- श्रीमती कुंजरानी(ग्रांड ओल्ड लेडी)
      • प्रथम महिला मेयर- श्रीमती तारा चेरियन (चेन्नई)
      • ऑनर्स में स्नातक प्रथम महिला- श्रीमती कामिनी राय (1886)
      • प्रथम महिला स्नातक- श्रीमती कादम्बिनी गांगुली , श्रीमती चंद्रमुखी बसु(1883)
      • प्रथम महिला चिकित्सक- श्रीमती कादम्बिनी गांगुली
      • पूर्व स्नातक अकादमिक संस्था की प्रथम महिला अध्यक्ष- श्रीमती चंद्रमुखी बसु
      • प्रथम महिला वायुयान चालक- श्रीमती दुर्गा बनर्जी
      • प्रथम महिला अधिवक्ता- श्रीमती कोर्नेलिया सोराबजी
      • वायुसेना में प्रथम महिला पायलट- श्रीमती हरिता कौर दयाल
      • प्रथम महिला लेफ्टिनेट जनरल- श्रीमती पुनीत अरोड़ा
      • साहित्य अकादमी सम्मान पाने वाली प्रथम महिला- श्रीमती अमृता प्रीतम

     

    • लेनिन शांति पुरस्कार से सम्मानित प्रथम महिला- श्रीमती देविका रानी रोरिक
    • ऑस्कर पुरस्कार प्राप्त करने वाली प्रथम भारतीय महिला- श्रीमती भानु अथैवा
    • सर्वश्रेष्ठ अभिनेत्री का राष्ट्रीय सम्मान प्राप्त करने वाली प्रथम अभिनेत्री- नरगिस दत्त
    • अंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट में 100 विकेट लेने वाली प्रथम भारतीय महिला- श्रीमती डायना इदुल
    • इंजीनियरिंग में डिग्री प्राप्त करने वाली प्रथम महिला- श्रीमती इला मजुमदार
    • भारतीय रिजर्व बैंक की प्रथम महिला डिप्टी गवर्नर- श्रीमती के. जे. उदेशी
    • भारत की प्रथम अंतरिक्ष महिला वैज्ञानिक- श्रीमती सविता रानी
    • भारत की प्रथम महिला डायरेक्टर जनरल ऑफ़ पुलिस- श्रीमती कंचन चौधरी भट्टाचार्य
    • पहली फिल्म अभिनेत्री जो राज्य सभा के सदस्य के रूप में नामित की गयी- श्रीमती नरगिस दत्त
    • उत्तरी ध्रुव पर पहुँचने वाली प्रथम भारतीय महिला- श्रीमती प्रीटी सेन गुप्ता (1993)
    • रेमन मैग्सेसे पुरस्कार प्राप्त करने वाली प्रथम भारतीय महिला- श्रीमती मदर टेरेसा
    • भारतीय महिला क्रिकेट टीम की प्रथम कप्तान- श्रीमती शांता रंगास्वामी(कर्नाटक राज्य की)
    • राज्यसभा की प्रथम महिला उप सभापति- श्रीमती वायलेट आल्वा
    • अन्तरिक्ष में जाने वाली प्रथम भारतीय महिला- श्रीमती कल्पना चावला
    • भारत में प्रथम महिला मजिस्ट्रेट- श्रीमती ओमना कुजम्मा
    • एम.बी.बी.एस. की डिग्री प्राप्त करने वाली प्रथम भारतीय महिला- श्रीमती विद्द्मुखी बोस , श्रीमती विजिर्निया मित्तर
    • भारत के किसी राज्य की प्रथम महिला दलित मुख्यमंत्री- श्रीमती मायावती(उत्तर प्रदेश)
    • भारत के किसी राज्य की मुख्यमंत्री बनने वाली प्रथम महिला अभिनेत्री- श्रीमती जानकी रामचंद्रन(तमिलनाडु)
    • भारत में सेना मेडल प्राप्त करने वाली प्रथम महिला- श्रीमती विमला देवी
    • लड़ाकू विमान उड़ाने वाली प्रथम भारतीय महिला- श्रीमती अवनी चतुर्वेदी
    • माउन्ट एवरेस्ट फतह करने वाली प्रथम भारतीय विकलांग महिला- श्रीमती अरुणिमा सिन्हा
    • माउन्ट एवरेस्ट को चौथी बार फतह करने वाली प्रथम भारतीय महिला- श्रीमती अंशु जामसेंपा
    • भारत की प्रथम दृष्टिहीन महिला डॉक्टर- श्रीमती कृतिका पुरोहित
    • भारत में प्रथम महिला चीफ इंजीनियरिंग- श्रीमती पी.के.गेसिया
    • भारत की प्रथम महिला अध्यापिका- श्रीमती सावित्रीबाई फुले
    • अन्तरिक्ष में सर्वाधिक समय व्यतीत करने वाली प्रथम भारतीय मूल की महिला- श्रीमती सुनीता विलियम्स
    • एवरेस्ट पर चढ़ने वाली भारत की सबसे कम उम्र की बालिका- डिंकी डोल्मा
    • भारत की प्रथम महिला सर्जन- डॉक्टर प्रेमा मुखर्जी
    • भारत में प्रथम क्रान्तिकारी महिला- श्रीमती भीखाजी रुस्तम कामा
    • प्रथम भारतीय महिला रेल चालक- श्रीमती सुरेखा यादव
    • प्रथम भारतीय महिला उपन्यासकार- श्रीमती स्वर्ण कुमारी देवी

 

  • प्रथम भारतीय महिला कुलपति- श्रीमती हंसा मेहता
  • बर्लिन फिल्मोत्सव में पुरस्कार पाने वाली प्रथम भारतीय महिला- श्रीमती मधुर जाफरी
  • राष्ट्रमंडल खेलो में पदक जीतने वाली प्रथम भारतीय महिला- श्रीमती अमी घिया शाह
  • भारत की प्रथम महिला कुली- श्रीमती मंजू देवी
  • भारत की प्रथम महिला बॉडीबिल्डर- श्रीमती ममता देवी
  • भारत की प्रथम महिला मिसाइल डेवलपर- श्रीमती टेसी थॉमस

यह post आपको कैसी लगी कमेंट बॉक्स के माध्यम से जरुर बताए|

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

नारायण मूर्ती शून्यातून

वर्ष 1978 – 

नारायण मुर्ती तेव्हा पटनी कॉम्पुटरमध्ये नोकरी करत होते, कंपनीच्या काही कामानिमीत्त ते ऑनसाईट म्हणजे पॅरीसला गेले होते.

जाताना ते विमानाने गेले होते, काही महिन्यांनी त्यांचे काम पूर्ण झाले, नारायण मुर्ती यांच्या मनात साम्यवाद आणि डाव्या चळवळीविषयी आकर्षण होते, तेव्हा वापस येताना त्यांनी विमानाने न येता, एकामागे एक देशांना भेटी देत येण्याचा मार्ग निवडला.

त्यांना मिळालेली संपत्ती त्यांनी तेथील गरजुंना दान केली, आणि सोबत प्रवासापुरते फक्त चारशेपन्नास डॉलर्स ठेवले.

ह्या प्रवासात ते साम्यवादी देशांना भेटी देऊ शकणार होते, आपल्या देशात आणि डाव्या देशांमध्ये असलेला फरक ते अनुभवणार होते.

विवीध लोकांशी संवाद साधणार होते.

पॅरीसमधुन बाहेर पडून अनेक देशांमधुन प्रवास करुन ते बल्गेरीयात पोहचले, तेव्हा एक आक्रित घडले.

एका ट्रेनच्या प्रवासात, ते सोबतच्या एका सहप्रवाशी स्त्रीला देश आणि तिथल्या कार्यपद्धतीबद्द्ल विचारपुस करु लागले. दुर्दैवाने ती स्त्री मुलुखाची संशयी होती. तिला वाटले, की नारायण मुर्ती गुप्तहेर आहेत, जे आपल्या देशाविषयी माहिती जमा करत आहेत.

तिने गस्तीवर असलेल्या पोलिसांना हा माणुस संशयास्पद असल्याची तक्रार केली.

नारायण मुर्तींना त्या अज्ञात प्रदेशात अटक झाली. त्यांचं काहीएक ऐकुन घेतलं गेलं नाही,

त्यांच्याजवळचं सगळं सामान जप्त केलं गेलं.

त्यांना एका आठ बाय आठ च्या खोलीत डांबुन ठेवलं गेलं. 

तब्बल बाहत्तर तास!

जेवायलाही दिलं गेलं नाही.

त्या खोलीला खिडकी नव्हती, ना टॉयलेटची व्यवस्था होती.

नारायण मुर्ती प्रचंड घाबरले होते, कोणीही त्यांचं ऐकुन घेत नव्हते. आता जगु की वाचु, इथुन बाहेर कसे पडु, काहीच समजत नव्हते,

तीन दिवसांनी पोलीसांनी त्यांना बाहेर काढले, अत्यंत अपमानास्पद वागणुक देत, त्यांना बल्गेरीयाच्या बाहेर हाकलण्यात आले,

त्यांचे कपडे, सामान, पैसे दिलेच नाहीत, वर सुनावले,

“भारत बल्गेरीयाचा मित्र आहे म्हणुन तुम्हाला जिवंत सोडत आहोत.”

नारायण मुर्ती त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात, ते बाहत्तर तास आठवले की आजही अंगाचा थरकाप होतो.

त्या जीवघेण्या घटनेनंतर, कित्येक महिने मुर्ती खोलवर डिप्रेशनमध्ये गेले होते.

ह्या घटनेने त्यांच्या जीवनावर खुप परीणाम केला.

असला दहशतवादी डावा साम्यवाद त्यांना अजिबात रुचला नाही,

त्यांनी मनोमन ठरवले, “मी एक कंपनी उभा करीन, प्रचंड मोठी कंपनी, “

“त्या कंपनीत माझ्या देशातल्या लाखो, करोडो लोकांना रोजगार मिळेल.”

“सॉफ्टवेअर क्षेत्रातली जगातली सर्वात मोठी कंपनी उभा करीन, त्यासाठी माझं सर्वस्व देईन.“

आपल्या करीअरमधला सर्वात मोठा जुगार खेळुन त्यांनी पटनी कॉम्पुटरमधला जॉब सुरक्षित आणि चांगल्या पगाराचा जॉब सोडला.

गाठिशी फार पैसे नसताना नवा डाव मांडला.

१९८१ मध्ये सुरु झालेली कंपनी हेलकावे खात सुरु होती. पहील्या दहा वर्षात काही खास झाले नव्हते.

लायसन्स राज मध्ये सरकारी बाबुंचा उद्योजकांना प्रचंड त्रास होता.

१९९० मध्ये कंपनीतल्या बाकीच्या सात पार्टनर्सनी इन्फोसीसला विक्री करुन ह्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग सुचवला.

मुर्ती प्रचंड अवस्थ झाले.

जणु नारायण मुर्तींच्या डोळ्यासमोरच त्यांच्या अपत्याचा गळा घोटला जात होता. 

कंपनी विकण्याच्या प्रस्तावाला त्यांनी प्रखर विरोध केला.

“फक्त थोडे दिवस थांबा, मला काळोखामध्ये आशेचा किरण दिसत आहे.”

हा आशेचा किरण काय होता त्यांनाही माहित नव्हते, पण त्यांची तळमळ प्रार्थना सच्ची होती.

१९९१ मध्ये तो आशेचा किरण उजडला, जागतिकीकरण झाले, भारत मुक्त अर्थव्यवस्था झाला.

लायसन्स राज संपला.

पुढच्या दहा वर्षात इन्फोसीसने इतिहास घडवला. 

इन्फोसीसचा ९२ रुपयांचा शेअर आठ वर्षात दहा हजार रुपयांपेक्षा जास्त भावाने विकला गेला, तो चक्क १४६ पटींने वाढला.

हा विक्रम आजपर्यंत कुणालाही मोडता आला नाही.

२००० साली इन्फोसीसने २००० करोड रुपये निव्वळ नफा कमवला होता.

२०१० मध्ये तो चौदा हजार करोड रुपये होता.

आजकाल तो पंचवीस हजार करोड असतो.

दोन लाख कर्मचारी, जगभरातल्या सर्व प्रमुख शहरांमध्ये अलिशान ऑफीसेस!

पगारासोबत कंपनीचे शेअर्स देऊन, इन्फोसीसने ड्रायव्हर आणि कॅंटीनवाल्यापासुन प्रत्येक कर्मचार्‍याला करोडपती बनवलं. 

फक्त एका माणसामुळे हे शक्य झालं, 

एन आर नारायण मुर्ती!

त्यांनी बघितलेल्या एका स्वप्नामुळे हा प्रवास शक्य झाला.

बुल्गेरीयात झालेल्या त्या अपमानाने त्यांना विलक्षण शक्ती दिली. 

गांधीजींना धक्के मारुन बाहेर काढण्याशी मिळताजुळता हा प्रसंग, मुर्ती पेटुन उठले.

म्हणुन की काय जगाने त्यांना नवं नाव दिलं, “कॉर्पोरेट गांधी!”

मुर्तींनीही हे नाव सार्थ केले.

अरबपती म्हणण्याइतके श्रीमंत झाल्यावरही उतले नाहीत, मातले नाहीत.

दोन हातांनी गरीबांना भरभरुन देत राहीले.

कंपनी आर्थिक समृद्धीच्या उच्चशिखरावर असताना गेली तीस वर्ष मुर्ती दांपत्य, आपल्या बेंगलोरच्या जयनगरच्या फ्लॅट्मध्ये साधेपणाने राहीले.

वीरपन्नने अपहरणाची धमकी देऊनही, सरकारकडुन सुरक्षा नाकारली.

कित्येक वर्ष त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सुधा यांनी घर-कामाला नौकरही ठेवला नाहीत.

विमानात नेहमी इकॉनॉमी क्लासनेच प्रवास केला. 

मित्रांनो, एका डिप्रेशननेच मुर्तींना ही असाधारण व्यक्तिमत्व बनवले.

आपल्या आयुष्यात जर डिप्रेशन-फीप्रेशनसारखे प्रकार आले असतील तर आपणही पेटुन उठुया.

भव्य स्वप्ने मनःपटला वर मांडुया,

दिवसातुन चौदा-सोळा तास प्रामाणिकपणे झोकुन देऊन, आपलं काम करुया.

जगाला रोज एका नव्या मुर्तीची गरज आहे.

हे ही आर्ट ऑफ लिव्हिंगच

संत गाडगे महाराज आणि त्याची किर्तने* !!

*संत गाडगे महाराज आणि त्याची किर्तने* !!
==========================
गाडगेबाबा हे आधुनिक राष्ट्रीय संत म्हणून ओळखले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात पदयाञा करून त्यांनी लोकशिक्षणाचे प्रबोधनाचे कार्य केले. स्वच्छता, करुणा आणि शिक्षण विवेकनिष्ठ मूल्ये समाजात रुजविण्याचे कार्य केले. बाबांचे काही वैचारिक किर्तने..

*किर्तन १* 

बाबा :-  देव किती?  
श्रोते :-  एक.
बाबा :-  तुमच्या गावी खंडोबा आहे का? 
श्रोते :-  आहे 
बाबा :- मग देव किती झाले
श्रोते :- दोन 
बाबा :- तुमच्या गावी भैरोबा आहे का? 
श्रोते :- आहे 
बाबा :- मग आता देव किती झाले? 
श्रोते :-  तीन 
बाबा :- तुमच्या गावी मरीआई आहे का? 
श्रोते :- आहे 
बाबा :- मग देव किती झाले 
श्रोते :- चार 
बाबा :- वेड लागले जगाला देव म्हणती धोंड्याला । बोला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला।

*किर्तन २*

बाबा :- श्रीखंड चांगले का बोकड? 
श्रोते :- श्रीखंड 
बाबा :- बासुंदी चांगली का बोकड? 
श्रोते :- बासुंदी 
बाबा :- दूध चांगले का बोकड? 
श्रोते :- दूध 
बाबा :- इथं असं बोलता अन् घरी जाऊन बोकडाचे मटण खाता. काय म्हणावं तुम्हाला? गुजराती मारवाडी कधी देवाला बकरे कापतात का? 
श्रोते :- नाही 
बाबा :- मग त्यांना देव कसा पावतो? अन् तुम्हाला का पावत नाही? एकेका गुजरातीच्या दहा दहा मजली इमारती आहेत अन् तुम्ही फूटपाथवर झोपता. शेटजीच्या बायकोचे पाच फुटी पातळ पाचशे रुपयांचे त्यातला परकर तीनशेचा अन् तुमच्या बायकोच्या नऊवारी पातळाची किंमत किती? पाच रुपये अन् पावली. 

देवाला बकरे द्यायचे तर त्याच्या देवळात सोडून द्या त्याच्या पोटात सुरी कशाला खुपसता? तुम्ही त्याचा इकडे मसाला वाटता अन् यम तिकडे तुमचा मसाला वाटणार. बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। 

*किर्तन ३*

बाबा :- देव कसा आहे? जसं वारं. 
वायु असे सकळ ठायी परि त्याचे बि-हाडची नाही । 
वारं आहे ना वारं पृथ्वीवर आहे घरात दारात झाडात जिकडे तिकडे वारं आहे. पण कोणी असं नाही सांगत की रात्री वा-याचा मुक्काम बंबईच्या ठेसनावर होता. सांगतं का कोणी? 
श्रोते :- नाही 
बाबा :- परवाच्या रोजी वारं साता-याच्या ठेसनावर होतं असं सांगत का कोणी? 
श्रोते :- नाही 
बाबा :- ते वारं लाल, हिरवं, पिवळं, काळं ते समजत नाही तसा परमेश्वर आहे. अन् तीर्थात देव बसवले ना जगन्नाथ रामेश्वर हे पोट भरण्याचे देव आहेत. जञा में फञा बिठाया तीरथ बनाया पाणी.. 
भटजी म्हणतो तांब्याभर पाण्याचे पंधरा रुपये.. दोन आणे चमचा तीर्थ घ्या तीर्थ मग सांगा जञेत देव कशाचा आहे? 
श्रोते :- दगडाचा 
बाबा :- तीर्थाले जाणे देवाचा संबंध नाही पैशाचा नाश खाना खराब आहे. गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला। 

*किर्तन ४* 

बाबा :- देवळात देव नाही 
नहीं मसजिद में नहीं देवलमे 
देऊळ तयार झाले मूर्ती आणावी लागती का नाही? 
श्रोते :- होय 
बाबा :- बोला 
श्रोते :- होय बाबा 
बाबा :- मग मूर्ती इकात का फुकट? 
श्रोते :- विकत 
बाबा :- देव विकत भेटतो का? त्यापेक्षा सूर्यनमस्कार घ्यावा? जेवढे पैसे पडतील तेवढे पडूद्या. अन् आपल्या घरात आणून बसवून टाका. देव विकत भेटतो का? तो काय मेथीची भाजी आहे का कांदे बटाटे आहेत? हे ज्या माणसाले समजत नाही तो माणूस कसला? बरं आणले देव बसवले देवळात. तुमच्या देवाले अंग धुता येते का? 
श्रोते :- नाही 
बाबा :- ज्याले अंग धुवायची अक्कल नाही त्याला देव म्हणता? बरं तुमच्या देवाले धोतर नेसता येते का? 
श्रोते :- नाही 
बाबा :- ज्याले धोतरही नेसता येत नाही त्याला देव म्हणता? बरं तुमच्या देवाला निवद ठेवला अन् कुञ भिडलं तर त्याला हाणता येते का? 
श्रोते :- नाही 
बाबा :- अरे कुञाही हाणायची ताकद ज्याच्या अंगात नाही त्याला देव म्हणता? बरं तुमच्या देवाचा देवळापुरता तरी आत उजेड पडतो का? 
श्रोते :- नाही 
बाबा :- इजला दिवा मंडळी आली बापू दिवा लावा दिवा. मंडळी दर्शनाला आली. आणा दिवा. मग सांगा देव कोणी दावला? 
श्रोते :- दिव्यानं दावला. 
बाबा :- मग दिवा मोठा का देव? 
श्रोते :- दिवा मोठा 
बाबा :- मग कळलं ना देव देवळात नाही या जगात आहे तुमच्या माझ्यात आहे. जगाची सेवा करा? 
बोला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला... 
            
*किर्तन ५*

बाबा :- ब्रिटिश सरकारने आपल्यावर एक मोठं अरिष्ठ आणलं होतं. मग सत्याग्रह केला का नाही लोकांनी? 
श्रोते :- होय केला 
बाबा :- का कोणी देवळातले देव आले होते मदत कराले? वान्द्रयाचे राम, दादरचे इठोबा का वरळीचे पहिलवान मारूती आले होते? 
श्रोते :- कोणी नाही आले 
बाबा :- शिंगणापूरचे महादेव आले होते का? 
श्रोते :- नाही 
बाबा :- मग कोण सत्याग्रह आंदूलन केला? 
श्रोते :-  माणसांनी केलं 
बाबा :- कोणी कोणी ब्रिटिशाच्या गोळ्या झेलले? 
श्रोते :- माणसांनी झेलले 
बाबा :- मग त्या ब्रिटिशाले कोणी हाकलून लावले बप्पाहो? 
श्रोते :- माणसांनी बाबा 
बाबा :- मग देव कुठे राहतोय? 
श्रोते :- माणसात 
बाबा :- मग माणसाची सेवा करा बप्पाहो. एकवेळ पोटाले नाही मिळलं तरी चालेल पण पोरांना साळा शिकवा. देवा दगड धोंड्याच्य नादी नका लागू. आपला जवळपास घाणकचरा नको टाकू. परिसर चांगला ठेवा. हरामचं खाऊ नका. तानलेल्याला पाणी पाजा भूकेल्याला घास द्या बप्पाहो तेच देव हाये त्याचा आशिर्वाद घे. बोला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला..

 किती आशयपूर्ण किर्तन बाबांनी मांडले आहे. अक्षर ओळख नसताना सुद्धा बाबांना खऱ्या देवाचा शोध लागला होता. चला, आपणही एक पाऊल अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दिशेने टाकूया. 
देवळातल्या दगडापुढे आपण आपला माथा टेकवून लोकांना लाथा मारण्यापेक्षा पुरोगामी  भारताची निर्मिती करुया. 
तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवूया.
 अशा या महान आधुनिक संताला विनम्र अभिवादन

Collected....

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये,*

*संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये,*
हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही!
वाचा आणि पालन करा.

|| शरीराला आवश्यक खनिजं ||

*🔺कॅल्शिअम*
कशात असतं?
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर
कमतरतेमुळे काय होतं?
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे
कार्य काय असतं?
शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.
🌺🌺🌺

*🔺लोह*
कशात असतं?
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी
कमतरतेमुळे काय होतं?
शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
कार्य काय असतं?
शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.
🌺🌺🌺

*🔺सोडिअम*
कशात असतं?
मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं
कमतरतेमुळे काय होतं?
रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.
कार्य काय असतं?
शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.
🌺🌺🌺

*🔺आयोडिन*
कशात असतं?
शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.
कमतरतेमुळे काय होतं?
थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.
कार्य काय असतं?
शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.
🌺🌺🌺

*🔺पोटॅशिअम*
कशात असतं?
सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.
कमतरतेमुळे काय होतं?
अ‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.
कार्य काय असतं?
शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.
🌺🌺🌺

*🔺फॉस्फरस*
कशात असतं?
दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.
कमतरतेमुळे काय होतं?
ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.
कार्य काय असतं?
मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.
🌺🌺🌺

*🔺सिलिकॉन*
कशात असतं?
गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,
कमतरतेमुळे काय होतं?
कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.
कार्य काय असतं?
जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.
🌺🌺🌺

*🔺मॅग्नेशिअम*
कशात असतं?
बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.
कमतरतेमुळे काय होतं?
उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.
कार्य काय असतं?
पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.
🌺🌺🌺

🔺सल्फर
कशात असतं?
दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.
कमतरतेमुळे काय होतं?
प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.
कार्य काय असतं?
इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.
🌺🌺🌺

*🔺क्लोरिन*
कशात असतं?
पानी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.
कमतरतेमुळे काय होतं?
अ‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍ॅलर्जी.
कार्य काय असतं?
सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.
🌺🌺🌺

*🔺खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे.🔺*
» फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.
» डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.
» काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.
» दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.
» फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.
🌺🌺🌺

*▫ब्लड प्रेशर  आणि  नियंत्रण▫*
*============================*

ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. आज  तुम्हाला काही घरगुती उपायांची माहिती देत आहोत. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहील.
🌺🌺🌺

*▫लसूण -*

ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी.
🌺🌺🌺

*▫शेवगा -*

यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच खनिज लवण आढळून येतात. एका संशोधनानुसार, या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीवर सकारत्मक प्रबाव पडतो. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या डाळीसोबत शेवग्याचे सेवन करावे.
🌺🌺🌺

*▫जवस -*

जवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमणात असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आहे. विविध संशोधनामध्ये समोर आले आहे, की ज्या लोकांना हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात जवसाचा उपयोग अवश्य करावा. यामुळे कॉलेस्टेरॉलची मात्रा कमी होते आणि याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
🌺🌺🌺

*▫विलायची -*

एका संशोधनानुसार विलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. याच्या सेवनाने शर
हळद   Turmeric
🌺🌺🌺

*गुणधर्म  -----*

तिखट,  कडवट,  रूक्ष,  गरम,  जंतुनाशक,  रक्तशुद्धीकारक,  वात,  पित्त,  कफ  शमन  करणारी.

*उपयोग -----*

*१)*  जखमेवर  किंवा  मुका  मार  लागणे.  हळद  लावा.
*२)*  रक्ती  मुळव्याध  -  बकरीचे  दूध  +  हळद  घ्या.
*३)*  सर्दी,  कफ,  खोकला -  गरम  दूध  +  तूप  +  हळद  घ्या.
*४)*  जास्त  लघवी  -  पांढरे  तीळ  +  गुळ  +  हळद  घ्या.
*५)*  आवाज़  बसणे  -  हळद  +  गुळ  गोळ्या  करून  खा.
*६)*  काविळ  -  ताक  +  हळद.
*७)*  ताप  -  गरम  दूध  +  हळद  +  काळीमिरी  पुड.
*८)*  लघवितून  पू  जाणे  -  आवळा  रस  +  हळद  +  मध.
*९)*  मुतखडा  ( स्टोन )  -   ताक  +  हळद  +  जूना  गुळ.
🌺🌺🌺

      #    *आरोग्य   संदेश*    #
     
हळदच  आहे  जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक,
नक्कीच   आजारांना    आहे   ती   मारक.
  
*तोंडाचे  विकार*
  
*कारणे -----*

जागरण  करणे,  जास्त  तिखट  खाणे,  पोट  साफ  नसणे,  पित्त  होणे,  अपचन  होणे,  उष्णता  वाढणे,  रोगप्रतिकारक  शक्ति  कमी  होणे. व्यसन  करणे.

*उपाय -----*

*१)*  जेवणात  गाईचे  तूप  व  ताक  घ्या.
*२)*  गुलकंद  खा.
*३)* ज्येष्ठमधाची  कांडी  चघळावी.
*४)*  दुधाची  साय  आणि  शंखजीरे  मिक्स  करून  तोंडातून  लावा.
*५)*  हलका  आहार  घ्या.
*६)*  वरील  कारणे  कमी  करा. त्रिफळा  चूर्ण  घेऊन  पोट  साफ  ठेवा. 
*७)*  दही  उष्ण  असल्याने  जास्त  खाऊ  नका.
*८)*  जाईची  पाने  किंवा  तोंडलीची  पाने  किंवा  पेरूची  पाने  किंवा  उंबराची  कोवळी  कांडी  चावून  थुंका.
*९)*  नियमित  प्राणायाम  करा.
*१०)*  आवळा  पदार्थ  खा.
*११)*  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.
🌺🌺🌺

*जीभेची  साले  निघत  असल्यास*

*उपाय -----*

*१)*  पुदिन्याची  पाने  आणि  खडीसाखर  मिक्स  करून  चावून  थुंकत  रहा.
*२)*  एक  केळ  गाईच्या  दूधाबरोबर  खावे.
*३)*  त्रिफळाच्या  काड्याने  गुळण्या  करा. जंतुसंसर्ग  कमी  होतो.
🌺🌺🌺

     #     *आरोग्य  संदेश*    #

*व्यायामानेच  पचनशक्ती  वाढवा*

*उपाय -------*

*१)*  नारळाची  शेंडी  जाळून  राख  बनवा.
*२)*  ती  राख  २/३  ग्रँम  ताकातून  घ्या.
*३)*  रिकाम्या  पोटीच  घ्या.
*४)*  सकाळ  व  संध्याकाळ  घ्या.
*५)*  मुळा /  सुरण  भाजी  खा.
*६)*  अक्रोड  खाऊन  वर  दूध  प्या.
*७)*  जेवणात  कच्चा  कांदा  खा.
*८)*  श्वास  रोखू  बटरफ्लाय  व्यायाम  करा.
*९)*  हलका  आहार  घ्या.  गाईचे  तुप  खा.
*१०)*  पोट  साफ  ठेवा.
*११)*  नियमित  प्राणायाम  करा.
*१२)*  चोथायुक्त  पदार्थ  खा.
*१३)*  शाकाहारी  राहण्याचा  प्रयत्न  करा.
*१४)*  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.
🌺🌺🌺

#     *आरोग्य   संदेश*      #

पोट  राहूद्या  नियमित  साफ,
मुळव्याधीचा   चूकेल   व्याप.

*काळ्या द्राक्षांचे 10 फायदे, वाचाल तर रोज खाल*

*1. डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण*

काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही. 

*2. एकाग्रता वाढायला मदत*

काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही या द्राक्षांमुळे बरा होतो. 
🌺🌺🌺

*3. हार्ट ऍटेकचा धोका कमी*

काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे हृदयाला स्वस्थ ठेवतात. तसंच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं, ज्यामुळे हार्ट ऍटेकचा धोका कमी होतो.

*4. वजन होतं कमी*

नियमित काळी द्राक्ष खालली तर वजन कमी होऊ शकतं. यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचं असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो. ज्यामुळे वजन कमी होतं. 
🌺🌺🌺

*5. अस्थमा होतो बरा*

काळी द्राक्ष शरिरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसला मारायचं काम करतात, जी इंफेक्शन तयार करतात. पोलिओविरुद्ध लढण्यासाठीही द्राक्ष हा चांगला उपाय आहे. काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते. 

*6. कॅन्सरला रोखा*

काळी द्राक्ष खाल्यामुळे ब्रेस्ट, लंग, प्रोस्टेट आणि आतड्यांच्या कॅन्सरच्या धोक्यापासून वाचता येऊ शकतं. 

*7. अपचन होत नाही*

काळ्या द्राक्षांमध्ये शुगर, ऑरगॅनिक ऍसिड आणि पॉलीओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही. 
🌺🌺🌺

*8. डोळ्यांसाठी गुणकारी*

दृष्टी सुधारण्यासाठीही काळी द्राक्ष गुणकारी आहेत. 

*9. सुरकुत्या होतात कमी*

काळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा भाग कमी करतो. तसंच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी होतात. 
🌺🌺🌺

*10.  केस गळती थांबवायला मदत*

काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन इ मुळे केस गळणं, केस पांढरे होणं यासारख्या समस्या दूर होतात. द्राक्ष खाल्यानं केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते, त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात.
शरीरावरील  काळे  डाग  
🌺🌺🌺

*उपाय -----*

*१)*  नियमित  प्राणायाम  करा.
*२)*  पचनशक्ती  स्ट्राँग  ठेवा.
*३)*  पोट  साफ  राहूद्या.
*४)*  पालेभाज्या  व  फळभाज्या  खा.
*५)*  सकाळी  ऊठल्यावर  तोंडातील  लाळ  सर्व  डागांवर  चोळून  लावा.  तोंड  धुण्यापूर्वीची  लाळ  पाहिजे.  हा  जबरदस्त  उपाय  आहे.
*६)*  कोरफड  पानातील  गर  लावा.
*७)*  आवळा  रस /  पदार्थ  घ्या.
*८)*  डागांवर  कच्च्या  पपईचा  रस  लावा.
*९)*  कडुलिंबाची  पाने  आंघोळीच्या  पाण्यात  टाकून  पाणी  उकळवून  घ्या.  नंतर  त्याच  पाण्याने  आंघोळ  करा.  मात्र  साबण  वापरू  नका.
🌺🌺🌺

     #     *आरोग्य   संदेश*     #

करा  योग,  पळतील  रोग. संपतील  भोग.
🍲 आहार तज्ञ - ऋजुता दिवेकर यांच्या मते  आहाराविषयीच्या संकल्पना.

🍲  *नियोजनबद्ध आहार कोणता?*

आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, याची खंत आहे.
🌺🌺🌺

🏃 *वाढलेली चरबी कशी कमी करावी?*

आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. सलग ३० मिनिटे एका जागेवर बसू नका. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. वजन वाढते, याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, हे समजून घ्या. म्हणून गरज आहे ती `मूव्ह मोअर अँड सिट लेस` या मंत्राची.
🌺🌺🌺

🍇 *कोणती फळे खावीत?*

आंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.

◆ *मधुमेहासाठी आहार कसा असावा?*

खरं तर मधुमेहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ डॉक्टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळं आणि तुपाचा समावेश आहारात अवश्य असावा. दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेऊ नये, व्यायाम भरपूर करावा आणि अगदी झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.
🌺🌺🌺

◆ *शुगर-फ्रीचा वापर करावा का?*

शुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर आवश्यक असते, तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या घरी बनणाऱ्या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना एकमेकांशी रिप्लेस करू नये. आवश्यकतेनुसार पदार्थात साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता वाढवायला गुळाची मदत होते.
🌺🌺🌺

◆ *वाढतं वजन आणि ताण यांचा संबंध कसा आहे?*

वाढत्या ताणामुळे वजन वाढतं. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉर्वर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होतील.
🌺🌺🌺

● *कडधान्य कशी खावीत..*

आपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची कशासाठी खायची? ती उकडून, उसळ करून खाणेच योग्य.

● *जेवणात कोणते तेल आणि किती वापरावे?*

शेंगदाण्याचे घाण्यावरून करून आणलेले तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. शंभर ग्रॅम शेंगदाण्याचे २५ ते ३० टक्के तेल निघते. बाकी चोथा वाया जातो. तेल बनविण्याची पारंपरिक पद्धत अतिशय शुद्ध आहे. आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा डब्यांमध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. तेल जेवढे वापरावेसे वाटते, तेवढे वापरावे. लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात आलेच पाहिजेत. जास्त तेल पोटात जाईल, म्हणून ते खाणे टाळू नये.
🌺🌺🌺

🚫 *आहारातून ड जीवनसत्त्व कमी झाल्यास काय होते?*

शरीरात हवे असलेले फॅट मिळत नाहीत, म्हणून ड जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते.

*आजकाल बिझी रुटीनमुळे व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही. व्यायामाला दुसरा काही पर्याय आहे का?*

आजच्या युगात आपण नवीन गाडी घेतली, तरीसुद्धा ती नियमितपणे चालवतो. बाहेरगावी गेलो, तरी शेजारी किंवा नातेवाईकांना गाडी सुरू ठेवायला सांगतो. व्यायामाचेसुद्धा तसेच आहे. व्यायामाला कोणताही पर्याय नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंग दुखतं, म्हणून व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात. पण खरे तर व्यायाम करत नाही, म्हणून अंग दुखतं. व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त १५० मिनिटे लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट प्लानिंग करून ते वेळापत्रक पाळले जायला हवे. व्यायाम अनेकदा उद्यावर ढकलला जातो, त्याचं योग्य नियोजन होत नाही, त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही.
🌺🌺🌺

✌ *दोन- दोन तासाने खा, असे सांगितले जाते. हे योग्य की अयोग्य?*

सकाळी उठल्या उठल्या आपण चहाने सुरुवात केली, तर दिवसभराची भूक मरते आणि दिवसभराचे रुटीन बिघडते. दोन- दोन तासाने खावे. सकाळी उठून एखादं केळ खाल्लं की, आपण नंतर नीट नाश्ता करू शकतो. सकाळी नाश्त्याला डोसा, घावन, थालीपीठ असं खावं. त्यानंतर जेवणाआधी पन्हं, कोकम सरबत यासारखं पेय घेऊन त्यानंतर आपण नियमित जेवण घेऊ शकतो. जेवताना शक्यतो पाणि पिऊ नये,जेवणाच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाणि प्यावे व जेवणानंतर एक तासाने पाणि प्यावे.त्यानंतर मध्ये एखाद- दुसरं फळ, संध्याकाळी चार ते सहाच्या मध्ये पुन्हा सकाळच्या नाश्त्याप्रमाणे आहार घेतला की, आपल्याला रात्री फार भूक लागत नाही. मग रात्री पेज किंवा भात खावा, म्हणजे आपल्याला शांत झोप लागू शकते.

🍚 *घरी केलेले चिवडा, लाडू खाण्याची योग्य वेळ कोणती?*

चिवडा आणि लाडू आपण कधीही खाण्यासाठीच तयार करून ठेवतो. चिवड्यासारखी व्हर्सेटाइल गोष्ट कोणतीच नाही. चिवडा कशातही मिक्स करून खाऊ शकतो, त्यामुळे चिवडा कोणत्याही वेळी खाता येईल. लाडूसुद्धा संध्याकाळी ५-६च्या आसपास किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा लाडू चांगला.
🌺🌺🌺

👨👩 *वाढत्या वयाबरोबर कसा व्यायाम करावा ?*

वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये. आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे. आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम केला, तर ते कोणत्याही वयाला चालतं. वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.

💧 *सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते, असा समज आहे. यात किती तथ्य आहे?*

सकाळी उठल्यावर आवड म्हणून गरम पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पण त्यामुळे चरबी अजिबात कमी होत नाही. सकाळी उठल्यावर साधं, माठाचं किंवा गरम कोणतेही पाणी आपण पिऊ शकतो.

🍲 *साखरेऐवजी गूळ वापरल्याने फायदा होतो का ?*

प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. त्यामुळे ज्या गोष्टीत साखर वापरण्याची गरज आहे, त्यात साखर वापरली पाहिजे आणि ज्या गोष्टीत गूळ वापरण्याची गरज आहे, त्यात गूळच वापरला पाहिजे. अन्यथा पदार्थाची चव बिघडते. साखर ही चांगलीच आहे. उगाच साखरेच नाव वाईट आहे. साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते. त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापरावा,
🌺🌺🌺

🙆 *केस, त्वचेसाठी काय सल्ला.*

केस गळण्यापासून वाचण्यासाठी तसेच तजेलदार त्वचेसाठी आहारात भात, नारळ, तूप यांचा समावेश हवा. आहारामध्ये हळदीचा समावेश असण्याची गरज आहे. हळद केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.

🌞 *आपला दिवस कसा असतो?*
मी ज्या शहरात असेन, त्यानुसार दिवस प्लॅन करते. ऋतूमानानुसार आणि स्थानिक पदार्थांना आहारात प्राधान्य देतेत. रोज सकाळी पोहे खाते. सध्या उन्हाळ्यामुळे कोकम आणि पन्हं घेते. जे आवडतं, तेच पदार्थ खाते. जे पदार्थ शरीराला लागतात, ते आवर्जून खाते. कारण, आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसते.

🍌 *फळ किंवा सुका मेव्याने दिवसाची सुरुवात करा*

🍲 *नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा खा*

🍷 *जेवणापर्यंतच्या वेळेत सरबत घ्या*

🍎 *जेवणानंतर एखादे फळ खा*

🍲 *संध्याकाळी गूळ, तूप, पोळी किंवा फोडणीचा भात*

😇  *रात्री   ८.३०  च्या दरम्यान हलका आहार घ्या*

हलका आहार घेतल्याने झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्यास उत्साह राहतो.
🌺🌺🌺

*आहारातून  उपचार*

पुढील  आजार  झाल्यास  त्यांच्या  खाली  दिलेले  अन्नपदार्थ  खा.  आजार  लवकर  बरे  होतील.

*१)  आम्लपित्त :-*
काळी  मनुका,  आलं,  थंड  दुध,  आवळा, जिरे  खा.

*२)  मलावरोध  :-*
पेरु,  पपई,  चोथा /  फायबरयुक्त  असलेले  अन्न,  दुध + पाणी,  कोमटपाणी ,  त्रिफळा  चूर्ण  घ्या.  पोटाचे  व्यायाम  करा,  टाँयलेटला  बसल्यावर  हनुवटी  प्रेस  करा.  लवकर  पोट  साफ  होते.

*३)  हार्टअटैक / ब्लॉकेज :-*
लसूण,  कांदा,  आलं  खा.  रक्ताच्या  गाठी  होत  नाहीत.  रक्ताभिसरण  उत्तम  होते.

*४)  डिसेन्टरी / जुलाब :-*
कापूर  +  गुळ  एकत्र  करून  खा.  त्यावर  पाणी  प्या.  लगेच  गुण  येतो.

*५)  खोकला :-*
२ / ३   काळीमिरी  चोखा.  दिवसातून  तीन  वेळा.  खोकला  थांबतो.

*६)  मुळव्याध :-*
नारळाची  शेंडी  जाळून  राख  ताकातून  दिवसातून  २ / ३  वेळा  घ्या.  चांगला  गुण  येतो.  रामदेव  बाबांचा  उपाय  आहे.

*७)  दारूचे  व्यसन :-*
वारंवार  गरम  पाणी  प्या.  तसेच  दारू  पिण्याची  आठवण  येईल  त्यावेळी  जरूर  गरमच  पाणी  प्या.  २ / ३  महीन्यात  दारू  सुटेल.

*८)  डोळे  येणे :-*
डोळ्यांना  गाईचे  तुप  लावा.  आराम  पडेल.  कापूर  जवळ  ठेवा.  संसर्ग  वाढणार  नाही.

*९)  स्टोन :-*
पानफुटीची  पाने  खा.  कुळीथ  भाजी  खा.  भरपूर  पाणी  प्या.  

*१०)   तारूण्यासाठी :-*
भाज्यांचा  रस,  आरोग्य  पेय,  फळे  खा. गव्हांकुराचा  रस,  Green  Tea  ,प्या.
🌺🌺🌺

    📢     *आरोग्य  संदेश*    🔔

*संतुलित  आहारात  उपचार  आहेत खरे, सर्वच    आजार    नक्कीच   होतील  बरे.*
  

*आर्टीकल जरा मोठे आहे ,पण जीवनावश्यक आहे*🙏🏼🙏🏼
🌺🌺🌺

#स्रोत - आयुर्वेदाचा शोध लावणारे आणि जगातील पहिली शस्त्रक्रिया करणारे ऋषी सुश्रुत आणि वागभट्ट यांचा ग्रंथावर आधारित.             
*=====================*
[7/14, 2:10 PM] +91 81779 49988: *झोप येत नाही मग हे करून पहा.*

📍रात्री झोपताना बदाम तेलाने माँलीश करा.

📍नाकात बदाम तेलाचे थेंब टाका.

📍हातापायांच्या बोटावर दाब देऊन हलकेच तेल लावून माँलीश करा.

📍चमचाभर बदामतेल दूधात घालून पिणे.याने चेहऱ्यावर ग्लो येतो,त्वचा चमकदार होते.

📍पायाच्या तळव्यांना कैलास जीवन,बदामतेल लावून माँलीश करा.

📍खसखस,टरबूज बी यांची पूड चमचाभर रोज घेत जा.

📍पुदिनाची ८-१० पाने कपभर गरमपाण्यात उकळा पाणी कोमट झाल्यावर त्यात चमचाभर मध टाकून घ्या.(गरम पाण्यात मध टाकून घेण्याबद्दल आयुर्वेदात २ प्रवाह आहेत पण या उपचारात रिझल्ट येतो.)

📍दूधात हळद,मध घालून घेतले तरी झोप चांगली येते.

📍मोहरीतेल बेंबीत टाकल्याने सुध्दा चांगली झोप येते.

📍रात्री १ कच्चा कांदा खात जा झोप चांगली येते.

📍पातेल्यात गरमपाणी करा त्यात थोडे मीठ घालून स्पंजीग करा छान झोप येईल.

📍रात्री हलके जेवण करा.

📍लसूण कळ्या ठेचून नाकात वास येईल इतपत जवळपास ठेवा झोप येईल रात्री होणारे भास,वाईट स्वप्ने दूर जातील.

📍कपभर दूधात लसूण रस, मध टाकून प्या.

📍सुर्यफुल बी,खसखस, ५० ग्रँ. प्रत्येकी,आक्रोड १०० ग्रँ. एक करून चुर्ण करा ते दूधात १ च. दूध व किंचीत जायफळ उगाळून मिक्स करुन प्या झोप येते.

📍ब्राम्हीचूर्ण,अश्वगंधा चूर्ण एक करून ही झोप येते.

📍झोपण्यापूर्वी केळ,दूध, जायफळ एक करून घ्या झोप येईल.

📍गाईच्या तुपाचे थेंब नाकात टाका शांतपणे झोप येईल.

📍रात्री झोपताना २ केळी खा

📍झोपताना गरमपाण्यात त्रिफळा चुर्ण घेणे.

📍१ तिळाचा लाडू सकाळी संध्याकाळी घ्या.

📍 रोज १ शेगदाणा चिक्की खा.

📍खजूराच्या बिया काढून १ कप दूधात घेणे.

झोप न येण्याचे मुख्य कारण झिंक व मँग्नेशियमची शरीरात कमी झाल्याने शरीरातील सेरिटोनिक हार्मोन्सचा स्तर वाढत नाही व झोप येत नाही. तेव्हा झोपेच्या गोळ्या खाण्या पेक्षा ही तत्वे ज्यात आहेत अशा गोष्टींचा समावेश आहारात करा छान झोप येईल.

तर मग करून पहा हे प्रयोग व शेवटच्या ओळी काळजीपूर्वक वाचा म्हणजे मर्म कळेल.

वैद्य.गजानन
Cp पूर्णब्रम्ह-आरोग्य संपदा गृप
[7/14, 2:10 PM] +91 81779 49988: #बेंबी मध्ये #तेल #घातल्याने कुठले #फायदे होतात ?

गुडघेदुखी , सर्दीपडसे तसेच त्वचाविकार. यामुळे त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी बेंबीजवळ वेगवेगळ्या तेलांपैकी विशिष्ट तेल लावून झोपले तर अक्षरशः चमत्कारीक फायदे दिसतात. ही तेले नेहमी आपल्याकडे असतात. पण बेंबी मध्ये दोन तीन थेंब टाकून, बेंबीच्या जवळ फक्त दोन तीन थेंब लावून झोपल्यास बरेच विकार चुटकीसरशी दूर होऊ शकतात. मात्र कोणत्या तेलामुळे कोणते रोग बरे होतात त्याची माहिती फारशी कुणाला नसते.

१} सांधेदुखी असेल, ओठ फाटले असतील तर सरसोंचे (मोहरी)तेल घेऊन त्याचे दोन तीन थेंब बेंबीत टाकावेत,दोन थेंब बेंबीजवळ लावायचे. हा उपाय करताना थोडा चमत्कारीक वाटेल खरा, पण तो प्राचीन उपाय आहे. त्यामुळे सांधेदुखी आणि ओठ फाटने कायमचे बरे होईल.

२} सर्दी-पडसे तर कधीही होते. काहीही केलं तरी सर्दी बरी होत नाही. पण अशावेळी कापसाचा बोळा अल्कोहोलमध्ये (homeopathy remedies). बुडवून तो आपल्या बेंबीजवळ फिरवायचा.सर्दीपडशावर हा रामबाण इलाज आहे. करून पहाच एकदा. जुन्यातील जुनी सर्दीही या लहानशा उपायाने बरी होते.

३} मुलगी असो की मुलं तारुण्यात चेहऱ्यावर मुरुमे येणं ठरलेलं आहे. फार त्रास होतो त्यावेळी. पण या समस्येपासून वाचायचे असेल तर कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब बेंबीमध्ये टाकून थोडय़ा थेंबांनी बेंबीभोवती मालीश करा. यामुळे मुरुमे तर गायब होतीलच, पण त्याबरोबरच त्वचाही डागविरहीत आणि सुंदर दिसू लागेल.

४} चेहरा स्वच्छ, चकचकीत आणि सुंदर दिसण्यासाठी महिला धडपडतात. पण त्यावरही सोप्पा उपाय करून पाहा. बदामाच्या तेलाचे दोन तीन थेंब टाकून,काहीथेंब बेंबीतबेंबीभोवती लावून पहा. झटपट परिणाम दिसेल.चेहरा चमकदार दिसेलच, पण रंगही उजळेल.

५} एवढेच कशाला, प्रजनन क्षमता वाढवण्यासाठीही खोबरेल तेलाचे दोन तीन थेंब बेंबीत टका,काही थेंब बेंबीजवळ लावून हळुवार हाताने मसाज करायचा. या उपायाने प्रजनन क्षमतेशी संबंधित कोणताही विकार असेल तर तो बरा होईल.

६} त्वचा मुलायम होण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. पण आरोग्यदायी आणि मुलायम त्वचा व्हावी असे वाटत असेल तर गावरान ,देशी गाईचे थोडेसे तूप घेऊन दोन तीन थेंब बेंबीत टाकून,काही थेंब बेंबीजवळ लावायचे.त्वचा अगदी छोटय़ा बाळासारखी मऊ होईल.

७} मूळव्याध, भगेंदर, गॅस,पोट गच्च राहणे,पोटात जडपणा असणे,पोट साफ न होणे ,गुडघे दुखणे साठी नाभीमध्ये एरंड तेल वापरल्यास खूपच फायदा होईल.

माणसाच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे मूळ बेंबीशी संलग्न असते. त्यामुळे कोणत्याही आजारावर बेंबीजवळ थोडे तूप चोळले तरी चांगला उपाय ठरतो. 

टिप - दररोज संध्याकाळी झोपतांना प्रथम २-३ थेंब तेल नाभीमध्ये टाकावेत. बोटाने थोडा मसाज देऊन परत २-३ थेंब टाकावेत आणि झोपून जावे.

       **आयुर्वेद अभ्यासक.**....*सुनिता सहस्रबुद्धे*.....*निरामय आयुर्वेद व होमिओपॅथी प्रचार*

  Cp   निरामय आयुर्वेद व होमीओपॅथी प्रचार गृप
[7/14, 2:10 PM] +91 81779 49988: *कोरडा खोकला*

 हा  खोकला अतिशय त्रासदायक असतो. खोकताना पोट आणि बरगड्यांमध्ये तीव्र वेदना होतात. काही घरगुती उपाय करून तुम्ही कोरड्या खोकल्याच्या त्रासातून स्वतःला मुक्त करू शकता.

कोरडा खोकला दूर करण्यासाठी ६ घरगुती उपायः-

बदलत्या हवामानामुळे आपल्याला छोट्या-मोठ्या आजारांची लागण होते. यातही सर्दी, खोकला आणि ताप येण्याच्या तक्रारी अधिकतर उद्भवतात. सर्दी आणि तापामुळे खोकल्याचा त्रास अधिक बळावतो. त्यातही कोरडा खोकला त्रासदायक असतो. योग्य वेळेत यावर उपाय केल्यास तुम्हाला आराम मिळेल. पण दुर्लक्ष केलं तर प्रकृती गंभीर देखील होऊ शकते.

खोकल्याचा त्रास कमी प्रमाणात असला तरीही त्यावर उपाय करणं आवश्यक आहे. 

यासाठी तुम्ही घरगुती तसंच नैसर्गिक उपचारांची मदत तुम्ही घेऊ शकता. 

सर्दी, खोकला होणे ही छोटी समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. याच निष्काळजीपणामुळे गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. 

आजारांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.

​मध

कोरड्या खोकल्यावर मधाचे सेवन करणं हा रामबाण उपाय मानले जाते. मधामुळे घशातील खवखव कमी होते. तसंच घशामधील संसर्गही दूर होतो. कोरडा खोकला कमी करण्यासाठी छोट्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिक्स करा. मध आणि पाणी नीट मिक्स झाल्यानंतर ते प्या. नियमित हा उपाय केल्यास कोरड्या खोकल्यापासून तुम्हाला आराम मिळेल.

​आले आणि मीठ

खोकला कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे. आल्याचा छोटा तुकडा कुटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. हे मिश्रण आता आपल्या दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्यावा. पाच मिनिटांनंतर आले बाहेर फेका आणि कोमट किंवा साध्या पाण्याने गुळण्या करा. पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ आले तोंडामध्ये ठेवू नका.

​ज्येष्ठमधाचा चहा

ज्येष्ठमधाचा चहा प्यायल्यानंतर कोरडा खोकला कमी होतो. हा चहा तयार करण्यासाठी कपभर पाण्यामध्ये दोन मोठे चमचे ज्येष्ठमधाची पावडर उकळत ठेवा. १० ते १५ मिनिटे पाणी उकळू द्या. यानंतर कपामध्ये चहा गाळून घ्या. तुम्हाला हवे असल्यास चहामध्ये मध मिक्स करू शकता. दिवसातून दोन वेळा हा चहा घेवू  शकता.

​हळदीचे दूध

हळदीचे दूध प्यायल्याने केवळ खोकलाच नाही तर कित्येक आजारांपासून तुमची सुटका होण्यास मदत मिळते. एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून नियमित प्या. तुमचा कोरड्या खोकल्याचा त्रास काही दिवसात कमी होईल. हळदीमध्ये कर्रक्युमिन नावाचे घटक असते. या घटकामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी संबंधित कित्येक आजारांचा त्रास कमी होतो.

​गूळ

सर्दी आणि खोकल्यावर गूळ खाणे हा प्रभावी उपाय आहे. गुळातील पोषक घटकांमुळे जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत मिळते. 

सर्दी खोकल्याव्यतिरिक्त गुळामुळे पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतात. कोमट पाण्यामध्ये गूळ पावडर मिक्स करा आणि प्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रमाण आणि दिवसातून किती वेळा हा उपाय करावा, याबाबत सल्ला घ्या.

​मिठाच्या पाण्याच्या गुळण्या
एका मोठ्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मीठ मिक्स करा. या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून दोन वेळा हा उपाय करावा. खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानं श्वसन नलिकेतील संसर्ग दूर होण्यास मदत मिळते. शिवाय खोकल्यामुळे घशामध्ये होणाऱ्या वेदनाही कमी होतात.

गरम पाण्याची वाफ

सर्दी खोकल्यामुळे कधी कधी आपल्याला श्वास घेणे देखील कठीण होते. अशा वेळेस गरम पाण्याची वाफ घ्यावी. गरम पाण्याच्या वाफेमुळे कफ बाहेर पडतो. श्वासोच्छवास करताना होणाऱ्या अडचणी दूर होतात. तसंच चेहऱ्यावरील रोम छिद्रांमध्ये जमा झालेली धूळ, माती आणि दुर्गंध देखील बाहेर फेकली जाते. पण आठवड्यातून दोन वेळाच हा उपाय करावा. अन्यथा चेहऱ्याच्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात.

Cp निरामय आयुर्वेद व होमीओपॅथी प्रचार गृप
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹
*गव्हांकुर रस*

*आता घरीच बनवा गव्हांकुर*

*गव्हांकुराच्या रसाचे फायदे:-*

गव्हाचे दाणे पेरल्यावर त्याचे गवत उगवते त्यास गव्हांकुर म्हंटले जाते. नवरात्री मध्ये आपण घटामध्ये गहू पेरल्यावर उगवलेले गव्हांकुर तुम्ही पाहिले असेलच. गव्हांकुर निसर्गा कडून माणसाला मिळालेल्या गुप्त औषधीचे अक्षय भांडार आहे.

शरीराच्या आरोग्यासाठी हा रस प्रभावी ठरला आहे, गव्हाच्या कोमल अंकुरा पासून अनेक असाध्य रोग नष्ट होतात. 

गव्हांकुर मध्ये रोगाचे उच्चाटन करण्याची विचित्र शक्ती विद्यमान आहे. शरीरासाठी हे एक शक्तिशाली टॉनिक आहे.

यामध्ये नैसर्गिक पणे कार्बोहाईड्रेट आदि सभी विटामिन, क्षार आणि श्रेष्ठ प्रोटीन असते. याच्या सेवना मुळे, विविध प्रकारच्या रोगा पासून मुक्ती मिळते.

कॅन्सर, किडनी स्टोन, हृदयरोग,लिव्हर, डायबिटीज, पायोरीया, दाताचे अन्य रोग, कावीळ, लकवा, दमा, पोटदुखी, अपचन, गैस, विटामिन ए, बी, इत्यादीमुळे झाले आजार दूर करते, सांधेदुखी, सांध्यात सूज येणे, स्कीन एलर्जी, कमकूवत नजर, पांढरे केस, केसांचे गळणे, त्वचेवरील घाव तसेच भाजलेली त्वचा इत्यादीत फायदेशीर आहे.
.................................###निरामय###आयुर्वेद...
#गव्हांकुर उगवण्याची पद्धत:-

एक मातीचे भांडे घ्यावे किंवा कुंडी घ्यावी. त्यामध्ये खत मिश्रित माती घ्यावी. रासायनिक खताचा वापर बिलकुल करू नये. पहिल्या दिवशी कुंडीतील सर्व माती झाकल्या जाईल एवढे गहू पेरावेत. पाणी टाकून कुंडीला सावलीत ठेवा. सूर्याचा प्रकाश कुंडीला सरळ आणि प्रखर मिळणार नाही याची काळजी घ्यावी.

दुसऱ्या दिवशी दुसरी कुंडी घेऊन वरील प्रमाणे गहू पेरावेत असे नऊ दिवस नऊ कुंड्या तयार कराव्यात. सर्व कुंड्यांना दररोज पाणी द्यावे. नवव्या दिवशी पहिल्या कुंडी मधील उगवलेले गहू कापून उपयोगात आणावेत. रिकाम्या झालेल्या कुंडी मध्ये पुन्हा गहू पेरणी करावी. असे दुसऱ्या दिवशी दुसरी कुंडी तिसऱ्या दिवशी तिसरी कुंडी असे क्रमाने करत राहावे. या प्रक्रियेत चुकून ही प्लास्टिकच्या भांड्यांचा आणि कुंडीचा वापर करू नये.

प्रत्येक कुटुंबाने आपल्या गरजे नुसार कुंड्याचे गव्हांकुर किती प्रमाणात उगवायचे हे स्वत: ठरवावे. फक्त या कुंड्यांना दुपारच्या प्रखर उन्हात ठेवू नये. सकाळ आणि संध्याकाळ ठेवल्यास हरकत नाही.

सामान्य पणे आठ-दहा दिवसात गव्हाचे हे अंकुर पाच ते सात इंच वाढतात. हे अंकुर अतिशय गुणकारी असतात. जस जसे अंकुर सात इंचां पेक्षा मोठे होत जातील तसे त्यांचे गुण कमी होत जातात. त्यामुळे सात इंच वाढण्या पूर्वीच त्यांचा वापर करावा.

तुम्ही अंकुर कैची ने कापून किंवा समूळ उपटून वापरू शकता. खाली झालेल्या कुंडीत पुन्हा गहू पेरणी करा अश्या प्रकारे दररोज एका कुंडी मधून तुम्हाला अंकुर काढायचे आहेत आणि पुन्हा नवीन गहू पेरणी करायची आहे.

#गव्हांकुर बनवण्याची कृती:-

पाच ते सात इंच अंकुर वाढल्या नंतर ते कापावेत किंवा समूळ उपटावे त्यानंतर त्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे. धुतल्यानंतर लगेचच त्यांना कुटावे. कुटल्यावर लगेच यांना कपड्याने रस काढावा. असे तीन वेळा कुटून पुन्हा रस काढण्यामुळे जास्तीत जास्त रस मिळेल.

ही सर्व प्रक्रिया करताना वेळ वाया घालवू नये एका नंतर एक त्वरित प्रक्रिया करत राहावी कारण मध्ये वेळ वाया घालवल्यास त्याचे गुण कमी होतात आणि तीन तासात तर त्याचे सर्व पोषक तत्व नष्ट होतात. सकाळी रिकाम्या पोटी रस घेण्यामुळे जास्त फायदा होतो.

तसे पाहता दिवसातून कधीही तुम्ही हा रस घेऊ शकता पण हा रस घेण्याच्या अर्धा तास अगोदर आणि अर्धा तास नंतर तुम्हाला काहीही खायचे किंवा प्यायचे नाही आहे.
...............................###निरामय##आयुर्वेद....
सुरुवातीला रस पिण्यामुळे मळमळ होणे, उलटी येणे किंवा सर्दी होणे असा त्रास होऊ शकतो पण त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.

शरीरात किती विषतत्व जमा झाले आहेत हे त्याचे प्रमाण आहे. सर्दी, जुलाब किंवा उलटी झाल्यामुळे हे शरीरात एकत्रित जमा झालेले विष निघून जाते.

गव्हांकुराचा रस काढताना त्या मध्ये मध, अद्रक(आले), नागरवेलीची पाने (विड्याची पाने) पण त्यामध्ये टाकू शकता.

यामुळे चव आणि गुणांमध्ये वाढ होईल आणि मळमळ होणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे गव्हांकुरात कधीही मीठ किंवा लिंबू कधीही टाकू नये.

रस काढण्याची सुविधा नसेल किंवा त्रास वाटत असेल तर गव्हांकुर चावून खालले तरी चालेल. यामुळे दातांच्या हिरड्या मजबूत होतील. तोंडाची दुर्गंधी येत असेल तर दिवसातून तीन-चार वेळा गव्हांकुर चावून खाण्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. दिवसातून दोन किंवा तीन वेळा गव्हांकुराचा रस घ्यावा. 

गव्हांकुरा मध्ये दुध, दही आणि मटन-चिकन पेक्षा जास्त पटीने गुणकारी आहे. दुध आणि मांसात जे फायदे नसतात त्यापेक्षा जास्त फायदे या रसात आहेत.

तरीही दुध, दही आणि मांसापेक्षा स्वस्त आहे. घरी उगवल्यास नेहमी उपलब्ध आहे. अति गरीब व्यक्ती पण या रसाचा वापर करून आपले आरोग्य सुधारू शकतो....
..................####निरामय###आयु्र्वेद.........
नवजात मुलांपासून ते वृद्धा पर्यंत सर्व याचा वापर करू शकता. नवजात बालकास पाच थेंब रस देऊ शकता.........

......

.                
...............
गव्हांकुरात जवळजवळ सर्व क्षार आणि विटामिन उपलब्ध आहेत. त्यामुळे शरीरात कोणत्याही घटकाची कमी असल्यास त्याची पूर्ती आश्चर्यकारक पणे गव्हांकुर करतात.

याच्या मदतीने प्रत्येक ऋतूमध्ये नियमित प्रमाणत प्राणवायू, खनिज, विटामिन, क्षार आणि शरीरविज्ञान मध्ये सांगितलेल्या कोषांना जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व तत्व मिळवले जाऊ शकतात.

गव्हांकुराचे रस घेणे सुरु करा आणि फक्त तीन आठवड्यात आपल्या कमजोर झालेल्या शरीरात पुन्हा स्फूर्ती, टवटवीतपण आणि ताजेपण घेऊन या.

*गव्हांकुराचा रस पिण्यामुळे कॅन्सर सारखे असाध्य रोग नष्ट होतात व शरीर निरोगी राहते........*

.......आयुर्वेद अभ्यासक 
*✍️सुनिता सहस्रबुद्धे....*

                          *निरामय आयुर्वेद प्रचार....*