बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

📓 *भारतीय संविधानावर आधारित सर्वात मोठी*

📓 *भारतीय संविधानावर आधारित सर्वात मोठी*
👉 *"प्रश्नावली"* 👈

*JayBhim Today | Special*

💁‍♂️ भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने घटनेबद्दल प्रश्नोत्तरांरुपी अनन्यसाधारण माहिती आम्ही पोहोचवत आहोत. भारतीय संविधानाची मुख ओळख लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत व्हायला हवी, या उद्देशाने जास्तीत जास्त वाचकांना खालील प्रश्नावली पाठवावी. व आपणही काळजीपूर्वक वाचावी.

http://www.jaybhim.today

*१)* अस्पृश्यता पाळणे हा कोणत्या कलमाने दंडनीय गुन्हा आहे?
👉 कलम १७

*२)*  संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*३)* संविधानात एकूण किती परिशिष्टे आहेत?
👉 १२ परिशिष्टे

*४)* संविधानात एकूण कलमे किती ?
👉 मूळ ३९५ कलमे (सध्यस्थितीत ४४८)

*५)* घटनेनुसार संघराज्याची अधिकृत भाषा कोणती?
👉 हिंदी {इंग्रजीचाही वापर होऊ शकतो} (हा घटनासमितीतील सर्वाधिक वादाचा मुद्दा होता, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आठवणीत नमूद केले आहे.)

*६)* संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?
👉 २ वर्ष ११ महिने १८ दिवस

*७)* भाषणस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य कोणत्या कलमाच्या अधिकारात येते?
👉 कलम १९ ते २२

*८)* नवीन राज्यांची निर्मिती कोणत्या कलमांतर्गत येते?
👉 कलम २

*९)* कोणत्या कलमांतर्गत समाजातील मागास घटकांच्या (विशेषतः आदिवासी व दलित घटकांना) उन्नतीस शासन बांधील आहे?
👉 कलम ४६

*१०)* संविधानात कोणाचे हस्तलेखन आहे?
👉 बिहारी नारायण रायजादा (कॅलिग्राफी पद्धत), संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले.

http://www.jaybhim.today

*११)* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या अधिकाराचे वर्णन 'संविधानाचे हृदय आणि आत्मा' असे केले होते?
👉 घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क

*१२)* संविधान सभेची प्रथम बैठक केव्हा पार पडली?
👉 ९ डिसेंबर १९४६

*१३)* संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना काय म्हणतात? 
👉 मूलभूत कर्तव्य

*१४)* १. भारतीय संविधानाने कोणते मूल्य स्वीकारले आहे?
👉 धर्मनिरपेक्षतेचे

*१५)* घटनेनुसार निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते? 
👉 निवडणूक आयोग

*१६)* संघशासनाला कोणत्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार नाही?
👉 कायदा आणि सुव्यवस्था

*१७)* संघशासनाच्या अधिकारांविषयीच्या सूचीला काय म्हणतात?
👉 संघसूची

*१८)* 'शोषणाविरुद्धचा हक्क' या अंतर्गत संविधानाने कोणत्या बाबींवर बंदी घातली आहे?
👉 माणसांची खरेदी-विक्री, गुलामगिरी व वेठबिगारी, कारखाने, खाणी किंवा इतर धोकादायक ठिकाणी मुलामुलींना कामावर ठेवणे.

*१९)* मूलभूत अधिकारांचे रक्षक (fundamental rights protector) कोणाला म्हंटले जाते?
👉 सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय

http://www.jaybhim.today

*२०)* भारतीय संविधान संपूर्ण ताकदीने केव्हा लागू झाले?
👉 २६ जानेवारी १९५०

*२१)* कोणत्या कलमान्वये ६ ते १४ वर्षांपर्यंत मुलांना प्राथ. शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली? (right to education)
👉 कलम २१

*२२)* सत्तेचे भारतात कोणत्या तीन प्रकारे विकेंद्रीकरण झाले आहे?
👉 कार्यकारी (प्रशासकीय), कायदेकारी (विधिमंडळे), न्यायालयीन

*२३)* न्यायालयीन सत्तेचे सर्वोच्च अधिकार कोणाकडे असतात?
👉 सर्वोच्च न्यायालय

*२४)* आणीबाणीचे कोणते तीन प्रकार आहेत?
👉 राष्ट्रीय आणीबाणी, प्रादेशिक आणीबाणी, आर्थिक आणीबाणी (३५८व्या कलमानुसार कलम १९ मधील नागरिकांचे अधिकार आणीबाणीच्या काळात आपोआप समाप्त होतात.)

*२५)* भारतीय संविधानानुसार देशाचा प्रथम नागरिक कोणास म्हंटले जाते?
👉 राष्ट्रपती

*२६)* संविधानातील मूलभूत कर्तव्यांची संख्या किती? (Fundamental duties)
👉 ११

*२७)* भारतीय सैन्याचा सर्वोच्च सेनापती कोण? (Supreme commander)
👉 राष्ट्रपती

*२८)* लोकसभेची व राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती?
👉 ५५२,   २५०

*२९)* लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त वेळेचे अंतर किती असावे?
👉 ६ महिने

http://www.jaybhim.today

*३०)* राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो?
👉 राज्यपाल

*३१)* भारतात एकूण किती राज्यांत विधान परिषड अस्तित्वात आहे?
👉 ६   (सध्या प.बंगाल मध्येही)

*३२)* विधानसभेचे वर्षातून कमीतकमी किती अधिवेशन होणे गरजेचे आहे?
👉 २ अधिवेशने

*३३)* सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? व एकूण संख्या किती आहे?
👉 राष्ट्रपती करतात,   एकूण संख्या ३४

*३४)* मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते?
👉 लोकसभेला

*३५)* कोणत्या कलमांतर्गत बालमजुरी व मानवी तस्करी (human trafficking) पासून सं‍रक्षण मिळाले आहे?
👉 कलम २३ व कलम २४

*३६)* अल्पसंख्याकांना संरक्षण व स्वतःच्या शिक्षणसंस्था स्थापण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमांतर्गत प्राप्त झाले?
👉 कलम २९ व कलम ३०

*३७)* मूलभूत अधिकारांचे हनन झाले आहे असे वाटल्यास कोणत्याही व्यक्तीला कलम ३२ अन्वये कुठे तक्रार करता येते?
👉 थेट सर्वोच्च न्यायालयात

*३८)* अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित संवर्धन कोणत्या कलमांतर्गत करण्यात आले आहे?
👉 कलम ४६

*३९)* भारतीय संविधान लागू करण्यापूर्वी संविधान सभेच्या किती बैठका झाल्या?
👉 ११ सत्रे (बैठका)

*४०)* राज्यघटनेच्या अंतिम मसुद्याची एकूण किती वाचने झाली?
👉 तीन
• प्रथम वाचन (४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर १९४८)
• दुसरे वाचन (१५ ऑक्टोबर  ते १७ ऑक्टोबर १९४९)
• तिसरे वाचन (१४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर १९४९)

http://www.jaybhim.today

*४१)* कितव्या वयानंतर सर्वांना सार्वत्रिक प्रौढ मताधिकार दिलेला आहे?
👉 सुरुवातीला २१ वर्षे, परंतु १९८९ साली झालेल्या ६१ व्या घटनादुरुस्तीनंतर १८ वर्षे

*४२)* संविधानाच्या सरनाम्यातील शब्दांचा योग्य क्रम कोणता?
👉 सार्वाभोम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य

*४३)* कायद्यामोर सर्वाना समान वागणूक ही बाब कोणत्या मूलभूत हक्कांर्तगत येते?
👉 समानतेचा हक्क

*४४)* भारतीय संविधानानुसार कोणत्या अधिकारांवर निर्बंध टाकता येत नाही? किंवा उल्लंघनही करता येत नाही?
👉 मूलभूत अधिकार

*४५)* सध्यस्थितीत अस्पृश्यता निर्मूलन कायद्याचे नाव काय आहे?
👉 नागरी संरक्षण अधिनियम

*४६)* राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाची निर्मिती कोणत्या कलमांतर्गत झाली?
👉 कलम ५२,      कलम ६३

*४७)* कलम ७८ नुसार राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे कोणाचे कर्तव्य आहे?
👉 प्रधानमंत्री यांचे

*४८)* राष्ट्रपतीला वटहुकुम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत आहे?
👉 कलम १२३

*४९)* भारतीय संविधानाचे नागरिकांप्रती मुख्य उद्दीष्ट काय?
👉 न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता

*५०)* भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हंटले जाते?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कारण संविधान बनवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्णपणे सिंहाचा वाटा व महत्त्वाचे योगदान होते आणि त्यांनी ते अथक परिश्रमाने, जोमाने व प्रभावीपणे जोपासले. 

📱 *सर्व क्षेत्रातील अपडेट्ससाठी तुमचा Whatsapp Number रजिस्टर करा.*
http://www.jaybhim.today

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

अखेरचा सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकर*

*अखेरचा सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकर*

*-संजय सोनवणी*

संकटांची वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रुरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता *महाराजा यशवंतराव होळकर यांची पुण्यतिथी २८ ऑक्टोबरला आहे. त्या निमित्ताने यशवंतराव होळकरांच्या कर्तृत्वाचा घेतलेला हा वेध...*

यशवंतराव होळकरांचा (३-१२-१७७६ ते २८-१०-१८११) एकूण जीवनप्रवास थक्क करणारा आहे. असा थरारक रोमांचक जीवनप्रवास, संकटांची एवढी वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रूरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल.

यशवंतरावांना राज्य सोडा साधी बोटभर जहागीर वंशपरंपरेने मिळालेली नाही. ती त्यांना भिल्ल-पेंढारी व पठाणांच्या स्वत: उभारलेल्या अल्प सन्याच्या जिवावर प्रशिक्षित पलटनींशी लढून मिळवावी लागली. त्यांनी िशदे-पेशव्यांच्या घशातून जप्त झालेले होळकरी प्रांत अविरत लढत-लढतच मुक्त केले. एवढेच काय, पण िशद्यांनी कैदेत टाकलेली पत्नी आणि अल्पवयीन कन्येलाही लढूनच मुक्त केले. *६ जानेवारी १७९९ रोजी राज्याभिषेक करून घेऊन सावभौमतेची द्वाही फिरवली. शिवरायांनंतर स्वत:चे राज्य स्वत:च्या हिमतीवर मिळवणारा, शेवटपर्यंत स्वतंत्र राहणारा, स्वत:हून एकही तह कोणाशीही न करणारा हा एकमेव महायोद्धा होता.**

दौलतराव िशद्यांनी व पेशव्यांनी त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर आपत्तीमागून आपत्ती कोसळवल्या. त्यांचे बंधू दुसऱ्या मल्हाररावांचा खून केला. यशवंतराव व विठोजीरावांना कोवळ्या वयात आश्रयासाठी वणवण भटकावे लागले. रघोजी भोसल्यांनीही विश्वासघात केला. त्या क्षणापासून यशवंतरावांचे जीवन पूर्ण पालटलेले दिसते. त्यांनी स्वत: आपला मार्ग निर्माण केला, स्वत:च स्वत:चे नियम बनवले आणि आपली अविरत वाटचाल सुरू ठेवली.

पेशव्यांनी त्यांचा थोरला भाऊ विठोजीरावाला अत्यंत क्रूरतेने ठार मारले. शत्रूलाही कोणत्याही राजसत्तेने अशी शिक्षा दिलेली नाही, तरीही संतापाच्या भरात आततायी कृत्य करणे त्यांनी टाळले. हडपसरच्या युद्धात त्यांनी स्वत: ऐन जंगेत उतरून जो पराक्रम गाजवला त्याचे गुणगान त्यांचा कट्टर शत्रू मेजर माल्कमही करतो. खरे तर *पेशव्यांनी यशवंतरावांच्या पराक्रमाचा दौलतीसाठी उपयोग करण्याची थोडीतरी दूरदृष्टी दाखवली असती, तर इंग्रजांचे राज्य या देशात कदापि आले नसते, हे यशवंतरावांनी एकटय़ाच्या जिवावर इंग्रजांशी जी युद्धे केली-जिंकली त्यावरून सहज स्पष्ट होते.*
.
वसईचा तह झाल्यानंतर इंग्रजांच्या आसुरी आकांक्षांचा अंदाज आलेला हा पहिला भारतीय शासक. िशदेंशी परंपरागत हाडवैर असूनही, त्यांनी होळकरांचे एवढे अपराध केले असूनही त्यांनी िशदेंना व भोसलेंना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. 

*यशवंतरावांची युद्धनीती इंग्रजांना नेहमीच बुचकळ्यात टाकत राहिली. गनिमीकाव्याचा खरा उपयोग शिवरायांनंतर केला तो फक्त यशवंतरावांनी. गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशांत उपयुक्त असतो हे खोटे आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.* मोन्सनचा भीषण पराभव हा गनिमीकाव्याचा अभिनव आणि कल्पक नमुना होता. युद्धशास्त्राच्या अंगानेही त्याचे विश्लेषण व्हायला हवे. आधी शत्रूला आपल्या मागे आणून, मग त्याला उलटे पळायला लावून, बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवून भर पावसाळ्यात गाळाच्या जमिनीत त्याची फजिती करत तब्बल २५० मैल पाठलाग करत, क्रमाक्रमाने त्याची शक्ती कमी करत नेत कसे संपवावे याचे हे एकमेव उदाहरण. या युद्धात इंग्रजांचे दहा हजारापेक्षा अधिक सन्य ठार झाले..


खरे तर इंग्रजी सैन्य हे खूप प्रशिक्षित आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते. भारतातच काय फ्रान्समध्ये नेपोलियनलाही धूळ चारणारे हे इंग्रजी सन्य. त्यात इंग्रजांनी यशवंतरावांवर कोण सोडला तर जनरल जेरार्ड लेक. अत्यंत अनुभवी आणि कडवा सेनानी. त्याला यशवंतरावांनी भरतपूरच्या युद्धात धूळ चारली. त्याचा पराभव हा इंग्रजांच्या जिव्हारी लागणारा होता. जनरल स्मिथ, कर्नल मोन्सन, मरे, फोसेटसारख्या दिग्गजांचा पराभवही यशवंतरावांनी लीलया केला. याचे कारण म्हणजे यशवंतरावही आधुनिकतेचे भोक्ते होते. इंग्रजांएवढी नसली तरी त्यांच्या सैन्याला त्यांनी पाश्चात्य शिस्त लावली होती. पेंढाऱ्यांसारख्या तशा बेशिस्त आणि बेबंद सन्यालाही त्यांनी आपल्या कडव्या शिस्तीच्या जोरावर कह्य़ात ठेवले होते. *उज्जैन व पुण्यावरील मोठय़ा विजयानंतरही त्यांनी पेंढाऱ्यांना शहरे लुटू दिली नाहीत. ज्यांनी प्रयत्न केले त्यांना हात-पाय तोडायच्या शिक्षा दिल्या. इंग्रजांनीही त्यांच्या या कठोर शिस्तप्रियतेचे कौतुक केले आहे.* 

अहिल्याबाई व नंतर तुकोजीरावही गेल्यानंतर होळकरांचे राज्य बेवारस असून ते गिळता येईल असाच दौलतराव व बाजीराव पेशव्यांचा होरा होता. आणि ते शक्य केलेही. पण यशवंतराव एवढे पराक्रमी निघतील व जप्त केलेले होळकरी राज्य ते परत जिंकून घेतील याचा त्यांना अदमास आला नाही.

तत्कालीन िहदवी राज्यकर्त्यांमध्ये आस्तित्वातच नसलेले यशवंतरावांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे *त्यांना उमगलेली राष्ट्रभावना. यशवंतरावांसमोर फक्त स्वत:चे राज्य कधीच नव्हते.. तर संपूर्ण देश होता.* त्यासाठी ते सर्व राजेरजवाडय़ांना, िशदे-भोसलेंना जी पत्रे धाडत होते त्यातील राष्ट्रीयता दाहक आहे. ते पत्रांत म्हणतात..*‘पहिले माझे राष्ट्र, माझा देश. आज धर्म, जात, प्रदेश याच्यापलीकडे जाऊन देश-राष्ट्रहित पाहण्याची गरज आहे.* माझ्यासारखेच तुम्हा सर्वाना इंग्रजांविरुद्ध संघर्षांने युद्धास उभे राहिले पाहिजे.’ पुढे यशवंतराव भोसलेंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘पूर्वी स्वराज्यात ऐक्यता बहुत. येणे करोन आजपावेतो व्यंग न पडता एकछत्री अंमल फैलावला होता..’ स्वराज्याची आठवण करून देत यशवंतराव पुढे तेच स्वराज्य घरापुरते करण्यात जमीनदार ते सरदार कसे गर्क झाले आहेत ही कटु वस्तुस्थिती विषद करत खंत व्यक्त करतात. *यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गव्हर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली.*

कलकत्त्यावर आक्रमण करून एकटय़ाच्या जिवावर भारत स्वतंत्र करण्याची त्यांची उमेद अखेरच्या क्षणापर्यंत अभंग होती. मला वाटते कोणत्याही महाकवीला स्फूर्ती देईल असेच हे वादळी जीवन होते. दुर्दैवाने २८ ऑक्टोबर १८११ रोजी ऐन तारुण्यातच वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी  त्यांचे निधन झाले. असा महान  पहिला  स्वातंत्र्ययोद्धा  आपल्या धर्तीवर जन्माला आला हे आपले भाग्यच आहे. त्यांना पुण्यस्मरण  दिनानिमित्त विनम्र अभिवादन!


*संजय सोनवणी*
9860991205