शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

नारायण मूर्ती शून्यातून

वर्ष 1978 – 

नारायण मुर्ती तेव्हा पटनी कॉम्पुटरमध्ये नोकरी करत होते, कंपनीच्या काही कामानिमीत्त ते ऑनसाईट म्हणजे पॅरीसला गेले होते.

जाताना ते विमानाने गेले होते, काही महिन्यांनी त्यांचे काम पूर्ण झाले, नारायण मुर्ती यांच्या मनात साम्यवाद आणि डाव्या चळवळीविषयी आकर्षण होते, तेव्हा वापस येताना त्यांनी विमानाने न येता, एकामागे एक देशांना भेटी देत येण्याचा मार्ग निवडला.

त्यांना मिळालेली संपत्ती त्यांनी तेथील गरजुंना दान केली, आणि सोबत प्रवासापुरते फक्त चारशेपन्नास डॉलर्स ठेवले.

ह्या प्रवासात ते साम्यवादी देशांना भेटी देऊ शकणार होते, आपल्या देशात आणि डाव्या देशांमध्ये असलेला फरक ते अनुभवणार होते.

विवीध लोकांशी संवाद साधणार होते.

पॅरीसमधुन बाहेर पडून अनेक देशांमधुन प्रवास करुन ते बल्गेरीयात पोहचले, तेव्हा एक आक्रित घडले.

एका ट्रेनच्या प्रवासात, ते सोबतच्या एका सहप्रवाशी स्त्रीला देश आणि तिथल्या कार्यपद्धतीबद्द्ल विचारपुस करु लागले. दुर्दैवाने ती स्त्री मुलुखाची संशयी होती. तिला वाटले, की नारायण मुर्ती गुप्तहेर आहेत, जे आपल्या देशाविषयी माहिती जमा करत आहेत.

तिने गस्तीवर असलेल्या पोलिसांना हा माणुस संशयास्पद असल्याची तक्रार केली.

नारायण मुर्तींना त्या अज्ञात प्रदेशात अटक झाली. त्यांचं काहीएक ऐकुन घेतलं गेलं नाही,

त्यांच्याजवळचं सगळं सामान जप्त केलं गेलं.

त्यांना एका आठ बाय आठ च्या खोलीत डांबुन ठेवलं गेलं. 

तब्बल बाहत्तर तास!

जेवायलाही दिलं गेलं नाही.

त्या खोलीला खिडकी नव्हती, ना टॉयलेटची व्यवस्था होती.

नारायण मुर्ती प्रचंड घाबरले होते, कोणीही त्यांचं ऐकुन घेत नव्हते. आता जगु की वाचु, इथुन बाहेर कसे पडु, काहीच समजत नव्हते,

तीन दिवसांनी पोलीसांनी त्यांना बाहेर काढले, अत्यंत अपमानास्पद वागणुक देत, त्यांना बल्गेरीयाच्या बाहेर हाकलण्यात आले,

त्यांचे कपडे, सामान, पैसे दिलेच नाहीत, वर सुनावले,

“भारत बल्गेरीयाचा मित्र आहे म्हणुन तुम्हाला जिवंत सोडत आहोत.”

नारायण मुर्ती त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात, ते बाहत्तर तास आठवले की आजही अंगाचा थरकाप होतो.

त्या जीवघेण्या घटनेनंतर, कित्येक महिने मुर्ती खोलवर डिप्रेशनमध्ये गेले होते.

ह्या घटनेने त्यांच्या जीवनावर खुप परीणाम केला.

असला दहशतवादी डावा साम्यवाद त्यांना अजिबात रुचला नाही,

त्यांनी मनोमन ठरवले, “मी एक कंपनी उभा करीन, प्रचंड मोठी कंपनी, “

“त्या कंपनीत माझ्या देशातल्या लाखो, करोडो लोकांना रोजगार मिळेल.”

“सॉफ्टवेअर क्षेत्रातली जगातली सर्वात मोठी कंपनी उभा करीन, त्यासाठी माझं सर्वस्व देईन.“

आपल्या करीअरमधला सर्वात मोठा जुगार खेळुन त्यांनी पटनी कॉम्पुटरमधला जॉब सुरक्षित आणि चांगल्या पगाराचा जॉब सोडला.

गाठिशी फार पैसे नसताना नवा डाव मांडला.

१९८१ मध्ये सुरु झालेली कंपनी हेलकावे खात सुरु होती. पहील्या दहा वर्षात काही खास झाले नव्हते.

लायसन्स राज मध्ये सरकारी बाबुंचा उद्योजकांना प्रचंड त्रास होता.

१९९० मध्ये कंपनीतल्या बाकीच्या सात पार्टनर्सनी इन्फोसीसला विक्री करुन ह्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग सुचवला.

मुर्ती प्रचंड अवस्थ झाले.

जणु नारायण मुर्तींच्या डोळ्यासमोरच त्यांच्या अपत्याचा गळा घोटला जात होता. 

कंपनी विकण्याच्या प्रस्तावाला त्यांनी प्रखर विरोध केला.

“फक्त थोडे दिवस थांबा, मला काळोखामध्ये आशेचा किरण दिसत आहे.”

हा आशेचा किरण काय होता त्यांनाही माहित नव्हते, पण त्यांची तळमळ प्रार्थना सच्ची होती.

१९९१ मध्ये तो आशेचा किरण उजडला, जागतिकीकरण झाले, भारत मुक्त अर्थव्यवस्था झाला.

लायसन्स राज संपला.

पुढच्या दहा वर्षात इन्फोसीसने इतिहास घडवला. 

इन्फोसीसचा ९२ रुपयांचा शेअर आठ वर्षात दहा हजार रुपयांपेक्षा जास्त भावाने विकला गेला, तो चक्क १४६ पटींने वाढला.

हा विक्रम आजपर्यंत कुणालाही मोडता आला नाही.

२००० साली इन्फोसीसने २००० करोड रुपये निव्वळ नफा कमवला होता.

२०१० मध्ये तो चौदा हजार करोड रुपये होता.

आजकाल तो पंचवीस हजार करोड असतो.

दोन लाख कर्मचारी, जगभरातल्या सर्व प्रमुख शहरांमध्ये अलिशान ऑफीसेस!

पगारासोबत कंपनीचे शेअर्स देऊन, इन्फोसीसने ड्रायव्हर आणि कॅंटीनवाल्यापासुन प्रत्येक कर्मचार्‍याला करोडपती बनवलं. 

फक्त एका माणसामुळे हे शक्य झालं, 

एन आर नारायण मुर्ती!

त्यांनी बघितलेल्या एका स्वप्नामुळे हा प्रवास शक्य झाला.

बुल्गेरीयात झालेल्या त्या अपमानाने त्यांना विलक्षण शक्ती दिली. 

गांधीजींना धक्के मारुन बाहेर काढण्याशी मिळताजुळता हा प्रसंग, मुर्ती पेटुन उठले.

म्हणुन की काय जगाने त्यांना नवं नाव दिलं, “कॉर्पोरेट गांधी!”

मुर्तींनीही हे नाव सार्थ केले.

अरबपती म्हणण्याइतके श्रीमंत झाल्यावरही उतले नाहीत, मातले नाहीत.

दोन हातांनी गरीबांना भरभरुन देत राहीले.

कंपनी आर्थिक समृद्धीच्या उच्चशिखरावर असताना गेली तीस वर्ष मुर्ती दांपत्य, आपल्या बेंगलोरच्या जयनगरच्या फ्लॅट्मध्ये साधेपणाने राहीले.

वीरपन्नने अपहरणाची धमकी देऊनही, सरकारकडुन सुरक्षा नाकारली.

कित्येक वर्ष त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सुधा यांनी घर-कामाला नौकरही ठेवला नाहीत.

विमानात नेहमी इकॉनॉमी क्लासनेच प्रवास केला. 

मित्रांनो, एका डिप्रेशननेच मुर्तींना ही असाधारण व्यक्तिमत्व बनवले.

आपल्या आयुष्यात जर डिप्रेशन-फीप्रेशनसारखे प्रकार आले असतील तर आपणही पेटुन उठुया.

भव्य स्वप्ने मनःपटला वर मांडुया,

दिवसातुन चौदा-सोळा तास प्रामाणिकपणे झोकुन देऊन, आपलं काम करुया.

जगाला रोज एका नव्या मुर्तीची गरज आहे.

हे ही आर्ट ऑफ लिव्हिंगच

रविवार, १ नोव्हेंबर, २०२०

तमाम भारतियांना मुहंमद पैगंबर जंयतीच्या मंगलमय शुभेच्छा!!*

*******************
🕌 *तमाम भारतियांना मुहंमद पैगंबर जंयतीच्या मंगलमय शुभेच्छा!!*🕌
*******************
१• *सामाजिक योगदान:*
••••••••••••••••••••••••••••

प्रेषित मुहम्मद जगातील पहिले व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी इतिहासात पहिल्यांदा समतेचा व्यवहारिक संदेश दिला. केवळ २३ वर्षाच्या कालावधीत त्यांनी या समतेवर आधारित समाज स्थापन करून जगाला दाखविला. राजाराम मोहन रॉय, महात्मा जोतीबा फुले, स्वामी विवेकानंद आणि बाबासाहेब आंबेडकर प्रेषित मुहम्मदांचा उल्लेख वारंवार समतेचा प्रणेता म्हणून करतात. अरब समाजात काळ्या गुलामांची खरेदी-विक्री केली जायची. जैद नावाच्या काळ्या गुलामाला आपली आत्या बहिण देऊन काळ्या-गोऱ्याचा भेद प्रेषितांनी नष्ट केला. जैद हरिसा नावाच्या गुलामाच्या घटस्पोटीतेशी विवाह करून तुच्छ समजल्या जाणाऱ्या घटस्पोटीतेला प्रेषितांची पत्नी बनण्याचा बहुमान प्रेषितांनी दिला. बिलाल नावाच्या तुच्छ समजल्या जाणाऱ्या गुलामाला काबागृहावर चढून अजाण देण्याचा आदेश देऊन कोणतीच वास्तू अपवित्र नसल्याचा संदेश प्रेषितांनी दिला आणि स्पष्ट केले कि *“आजपासून रानटीपणाच्या सर्व प्रथा आणि परंपरा मी माझ्या पायदळी तुडवीत आहे. कोणाला कोणावर कसलेही प्रभुत्व नसून सर्व समान आहेत, एकाच मानवाची संतान आहेत.”*

सर्वांना एकाच मानवाची संतान मानणे इस्लामच्या मुलभूत सिद्धांतापैकी आहे. जन्माच्या, रंगाच्या, वर्णाच्या, वंशाच्या आधारावर केला जाणारा भेद इस्लाम मुळापासून उपटून नष्ट करतो. मानवाची संतान या नात्याने सर्वांना समान हक्क, समान संधीची घोषणा इस्लामने आजपासून १४०० वर्षापूर्वी केली आणि समानतेवर आधारीत समाजाची स्थापना या जगाला करून दाखविली. स्वामी विवेकानंद म्हणतात, *“मुहम्मद पैगंबर आपल्या जीवनाने असा काही धडा घालून गेले आहेत कि त्यांच्या अनुयायांमध्ये मुसलमानांमध्ये संपूर्ण समता आणि बंधुत्व निरंतर नांदावयास हवे; त्यांच्यात जातीचा, मताचा, लिंगाचा आणि वर्णाचा भेद कदापि शिरू नये. तुर्कस्तानचा सुलतान आफ्रिकेतील गुलामांच्या बाजारातून एखादा निग्रो गुलाम विकत घेऊन त्याला साखळदंडांनी बांधून त्याला तुर्कस्तानात आणील आणि तोच गुलाम जर मुसलमान झाला आणि त्याच्या अंगात खरेच काही वकूब असेल तर सुलतानच्या शहजादीशी विवाह देखील करू शकतो. मुसलमानांचा हा उदारभाव कुणीकडे आणि तुम्हा लोकांची अमेरिकेतील निग्रो लोकांशी अमानुष वागणूक कोणीकडे?”* भारतात मुगल साम्राज्याचा महान अभियंता ठरलेला मलिक अंबर देखील एक गुलामच होता. त्याच्या सारख्या असंख्य गुलामांना आपले कर्तत्व दाखविण्याची संधी इस्लामने दिली.

एका ठिकाणी स्वामीजी म्हणतात, *“अन्य धर्मियांच्या तुलनेत मुसलमान लोक कितीतरी श्रेष्ठ ठरतात. जातीचा आणि वर्णाचा विचार न करता, सर्वांप्रती समभाव बाळगणे हे मुसलमानांचे उज्ज्वल वैशिष्ठ आहे.”* प्रेषित मुहम्मद याच्या संदर्भात भाष्य करताना स्वामीजी म्हणतात, “आपल्या मनचक्षु समोर उभे राहतात समतेचे उद्गाते – प्रेषित मुहम्मद. तुम्ही कदाचित म्हणाल कि महमदांच्या धर्मात चांगले ते काय असणार? पण लक्षात ठेवा त्यांच्या धर्मात चांगले खचितच आहे. एरवी तो धर्म अजूनही टिकला कसा बरे असता? जे चांगले आहे तेच केवळ काळाच्या विनाशक शक्तीवर मात करत असते; इतर सर्व काळाच्या भक्षस्थानी पडले तरी ते मात्र टिकून राहत असते. *प्रेषित मुहम्मद समतेचे आचार्य होते, मानवजातीतील बंधुभावाचे प्रचारक होते, मुसलमानांतील भ्रातृभावेचे दीक्षागुरु होते.”* (स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग ४, पृष्ठ १५९-१६०)

२• *स्त्रियांसाठी योगदान:*
•••••••••••••••••••••••••••••
ज्याकाळी जगातील श्रेष्ठ तत्वज्ञान स्त्रीमध्ये आत्मा असतो कि नाही? सारख्या गप्पा मारण्यात व्यस्त होते त्या काळात प्रेषित मुहम्मदांनी स्त्रीला सर्वच क्षेत्रात समान (एकसारखे नव्हे) अधिकार देऊन टाकले. प्रसिद्ध मार्क्सवादी भारतीय विचारवंत एम. एन. रॉय आपल्या ‘इस्लामचे ऐतिहासिक योगदान’ या पुस्तकात स्त्रीला माणूस म्हणून दर्जा देणारा धर्म ‘इस्लाम’ असल्याचा उल्लेख करून प्रेषितांच्या कार्याचा गौरव करतात. अरब समाजाच्या नसानसात भिनलेल्या, जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरायच्या प्रथेला केवळ १३ वर्षाच्या कालखंडात प्रेषितांनी अशाप्रकारे हद्दपार करून दाखविले की मागील १४०० वर्षाच्या इतिहासात एकाही मुलीला केवळ मुलगी असल्यामुळे मारण्यात आलेले नाही. सच्चर समितीच्या रिपोर्टनुसार भारतीय मुस्लीम समाजात मुलींचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे.

जगात महिलांसाठी इस्लाम एक क्रांतिकारक संदेश ठरला आहे. Harvard University च्या प्रख्यात जर्मन महिला प्राध्यापक Annemarie Schimmel म्हणतात कि, तुलनात्मक दृष्टीने पहिले असता असे दिसते कि इस्लामने महिलांना दिलेले अधिकार इतरांचा मानाने कित्येक पटीने पुरोगामी आहेत. प्रेषित मुहम्मदांनी आईला हा दर्जा दिला कि धर्मातील सर्वोच्च संकल्पना असलेला स्वर्ग आईच्या पायाखाली आणून ठेवला आणि “जन्नत मां के कदमो के नीचे” असल्याची शिकवण दिली. पत्नीला हा दर्जा दिला कि “तुमच्यापैकी सर्वोत्तम मुस्लीम तो आहे तो आपल्या पत्नीसाठी सर्वोत्तम पती आहे.” मुलीला हे स्थान दिले कि “ज्याला एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुली असतील आणि तो त्यांचे पालनपोषण न्यायोचित पद्धतीने करेल, तो स्वर्गात माझा शेजारी असेल” अशी शिकवण प्रेषितांनी दिली.

३• *आर्थिक योगदान:*
•••••••••••••••••••••••••

व्याजाच्या शापाने ग्रस्त झालेल्या समाजाला प्रेषितांनी सावकारी पाशातून मुक्त करून व्याजमुक्त अर्थव्यवस्थेचा संदेश दिला आणि केवळ १० वर्षाच्या कालखंडात व्याजमुक्त अर्थव्यवस्था प्रस्थापित करून दाखविली. अरब समाजात लोक सावकारी एक भयंकर पाप समजू लागले. केवळ व्याजाच्या नावाने सावकार थरथर कापू लागले. आपल्याकडे अधिक असलेली रक्कम लोक स्वत: दान करू लागले. पैसे उधार देऊन सोडून देऊ लागले. गरिबांना आणि गरजूंना मागण्याची परिस्थितीच कधी प्रेषितांनी येऊ दिली नाही. अरब प्रदेश पाहता पाहता आर्थिक दृष्ट्या इतका सधन-संपन्न झाला कि ज्याच्या आधारे अरब समाजातून दारिद्रीचा नाश झाला; जनता दान देण्यासाठी हातात रक्कम घेऊन फिरू लागली. मुस्लीम साम्राज्याने (इस्लामी नव्हे) जगावर १००० वर्षापेक्षा जास्त सत्ता गाजविली. या १००० वर्षात एकाही व्याजाच्या व्यवहाराची नोंद इतिहासात आढळत नाही. मुस्लीम शासनाला कधी कर्ज घ्यावे लागल्याची नोंद इतिहासात सापडत नाही. या उलट इतर शासनांना केलेल्या भरमसाठ मदतीच्या नोंदी आढळतात.
आज जगाला व्याजमुक्त अर्थव्यवस्थेची ओढ लागली आहे. व्याजाच्या पाशातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी आज श्रमिक वर्ग व्याज्मुक्तीची मागणी करू लागला आहे. हल्लीच भारत सरकारने मुस्लीम समाजासाठी व्याजमुक्त बँकिंगची सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. याचे भारतभर मुस्लीम समाजाने स्वागत केले आहे. तसेच इतर श्रमिक समाज देखील याची मागणी करू लागला आहे.

४• *राजकीय योगदान:*
•••••••••••••••••••••••••••

ज्या काळात राजेशाहीच एकमात्र राजकीय व्यवस्था होती त्या काळात प्रेषितांनी लोकशाहीची बीजे रोवली. मृत्यूशय्येवर असताना प्रेषितांनी आपल्यानंतर मुस्लीम समाजाचे नेतृत्व कोण करणार याची जबाबदारी मुस्लीम समाज प्रतिनिधीकडे सोपविली. आपल्यानंतर एखाद्या नातेवाईकाला जबाबदारी सोपवून घराणेशाही सुरु करण्याची संधी असूनही त्यांनी हि प्रथा लाथाडली आणि इस्लाममध्ये घराणेशाहीसाठी द्वारे कायमची बंद करून टाकली. मुस्लीम समाजाने प्रेषितांनंतर शेकडो वर्षे प्रेषितांनी दाखविलेला लोकशाही मार्ग अवलंबून दाखविला. हजारो वर्षापासून टोळीपद्धतीने राहणाऱ्या भटक्या अरब समाजाला एकसूत्र करून दाखविण्याचे श्रेय केवळ प्रेषितांचे. या समाजाला केवळ एकसूत्र करून न थांबता, या सर्व टोळ्यांना एकच समाज म्हणून मान्यता देऊन हि मान्य त्यांमध्ये केवळ १० वर्षात रुजवून दाखविणे आणि प्रातिनिधिक पद्धतीने आपल्या नेत्याची निवड करण्याची राजकीय प्रगल्भता या समाजात निर्माण करणे, सारेच अविश्वसनीय आहे. ज्या अरब समाजावर रोमन आणि पर्शियनदेखील सत्ता गाजवू शकले नाही त्या अरब समाजावर कसलीही सत्ता न देखील प्रेषितांनी आपले साम्राज्य निर्माण केले. 

प्रसिद्ध जर्मन इतिहासकार थोमास कार्लायल आपल्या ‘हिरोज अंड हिरो वर्शिप’ मध्ये म्हणतो, *“अल्पावधीत कसल्याही साहित्याच्या अभावी निर्विवाद एकहाती सत्ता गाजविणे हे केवळ दैवी देणगी आहे असे जर कोणी म्हणत असेल तर याचे श्रेय केवळ प्रेषितांना जाते. कारण अविश्वसनीय साम्राज्य केवळ त्यांचेच होते.”*

५• *शैक्षणिक योगदान:*
••••••••••••••••••••••••••

प्रत्येक मुस्लीमसाठी मग तो स्त्री असो कि पुरुष, शिक्षण प्राप्त करणे अनिवार्य असल्याचा आदेश प्रेषितांनी दिला. आपल्या अनुयायांवर शिक्षणाची सक्ती करून शिक्षणाला प्रभुत्वाचे माध्यम असल्याचा दर्जा दिला. युद्धामध्ये पकडल्या गेलेल्या युद्ध कैद्यांना ठार करण्याची प्रथा प्रचलित असताना प्रेषितांनी हा पायंडा मोडून काढला आणि एक नवा पायंडा सुरु केला. युद्धामध्ये पकडला गेलेला कैदी जर मुस्लिमांना लिहिण्या-वाचण्याचे कौशल्य शिकवू शकत असेल तर तो मुक्त केला जी. याप्रकारे प्रेषितांनी मुस्लीम समाजाला प्रत्येक क्षेत्रात केवळ १० वर्षाच्या कालखंडात अग्रेसर करून ठेवले. रानटी आणि भटक्या लोकांचा अरब समाज, प्रेषितांच्या या जगातून निरोपाच्या वेळेस एक महान संस्कृती म्हणून उदयास आला होता. *एका नव्या संस्कृतीचा, ‘इस्लामी संस्कृतीचा’ जन्म झाला होता.*

अशाप्रकारे प्रेषित मुहम्मद जगातील इतिहासात सर्वाधिक प्रभूत्वशाली व्यक्तिमत्व सिद्ध होतात. *त्यांच्या मुर्त्या आणि स्मारके नसताना आपल्या सिद्धांताच्या माध्यमातून ते जगावर आपल्या ‘न भूतो न भविष्याती’ प्रभाव टाकत राहतात.*
***************************

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

आरोग्य टिप्स

🎾 प्रत्येकाने लिहून ठेवा ही विनंती.

🎾घसा दुखत आहे ?
घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण
पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी
कमी होते.

🎾घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला
होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि
चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून
चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.
खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा
गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे.

🎾 कफ
झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व
मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.

🎾तोंड येणे, तोंडात पुरळ – तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे.
तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात
जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन
दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक,
सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्या मागे बिघडलेले पचन
हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला
की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ
कमी होण्यासही मदत मिळते.

🎾घशात जळजळ, घसा बसणे- वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे.
बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या
गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.

🎾 पाय दुखणे
मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट
सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण
पाहातो. यावर पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर
हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.

 🎾पोटदुखी
ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते.
लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते.
अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर
तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र
गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून
त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो

🎾‬चरबी कमी करा
> शरीरात जास्त चरबी वाढलेली असणाऱ्यांसाठी चरबी कमी करण्याचा खात्रीशीर रामबाण उपाय येथे देत आहोत.
> साहित्य : १०० ग्राम मेथी, ४० ग्राम ओवा, २० ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.
> कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.
> हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.
> फायदे :
> ०१) जुनाट वातविकार कायमचा जातो.
> ०२) हाडे मजबूत होतात.
> ०३) काम करण्यास स्फूर्ती येते.
> ०४) डोळे तेजस्वी होतात.
> ०५) केसांची वाढ होते.
> ०६) जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.
> ०७) रक्ताभिसरण चांगले होते.
> ०८) कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.
> ०९) हृदयाची कार्यक्षमता वाढते.
> १०) बहिरेपणा दूर होतो.
> ११) बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.
> १२) अॅलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो.
> १३) दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.
> १४) रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.
> १५) नपुंसकता असेल तर ती दूर होते.
> १६) ज्यांना मुल हवे असेल तर त्यांचे होणारे मुल तेजस्वी होते.
> १७) मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा इ. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते.
> १८) त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते.
> १९) स्त्रियांना तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते.
> २०) शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.
> २१) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टअॅटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
> २२) त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.
> २३) कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर 

कृपया वाचा आणि लिहुन ठेवा
●●●● उपयोग होईल ●●●●
▪▪..आरोग्य टिप्स..▪▪
१) अम्लपित्त वाढलले असता ऊस खावे अथवा ऊसाचा रस प्यावा त्वरीत पोट साप होते. तसेच ऊस जेवना पुर्वी खाल्यास पित्त वाढ होत नाही.

2) आवाज बसला असता बारीक वस्त्रगाळ केलेला कात दोन घोट पाण्या सोबत घ्यावा त्वरीत घसा साफ होतो. 

3) काविळ झाला असल्यास एक आठवडाभर रोज एक-दोन ऊस चाऊन खावे, किंवा दिवसातून ३/४ ग्लास ऊसाचा रस घेतल्याने रक्त तयार होण्याची क्रिया चालु होउन रूग्न बरा होतो. तसेच ताज्या गुळवेलीचा रस २० ग्रॅम खडीसाखर घालुन घेतल्यास सुध्दा काविळ बरा होतो.

४) सतत कान फुटत आसल्यास ऊसाचे कांडे गरम करून नंतर त्याचा रस काढून दोन- तिन चमचे कानात पिळल्यास कान फुटने कायमचे बंद होते. 

५) केस येण्यासाठी व कोंडा नाहीसा होन्यासाठी :– वडाच्या कवळ्या पारंब्या वाटुन १०० ग्रॅम लगदा करावा त्यात एक लिटर तिळाचे तेल व ५० मि.ली. लिंबरस घालुन मंदाग्नीवर कढवावे. नुसते तेल राहीले असता ते गाळुन घ्यावे हे तेल नियमीत लावल्याने नविन केस यायला सुरूवात होते. व कोंडा सुध्दा नाहिसा होतो. 

६) मुख दुर्गंधी :- तुरटिच्या पाण्याने गुळण्या केल्याने मुख दुर्गंधी तर जातेच व तोडाचे सर्व आजार सुध्दा दुर होतात.

७) दात दुखी :- वडाच्या पारंबिचे दातवन केल्याने दाताचे सर्व आजार बरे होतात. दाताचे किडने थांबते, दाताचे कवच पुन्हा तयार होते. 

८) दमा :- दम्याचा त्रास असनाऱ्या रूग्नाने लवंग तोंडात ठेउन ति नरम झाल्यास खावी, असे एक-एक तासाने एक-एक लवंग खात रहावे दमा कमी कमी होत जाउन १/२ महिन्यात कायमचा नाहिसा होतो. 

९) पोट साफ होण्यासाठी :- लसणच्या ८/१० पाकळ्या वाटुन तुपात तळुन सैधव लावुन दिवसातुन १/२ वेळेस खाल्याने पोट साप होते. तसेच तिळाचे तेल रोज अनशा पोटी २० मिली घेतल्याने पोट साप तर होतेच पण पोटाचे आन्सर सुध्दा बरे होतात. 

१०) पोट दुखी :- आल्याचा रस, लिंबाचा रस व सैधव किंवा पादेलोन घालुन घेतल्याने पोट दुखायचे थांबते. तसेच हे मिश्रन रोज जेवना पुर्वी घेतल्याने अन्न पचन होन्यास मदत होते. हा उपक्रम जर एक वर्ष चालु ठेवला तर घशा पासुन गुद्दव्दारा पर्यत कॅन्सरची बाधा कधीच होनार नाही. 

११) बल्डप्रेशर :- ६/७ लसणाच्या पाकळ्या आर्धा लिटर पाण्याच्या बाटलित टाकुन ति बाटलित हालवावी व नंतर दोन तास ठेवावी व त्या नंतर जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा हे पाणी प्यावे याने हाय बल्डप्रेशर कमी होउन नॉर्मल होतो.

१२) मुळव्याध :- रोज सकाळी तुळशीची पाने खल्याने मुळव्याध बरा होतो. 

१३) मुतखडा :- पानफुटिचे पान व सोबत एक काळा मिरा असे दिवसातुन तिन वेळा खाल्याने मुतखडा १५ दिवसात गळुन पडतो. 
▪नोट :-▪
 मुतखडा असलेल्या व्यक्तीनी खालील वस्तु खावु नये – 
१) आवळा २) चिकु ३) भेंडी 
४) पालक ५) गोबी ६) काकडी 
७) स्ट्रॉबेरी ८) वाटान्याच्या शेंगा 
९) टोमॅटो १०) काळी द्राक्षे ११) काजु १२) कॉफी पिउ नये १३) मशरूम १४) वांगे. 
कारण यात खूप कॅल्शियम जास्त असते.
▪माहीती संकलन  व प्रसारण ▪ हिन्दवी चँरिटेबल ट्रस्ट 
- इंद्रायणीनगर-भोसरी - पुणे
✅हार्ट अटॅक..???
घाबरू नका..!!!
सहज सुलभ उपाय...!
99 टक्के  ब्लॉकेजेसना काढून टाकणारे पिंपळाचे पान...💚15 पिपळळाची पाने जी  गुलाबी  नसावीत,पण हिरवी, 
कोवळी, चांगली वाढलेली असावीत...प्रत्येक पानांचे
 वरचे टोक व खालचा जाड देठ पानाचा थोडाश्या भागासकट कापून टाका, मग सर्व पंधरा पाने 
स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात ही पाने व एक ग्लास पाणी घालून मंद आचेवर उकळत ठेवा.जेव्हा पाणी(1/3)
एक त्रितीयांश उरेल तेव्हा उकळवणे बंद करा व गाळून घ्या...नंतर थंड जागी ठेवा.झाले आपले औषध तयार...!
 ☕...☕...☕हा काढा 'तीन भागात' प्रत्येक तीन तासांनी
 सकाळपासून घ्यावयाचा आहे.💔हार्ट अटॅक नंतर लागोपाठ पंधरा दिवस अशा प्रकारे पिंपळकाढा घेतल्याने
 ह्रदय पुनः स्वस्थ होते💝 व पुन्हा हा दौरा पडण्याची
 शक्यता राहात नाही...ह्रदय विकारी व्यक्तींनी ह्या ईलाजाचा प्रयोग अवश्य करून पहावा.. यातून कोणताही 
साईड इफेक्ट होत नाही..!
💚पिंपळाच्या पानात ह्रदयाला शक्ति आणि शांती देण्याची अदभूत क्षमता आहे..!💚ह्या पिंपळकाढ्याचे
 तीन डोस सकाळी 8.00वा., 11.00वा., व 2.00वा. म्हणजे दर तीन तासांनी घ्यावयाचे आहेत....💙डोस घेण्यापूर्वी 
पोट रिकामी असता कामा नये. हलका, पाचक नाश्ता किंवा आहार केल्यानंतरच काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे.
💜सदरच्या पंधरा दिवसांत तळलेले पदार्थ,भात व्यर्ज आहेत...तसेच मांस, अंडी, दारु, धुम्रपान पूर्णतः बंद करावीत... मीठ व तेलकट पदार्थ सेवन करू नये...
💖डाळींब, पपई, आवळा, लसूण, मेथी, सफरचंद,मोसंबी, रात्री भिजवलेले काळे चणे,  गुगूळ,
मनुका,दही, ताक इ. घ्यावे...
"पिंपळकाढा घेऊन तर बघा..!"भगवंताने पिंपळाचे पान 
💚ह्रदयाच्या आकाराचे कां बनविले आहे..?
हे आर्टीकल आपल्या पर्यंत Dr.Devendra Sathe
 यांनी पाठवले आहे..!!!
🌴  आरोग्य वार्ता🌴

 "पाणी पिण्याची योग्य वेळ"
● 3 ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर शरीरातील उर्जेला Activateकरतो.
● 1 ग्लास अंघोळ केल्यानंतर -ब्लड प्रेशर त्रास संपवतो.
● 2 ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे -पचनक्रिया सुधारतो.
● अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी -हार्ट अटैक पासुन वाचवतो.

जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीतदुखायला लागले,हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंतजाणवत असेल..तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो....जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेलआणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेल, तर तुम्ही स्वत:ची मदत करूशकता....* जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत रहा.* प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या.* दीर्घ श्वासामुळे फुप्फुशांनाअधिकप्रमाणातऑक्सिजनमिळतो.* अशा वेळी खोकत राहिल्याने   रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतचालू राहते.मी, आपणांस एक विनंती करू इच्छितो.. कृपया जास्तीत जास्त लोकांना हि पोस्ट शेअर करा.का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात.....!!!
👏👏💥👏👏




सहाधारी व अष्टपैलु भेंडी /
रोज लावावी तोंडी// 

भेंडी मला न आवडणारी पण औषध म्हणून सुप प्यायच ठरलेल.
ऐकदा अभिरुची व्हेजमध्ये भेंडीफ्राय मिसेस नी आॕर्डर केली .तेव्हापासुन त्या भेंडीफ्रायच्या ऐवढ प्रेमात पडलो की आता आॕर्डर तेवढीच मागविली जाते.
कुणी पंढरपूरचे असेल कींवा पांडुरंगास दर्शनास आले तर  अभिरुचीमध्ये भेंडीफ्राय खायच विसरु नकाच. 

स्वानुभव-- 

1)डेंगुत प्लेटलेट्स कमी होतात त्यात पपई रस व भेंडी सुप  अप्रतिम गुण. 

2)आजारपणातुन उठल्यावर भेंडीसुप व जीरे तब्येत ठणठणीत करते. 

3)मुलांना स्मरणशक्ती साठी भेंडीचा चिकयुक्त सुप खुप गुणकारी. 

4)धातुपुष्ट होण्यास व शुक्राणु वाढण्यास बळामुळ, मुसळी, ढोरगुंज मुळी अल्फाअल्फा ,चुर्णासोबत कोवळ्या पाच सहा भेंडी चाउन खावी. 

5)आमवातावर भेंडीमुळ खडीसाखरेत सोबत. 

आता ईतर माहीती व रेसीपी बघुया
* काही भागांमध्ये भेंडीच्या कापलेल्या देठांना पीण्याच्या पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी अनुशापोटी हे पाणी पितात . उरलेल्या भेंडीच्या देठांना फेकून दिले जाते . मधुमेह नियंत्रण आणण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे . 
* भेंडीच्या बीयांना एकत्रित करून घ्यावे . त्यानतंर त्यांना उन्हात वाळवावे . वाळल्यानंतर त्यांना बारीक वाटून घ्यावे . या बीयांमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते आणि उत्तम शरीरासाठी हे उपयुक्त असते . या चुर्णाला लहान मुलांना खाऊ घातल्याने ते एका टॉनिकप्रमाणे काम करते . 

* वंध्यत्व दूर करण्यासाठी पुरूषांना कच्ची भेंडी खाण्याचा सल्ला दिला जातो . शारीरिक कमतरता दूर करण्यासाठी भेंडी चांगला उपाय असल्याचे आदिवासी मानतात .
* भेंडी मध्यभागी कापून , लिंबूचा रस अर्धा चमचा , डाळींब आणि भूई आवळ्याची पाने ( ५-५ ग्रॅम ) रात्रभर १ ग्लास पाण्यात ठेवा . त्यानंतर सकाळी या सर्वांचे चांगल्या प्रकारे मिश्रण बनवून दररोज दोन वेळा असे सात दिवस घ्यावे . या उपचाराने कावीळ एका आठवड्यात बरी होते . 
ताप आणि सर्दी - खोकल्यावरही हा एक चांगला रामबाण उपाय आहे . 
व्हिटॅमिन ' सी ' या भाजीत मुबलक असते . आकडेवारीच पाहायची तर १०० ग्रॅम भेंडीमधून शरीरासाठी आवश्यक असलेले जवळपास ३८ टक्के व्हिटॅमिन ' सी ' सहज मिळते . या व्हिटॅमिनमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून अनेक आजारांपासून संरक्षण होते . म्हणून संत्री व आवळा यातून जसे व्हिटॅमिन ' सी ' मिळवता तसेच भेंडी खाऊनही मिळवता येईल . 
• भेंडयांमध्ये पेक्टिन हे सोल्युबल फायबर भरपूर असते . त्यामुळे रक्तामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन हृदयविकाराचा धोका टाळता येतो . शिवाय या भाजीत पॉलिफिनोलसारखे ऍण्टीऑक्सिडंटही खूप असतात . त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते . • भेंडीमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण इतर भाज्यांपेक्षा जास्त असते . या भाजीमुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ करणारे फ्री रॅडिकल्स नष्ट होण्यास मदत होते . त्याचबरोबर भेंडीमधील सोल्युबल फायबरमुळे पचनक्रिया सुधारून आतडयांच्या कॅन्सरची शक्यता कमी होते . • भेंडीमधील फायबरमुळे पचन चांगले होऊन रक्तातील साखर योग्य प्रकारे शोषली जाते व साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते . भेंडीमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असल्याने ती इन्सुलिनचा स्राव वाढवते . 

भेंडी ( Lady's finger , Okra ) बाजारात गेलं की कोवळ्या कोवळ्या भेंड्यांच्या जुड्या आशाळभूतपणे आपल्याकडे बघत आहेत , असं वाटतं . ते हिरवेगार वाटे बघितले की मोह आवरत नाही आणि भेंडी आपल्या पिशवीत कशी प्रवेश करते , ते समजत नाही . इजिप्त , ब्राझील , उत्तर अमेरिका , इराक , इराण , जॉर्डन , अरब देश , भारत अशा जगातल्या बहुतेक ठिकाणी भेंडीची लागवड होते . काही भेंड्या सहाधारी असतात , तर काही अष्टधारी . भेंडीतील चिकटा जाण्यासाठी व्हिनेगर वा लिंबाच्या रसाचा उपयोग बहुतेक ठिकाणी केला जातो . भेंडीच्या पानांचा रस हा सूप्सना घट्टपणा आणण्यासाठी होतो . सिंगापूरसारख्या देशात भेंडीचा उपयोग फिश , सूप्स व नूडल्स सर्व्ह करताना होतो . काही देशांत भात , मका व मीठ शिजविताना भेंडी घालतात . जपान , ब्राझीलमध्ये भेंडी म्हणजे श्रीमंती खाणे समजले जाते . अमेरिकेत तर भेंडीची पाने सॅलडमध्ये वापरतात . भेंडीच्या बियांमध्ये तेल असते . त्याचाही वापर स्वयंपाकात केला जातो . भेंडीत कर्बोदकाचे प्रमाण जास्त असून त्यात प्रथिनेही आहेत . पाणी भरपूर असलेली भेंडी आपल्याला फायबरही देते . या भाजीत ' क ' आणि ' अ ही जीवनसत्त्वे आहेत . तसेच फोलेट , कॅल्शियम , लोह व मॅग्नेशियम देणारी ही भाजी खरंच खूप गुणकारी आहे . भेंडी खाल्ल्याने लघवीला साफ होते . भेंडीत कॅलरीज कमी असल्याने खाताना फारसा विचार करण्याची गरज नाही ( फक्त पाककृतीत तेलाचे आखडते प्रमाण असावे . ) . तरी त्या पौष्टिक आहेत , पथ्यकरही आहेत . भेंडी आंबट , उष्ण व रुचिकर आहे . 
ताकद येण्यासाठी रोज सकाळी ५, ६ भेंड्या खाव्यात . भेंडीतील बुळबुळीत गर रंगामध्ये घालायला उपयोगी पडतो .
अशी ही पथ्यकर भेंडी आपल्या जेवणात आलटून - पालटून हवीच . पण कशी ? तर ती अशी.
१ ) भेंडीची भाजी : भेंडी धुवून - पुसून चिरावी . पातेलीत फोडणी करून त्यावर बारीक चिरलेला कांदा घालावा . मीठ घालून वाफ द्यावी . आता त्यात भेंडीचे तुकडे आणि ओले खोबरे घालून झाकण ठेवून भाजी शिजवावी . अधूनमधून ढवळावी . भाजीला तार सुटू देऊ नये .
२ ) उपासाची भाजी : भेंडी चिरून घ्यावी . पातेलीत तूप - जिऱ्याची फोडणी करून मिरच्यांचे तुकडे तडतडावेत . त्यावर जिरे , कोथिंबीर व मिठाचे वाटण घालून ढवळावे . मग भेंडीच्या फोडी व दाण्याचे कूट घालून भाजी ढवळावी व झाकण ठेवून शिजवावी . अधूनमधून ढवळावी . 
३ ) दही भेंडी : भेंडी चिरून मीठ घालून शिजवावी . तूप - जिऱ्याची फोडणी करून त्यावर हिरवी मिरची व कोथिंबिरीचे वाटण परतावे . त्यावर शिजविलेली भेंडी व दाण्याचे कूट घालून चांगले ढवळत तार नाहीशी होऊ द्यावी व मग ही भेंडी दह्यात घालावी .
४ ) भेंडीची करी : तेल तापवून त्यावर भेंडीचे तुकडे परतून घ्यावेत . पातेल्यास चिकटू देऊ नयेत . गॅस बारीक करून त्यावर बारीक चिरलेला कांदा , हळद , तिखट , मीठ , मिरी पावडर व काळा मसाला घालून झाकण ठेवून कांदा शिजवावा . नंतर करी जेवढी पातळ हवी असेल त्या प्रमाणात पाणी घालून उकळी आणावी . 
५ ) खरपूस भेंडी : एका पातेलीत अंडी व हॉट सॉस फेटून घ्यावे . त्यात भेंडीचे तुकडे घालून ढवळावे . भेंडीला सर्व बाजूंनी अंड्याचे आवरण तयार होईल . दुसऱ्या पातेलीत कॉर्नफ्लोअर , मीठ , मिरी पावडर एकत्र करून त्यात वरील भेंडीचे तुकडे घोळवावेत आणि तळावेत . कागदावर निथळू द्यावेत . खरपूस भेंडी तयार ! 
६ ) टोमॅटो सॉसमधील भेंडी : पातेलीत तेल घेऊन त्यावर भेंडीचे तुकडे परतावेत . ते काढून पेपर नॅपकीनवर ठेवावेत . आता उरलेल्या तेलात मोठा चिरलेला कांदा , लसूण व टोमॅटो परतून घ्यावा . आता त्यात मीठ , मिरी पावडर , पाणी व लिंबाचा रस घालून उकळी आणावी . हा सॉस डिशमध्ये घालून त्यात भेंडी एकत्र करावी व सर्व्ह करावी . 
७ ) बेक्ड् भेंडी : भेंडीचे तुकडे बटरमध्ये परतून घ्यावेत . बेकिंग डिशमध्ये खाली उकडलेले कॉर्न , त्यावर भेंडीचे तुकडे , त्यावर व्हाईट सॉस ( कॉर्नफ्लोअर , . दूध आणि बटर यांचे मिश्रण ) , त्यावर ब्रेड क्रम्स , मिरी पावडर आणि किसलेले चीज असे थर रचून ३५० डिग्रीला ४० मिनिटे बेक करावे .
८ ) भेंडी मसाला : यासाठी भेंडी कोरडी पुसून उभी अर्धवट चिरावी . बाजूला ठेवावी . आता बारीक चिरलेला कांदा तेलावर परतावा . त्यात ओले खोबरे , मीठ , चिरलेला कढीपत्ता , कोथिंबीर , हिरव्या मिरच्या , धणे , हळद , गरम मसाला , आले - लसूण पेस्ट , भाजलेले तीळ , लिंबाचा रस हे सर्व एकत्र करावे . हे मिश्रण कापलेल्या भेंड्यांमध्ये भरावे . आता ही भेंडी कुकरमध्ये ठेवून एका शिट्टीवर शिजवावी अथवा ती तेलावर परतत शिजवावी . पोळीबरोबर वा भाकरीबरोबर खावी . 
९ ) भेंडीची भजी : या भज्यांसाठी छोट्या व कोवळ्या भेंड्या घ्याव्यात . त्या पुसून कोरड्या कराव्यात . एका पातेलीत कॉर्नफ्लोअर , मीठ , तिखट , ओवा , जिरे यांचे मिश्रण करावे व पाण्यात कालवावे . आता एकेक भेंडी पिठात घोळवून तळावी . कुरकुरीत होते . टोमॅटो सॉसबरोबर छान लागते . 
१० ) भेंडी - तिळाचे लोणचे : प्रथम भेंडीचे तुकडे , मीठ , लिंबाचा रस व हळद एकत्र घोळवून बाजूला ठेवावे . दहा मिनिटांत त्याला पाणी सुटेल . ते पूर्ण काढून टाकावे व त्यात भाजलेले तीळ व तिखट घालून चांगले ढवळावे . मोहरीची फोडणी करावी . ती गार झाल्यावर मिश्रणावर ओतून ढवळावे . लोणचे तयार ! दोन दिवस टिकते . फ्रीजमध्ये ठेवावे .
माहिती रेसीपी [जसच्या तशी]-भाज्यांविषयी सारंकाही .. अर्थात भाज्यांचे अंतरंग  लेखिका डॉ.विद्या जोशी.
टिप-
माहिती व ज्ञानलेखन संदर्भासहीत नमुद केले आहेत.
आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शनपर प्रारंभिक शास्त्रोक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा वनस्पतीचा प्रत्यक्ष वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
लेखकाने आयुर्वेद ग्रंथ व अभ्यासातील औषधे पुस्तकांचा समावेश लेखात केला आहे. काही औषधीत वाळलेले काष्ट, पंचांग उपयोगात येतात त्यामुळे औषध वनस्पती झाडांचा फोटो टाकतांना गुगल सर्च चा उपयोग केला तर वनस्पती फोटो चुकु शकतात कृपया चुक झाल्यास कळवावे.
डाॕ.लिलाधर देवराव उगले 
पन्नासवर्ष अविरत होमीओपॕथी सेवा.
डाॕ.कैलास  लिलाधर उगले
पंचवीस वर्षे आयुर्वेद हर्बल संशोधनात्मक उत्पादन व अॕक्युंपंक्चर सेवा. 
कु.कीर्ती कैलास उगले
student of B.A.M.S.

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

तुकोजी होळकर(3) यांचा आंतरजातीय विवाहप्रसंगी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकार्य

·
राजे तुकोजी होळकर (||| ) आंतरजातीय विवाह  व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सहसंबंध
------------------------------------------------
---–--------------------------------------------

महाराज तुकोजी  होळकर ( ||| ) यांनी राजपद त्यागल्या नंतर ते अमेरिकेत गेले. तेथे त्यांची मिस नैंसी मिलर या तरूणीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला.
 राजे तुकोजी यांना तेथेही तिच्याशी विवाह करता आला असता. परंतु भारतावर, भारतीय संस्कृतीवर तथा जनतेवर प्रेम व होळकर परिवारावर त्यांचे अफाट प्रेम. त्यामुळे भारतात जाऊन विवाह करण्याचा महाराजांनी प्रस्ताव ठेवला. नैंसी मिलरच्या आई - वडिलांनीही त्यासाठी होकार भरला.
        इ.स. १९२८ मध्ये महाराज मिस नैंसी मिलरला घेऊन भारतात आले. आंतर धर्मीय विवाह करण्याची घोषण केली .
     मात्र भारतातील सनातनी वैदिकांच्या पोटात पोटशूळं उठला. त्यांनी ख्रिश्‍चन धर्मिय युवतीशी विवाह करण्यास जाहीर विरोध सुरू केला. त्यांना धर्म - संस्कृतीच्या रक्षणाचे उमाळे फुटले. परदेशी तथा परधर्मीय मुलीशी विवाह केल्याने आमचा धर्म बुडेल, संस्कृती बुडेल अशा वावटळी उठवण्यास त्यांनी प्रारंभ केला. विवाह राजे तुकोजी व नैंसी मिलर यांना करायचा आहे. आयुष्याची सोबत त्यांना करायची आहे. परंतू धर्म - संस्कृती या वैदिकांची बुडते हे जागातील एक आश्चर्यच. महाराजांनी त्यांच्या कारकिर्दत केलेल्या सामाजिक सुधारणांना यांनी किती विरोध केला असावा याची कल्पना येते. म्हणूनच सनातनी वैदिकांनी त्यांच्या वृत्त पत्रात बावला खून प्रकरणाचा निर्थक बवाल केला होता. महाराजांवर आरोप करत खूनी म्हणून केलेली निर्भत्सना हा महाराजांच्या सामाजिक सुधारणांचा उगवलेला सुडच म्हणता येईल.
महाराजांच्या विवाहाच्या बाजूने सबंध देशातून उभे राहिलेत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. राजसिंहासनावर असतांना राजे तुकोजी यांनी केलेल्या बहूमोल सामाजिक कार्याची बाबासाहेबांना जाणिव होती. लगेच बाबासाहेबांनी त्यांच्या सोबत कार्य करणारे धनगर जमातीचे सहकारी हरी पिराजी धायगुडे यांना तातडीने धनगर जमातीची परिषद लावण्यास सांगितले. त्यात मिस नैंसी मिलर हिला आम्ही धनगर करून घेतले आहे असा ठराव पारित करण्यास सांगितले.
             दिनांक ७ मार्च १९२८ रोजी बारामतीस धनगर जमातीची परिषद आयोजित केल्या गेली. या परिषदेत महाराज तुकोजी होळकरांच्या विवाहाला मान्यता देऊन नेमलेल्या धनगर पंचांनी मिस नैंसी मिलर हिला धनगर करून घेतल्याचा ठराव पारित केला. नैंसी मिलरला लांभाते कुटुंबांनी दत्तक घेतले. अन् तिचे नामकरण शर्मिष्ठा लांभाते असे करण्यात आले. जर त्या परदेशी व परधर्मीय स्त्रीस महाराज तुकोजीची धनगर जमात आपुलकिने आपली म्हणून स्वीकारण्यास तयार असतांना त्यास विरोध करणारे वैदिक कोण? असा सवाल बाबासाहेबांसह धनगरांनी उपस्थित केल्याने नाचक्की झालेल्या वैदिकांना आता विरोध करण्यास जागाच उरली नव्हती. लगेच सनातनी वैदिक विवाहा निमित्त महाराजांकडून दान - दक्षिणा ऐटण्यासाठी विवाह लावण्यास पुढे सरसावलीत.
 दिनांक १३ मार्च १९२८ रोजी नाशिक येथे कुर्तकोटीचे शंकराचार्य यांनी मिस नैंसी मिलरला हिंदू धर्माची दिक्षा दिली. दिनांक १७ मार्च १९२८ रोजी वडवाई येथे विवाह संपन्न झाला. विशेष म्हणजे त्या विवाहात अनेक प्रतिष्ठित लोकाना सोबत महाराष्ट्रातील सुमारे पाचशेच्या वर धनगर सामाज घटक उपस्थित होते. या सर्वांना हरी पिराजी धायगुडे यांनी त्या विवाहासाठी स्वतः सोबत नेले होते. महाराजांनी मिस नैंसी मिलरचे नामकरण शर्मिष्ठा असे केले.
        बावला खूनाचा आरोपाच्या प्रकरणानंतर पुन्हा दुसर्‍यांदा विवाहाप्रसंगी वैदिकांनी केलेली अवहेलना व अपमान यामुळे उद्विग्न झालेले राजे तुकोजीराव होळकर ( ||| ) पुन्हा लगेच युरोपला निघून गेले ते कायमचेच युरोपात राहिले.
          २१ मे १९७८ मध्ये राजे तुकोजी यांची पॅरिस येथे प्राणज्योत मालवली. ही वार्ता इंदोर राज्यात पसरताच होळकर राज्यातील जनता शोका मग्न झाली. संपूर्ण भारत हळहळला. यातच महाराजांच्या कार्याचे गमक आहे. मृत्यूपरांत त्यांचे प्रेत शेवटी इंदोरला आणून सन्मानाने त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.
                अशा प्रकारे महाराजांच्या विवाहाप्रसंगातून तत्कालीन होळकर - आंबेडकर सहसंबंध वर्तमानात लक्षात घेणे गरजेचे आहे.
                   ही एक धनगर समाजाची एक ऐतिहासिक आंतरजातीय विवाहाची सत्यकथा.

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

डॉ बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर

*डॉ.आंबेडकरांबद्दल हे माहिती असुद्या...* 
 
१. भारत देशाची *३९५ कलम, ८ परिशिष्ट व २२ भागाची राज्यघटना* लिहून जगातील संसदिय लोकशाहीचे पुनरुज्जीवन केले.

२. राज्यघटनेने सर्वांना *मुलभूत हक्क, अधिकार दिले.* 
तसेच *कर्तव्य* सुद्धा नमूद केले. 

याबरोबरच *"डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल"* देवून सरकारच्या जबाबदाऱ्यांची तरतूद केली.

३. राज्यघटने मुळे *सामाजिक व भौगोलिकदृष्ट्या* भिन्न असलेल्या देशाला एक केले .

४. भारताच्या प्रत्येक नागरीकाला *मतदानाचा अधिकार* दिला.

५. प्रौढ *मतदानाचा (२१ वर्षांवरील)* प्रत्येक नागरिकाला अधिकार देवून *जगातील प्रथमच प्रयोग* केला.

६. भारतात प्रथम अर्थशास्त्राचा पाया रचला. *"रिजर्व बँक ऑफ इंडिया"* च्या स्थापनेचा पाया रचला.  

७. संविधान लिहून *स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार दिला.* 
स्त्रीयांना नोकरी करण्याचा अधिकार दिला. 
अन्यथा देशातील महिला आजही *"चूल आणि मुल"* सांभाळत बसल्या असत्या.

८. स्त्रीयांना *पुरुषांच्या बरोबरीने हक्क* मिळवून दिले. 
त्यांच्या हक्क व अधिकारासाठी *हिंदू कोड बिल* संसदेत मांडले. 

हिंदू कोड बिल मंजूर नाही झाले म्हणून *मंत्रिमंडळातून मंत्रीपदाचा राजीनामा* दिला.

९. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी *गर्भावस्था काळात ६ महिन्याच्या भरपगारी रजेची तरतूद* केली. 

👉🏻(*जगात अशी तरतूद करणारे *भारत हे पहिले राष्ट्र* आहे.*)

१०. स्त्रीयांना (मुलींना) वडीलांच्या *चल-अचल संपत्तीवर मुलांच्या इतकाच (पुरुषांसारखाच) समान अधिकार* मिळवून दिला.

११. पुरुषांना *एकपत्नित्व अधिकार...* 
दुसरी पत्नी असेल तर पत्नीला *पतीच्या संपत्तीमध्ये हिस्सा* मागण्याचा अधिकार मिळवून दिला.

१२. *नियोजन आयोगाची स्थापना केली.* 

१३. *पंचवार्षिक योजनांची सुरुवात केली.* 

१४. भारतात प्रथम *जलनिती तयार केली* व *"नद्या जोडणी प्रकल्प" आखला* पण राजकिय इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही 
आणि 
त्यामुळे या देशात काही भागात पूरसदृश परिस्थिती व काही भागात पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या करत आहेत.

१५. *भाकरा नांगल, दामोदर धरण, सोनाकुड, हिराकूंड धरण प्रकल्पाचे उदगाते...* 

१६. ' *कोसी नदीवर धरण बांधा त्यामुळे बिहारमध्ये कधीच पूर येणार नाही’* 
हे सुद्धा त्यांनीच सांगितले.

१७. भारतात प्रथम *परिवार नियोजनाचा* नारा दिला.

१८. भारतात *बालमजुरीवर रोख* लावली.

१९. कोलंबीया विद्यापीठात असताना 
  *३ वर्षात २९ अभ्यासक्रम (११ इतिहास,* 
 ६ समाजशास्त्र, 
५ तत्त्वज्ञान
४ मानववंशशास्त्र,
३ राजकारणाचे) 
करणारा *पहिला आणि शेवटचा व्यक्ती...* 

२०. मजुरांना *१२ तास* काम करावे लागायचे, त्यासाठी *८ तास ड्युटी* व आठवड्यातून *एक* *सुट्टी* कायदा केला.

२१.  *८* *तासापेक्षा* *जास्त* काम केल्यास, कामाचा मोबदला *(ओवरटाईम)* प्रावधान लागू केले.

२२. *‘खोत बिल’* आणून सावकारी आणि वेठबिगारीचा अंत केला.

२३. भारताला *उच्च-नीच जातीवादातून मुक्त* केले...

नाहीतर चांभाराच्या मुलांनी चांभारकी,
लोहाराने लोहारकी,
सोनाराने सोनारकी, मराठ्याने शेती, 
ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे व पुजारी बनावे...

असे करावे लागे 
पण, बाबासाहेबांच्या योगदानाने आज कोणत्याही जातितील मुले डॉक्टर, इंजीनियर, वकील, IAS, IPS, मोठमोठे अधिकारी होवू शकतात...

२४. देशातील ८०% जनतेला जिला आजपर्यंत क्षुद्र, अस्पृश्य म्हणून सर्व अधिकारांपासून हिणवण्यात आले, अत्याचार सहन करावे लागत होते,
त्यांना *समान अधिकार* मिळवून दिले 
व 
मानवमुक्तीचा आदर्श रचला...

२५. *रिजर्व बँक ऑफ* इंडियाच्या स्थापनेत *महत्त्वपूर्ण योगदान.* 

२६. *संयुक्त महाराष्ट्राच्या* लढ्यात महत्वपूर्ण योगदान...

२७. *“मुंबई हि फक्त महाराष्ट्राचीच आहे आणि ती मिळवून देण्यासाठी मी माझ्या अंतापर्यंत लढेन”* अशी घोषणा केली...

२८. *"मजुरमंत्री"* असतांना *विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती* योजना आणली.

२९. उर्जानिर्मिती व्यवस्थापनासाठी *‘सेन्ट्रल टेक्निकल पावर बोर्ड (CTPB) ची स्थापना* केली.

३०. देशात *प्रथमच पाटबंधारे आणि सिंचन आयोगाची* स्थापना केली.

३१.पाण्याच्या व्यवस्थापना साठी *नैसर्गिक संसाधन* व *कोळसा आयोगाची* स्थापना केली...

३२. शेती, उद्योग~कारखाने यांच्या विकासासाठी *RCC* *(रिकन्स्ट्रक्शन कमिटी कौन्सिलची स्थापना केली)* 

३३. बिहार, मध्यप्रदेशाचे विकास व्हावे यासाठी *विभाजन* करावे अशी सूचना मांडली.

आज ४५ वर्षांनंतर छत्तीसगढ आणि झारखंड राज्य निर्माण झाले...  

३४. शिक्षक भारताच्या मणक्याचा कणा आहे त्याला योग्य वेतन द्यावे यासाठी योगदान..

३५. *स्त्रीभ्रूण हत्त्या* *विरोध* , व *गर्भपात* करू नये यासाठी जनजागृती...

३६. देशाला *उपराजधानी* ची गरज आहे हे सांगणारे *प्रथम व्यक्ती...* 

३७. देशात कोळसा ऊर्जेपेक्षा सौर *ऊर्जेपासून चालणारे* *जल* *विद्युत प्रकल्प उभे करावेत* हे सांगणारे *प्रथम व्यक्ती* जे अजूनही झालेले नाही...

३८. ‘मी *कायदेमंत्री बनण्यापेक्षा* मी *कृषिमंत्री* होउन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन व देशात शेतीचा विकास करून शेतकऱ्यांचे राज्य प्रस्थापित करेन’ असे विधान करणारे सुद्धा *बाबासाहेबच* ...

३९. बाळ गंगाधर टिळक यांच्या मुलाने आत्महत्या केली, 
त्या वेळेस भविष्यात कोणी आत्महत्या करू नये म्हणून भावपूर्ण लेख लिहून त्याला आदरांजली दिली व कायदा मजबूत केला.

४०. तीन *लष्कर* *प्रमुख* कधीच एकत्र येवून देशविरोधी कृत्य करून नये हे सांगून तशी मांडणी केली.

४१. *एकमात्र भारतीय* ज्यांना ब्रीटीशांकडून *गोलमेज परिषदेला* येण्याचे *विशेष निमंत्रण* दिले जायचे.

४२. *एकमात्र असे व पहिले भारतीय नेता ज्यांनी स्त्रिया, ओबीसी व एसटी प्रवर्गासाठी असलेले बिल पास न झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला...*

४३. बाबासाहेब *देशातील पहिले उच्चशिक्षित अर्थशास्त्री* आहेत.

४४. ते एक चांगले वायोलिन वादक, शिल्पकार व *चित्रकार* सुद्धा होते...

४५. त्यांचे एकूण *९ भाषांवर प्रभुत्व* होते. *इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, पारसी, संस्कृत, जर्मन, फ्रेंच, व पाली.* 

४६. त्यांनी *पाली* भाषेवर इतके प्रभुत्व मिळविले कि *पाली व्याकरण व शब्दकोशाची* सुद्धा *निर्मिती* केली...

४७. *त्यांनी संसदेत मांडलेली महत्वाची विधेयके* : ~

 👉🏻 *माहार वतन बिल,* 

👉🏻 *हिंदु कोड बिल,* 
 *खोत बिल,* 

👉🏻 *मंत्र्यांचे वेतन बिल,* 

👉🏻 *रोजगार विनिमय सेवा,* 

👉🏻 *पेंशन बिल,* 

👉🏻 *भविष्य निर्वाह निधी (पी एफ) बिल* इ.

४८. *मराठी* हि *राजभाषा* व्हावी यासाठी *संसदेत मत* मांडले...

४९. *पाण्यासाठी आंदोलन करणारे (* *महाड सत्याग्रह) जगात पहिले व्यक्ती...* 

५०. *लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स* मध्ये सर्वात जास्त *पुस्तके वाचणारे पहिले व शेवटचे व्यक्ती.* ...

५१. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून *डी. एस. सी.* पदवी मिळवणारे प्रथम व शेवटचे भारतीय...

५२. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये *आठ वर्षांचा अभ्यासक्रम ३ वर्षात करणारे जगातीन प्रथम व शेवटचे व्यक्ती,* ते सुद्धा भारतीय...

५३. देशात *भविष्य निर्वाह निधी (पी. एफ.) कायदा* आणून कामगारांच्या हक्काचे संरक्षण केले.

५४. देशातील जनतेला *वैयक्तिक आयुर्विमा* घेण्यासाठी *आयुर्विमा* महामंडळाची स्थापना करण्यासाठी कार्य केले..

५५. देशात *इम्प्लॉयमेंट एक्स्चेंजची निर्मिती* केली व सर्व समाजातील बेरोजगारांना नोकरीचे दरवाजे खुले केले...

५६. अन्याय, अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी एक कुशल *पत्रकार* म्हणून 
 *मूकनायक* , 
 * *बहिष्कृत भारत,* 
 *प्रबुद्ध भारत* * 
व 
 *जनता* 
पाक्षिक-साप्ताहिक सुरु केले...

५७. ' *बहिष्कृत हितकारणी सभे'ची स्थापना* करून जातींअंताची चळवळ सुरु केली.

५८. *दुसऱ्या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांचे प्रतिनिधी* म्हणून उपस्थित राहिले...

५९. अल्पसंख्यांका विरोधात *कॉंग्रेस च्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध.* ..

६०. *बहुजनांसाठी* मो.क. गांधी यांच्याशी वैचारिक संघर्ष करून *पुणे* *करार* केला...

६१. बहुजनांच्या राजकीय, सामाजिक हक्कांसाठी *कॉंग्रेस पक्षाशी संघर्ष* केला...

६२. राज्यघटना बनविण्यापूर्वी, 
 *१९३४ साली घटनात्मक दुरुस्ती* करता निर्माण करण्यात आलेल्या *पार्लमेंटरी कमिटीचे सन्माननीय सदस्य* ...

६३. हिंदू धर्मातील *चातुर्वर्ण्य* पद्धती, विषमता व अन्याय-अत्याचाराला कंटाळून *१९३५* साली येवला येथे भरलेल्या परिषदेमध्ये 
‘ *मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’* अशी घोषणा केली...

६४. हिंदूंसाठी *काळाराम मंदिर* प्रवेशाचा *सत्याग्रह* केला...

६५. *“UNTOUCHABILIT”*  हा शब्द बाबासाहेबांच्या लिखाणातून *इंग्रजी भाषेत* घेण्यात आला....

६६. भारताचे पहिले *कायदेमंत्री* होण्याचा बहुमान...

६७. *त्यांनी स्थापन केलेल्या संघटना* :

👉🏻 *बहिस्कृत हितकारणी सभा,* 

👉🏻 *ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन,* 

👉🏻 *दि बॉम्बे म्यूनिसिपल लेबर युनियन* इ.

६८.👉🏻 *पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना* ...

६९. 👉🏻 *सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकोनॉमिक्स ची स्थापना.* 

७०. *सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ* ची स्थापना...

७१. बुद्ध धम्माच्या प्रचार- प्रसारासाठी *बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया* ची स्थापना केली....

७२. औरंगाबाद येथे *मिलिंद* महाविद्यालयाची स्थापना...

७३. भारताच्या *राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी ‘अशोक चक्र’ असण्याला संसदेत मान्यता* मिळवून दिली...

७४. भारताला *राष्ट्रीय चिन्ह “अशोक चिन्ह”* मिळवून दिले जे *बुद्ध धम्मचक्र* आहे....

७५. बुद्ध धम्माचे प्रतिक *निळ्या* रंगाला *राष्ट्रीय रंग,* धम्माचे प्रतिक कमळ फुलाला राष्ट्रीय फुल, बोधिवृक्ष (पिंपळ) 
राष्ट्रीयवृक्ष राष्ट्रीय प्रतीके मिळवून दिली....

७६. *‘सत्यमेव जयते’* सम्राट अशोक कालीन ब्रीदवाक्य भारताचे ब्रीदवाक्य म्हणून पुनरुज्जीवित केले...

७७. राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष म्हणून त्याच्या सन्मानाच्या निरन्तरतेसाठी कायदा बनविला...

७८. भारत देशाला🇮🇳 *तिरंगा* व त्याच्या *मधोमध अशोकचक्र*☸ अशी अनोखी भेट दिली...

७९. त्यांना मिळालेल्या उपाध्या (सन्मान) : ~

⚜ *भारतरत्न* (भारत सरकार), 

⚜ *द ग्रेटेस्ट मँन इन द वर्ल्ड* (कोलंबिया विद्यापीठ), 

⚜ *द युनिवर्स मेकर* (ऑक्सफर्ड विद्यापीठ), 

⚜ *द ग्रेटेस्ट इंडियन* (CNN IBN व History वृत्त   वाहिनी) इ. 
असे बरेच सन्मान मिळाले...

८०. एकमात्र भारतीय ज्यांनी *पुस्तकांसाठी एक घर* बनवले....राजगृह
८१. विश्वातील एकमात्र व्यक्ती ज्यांच्याकडे *५०,००० पेक्षा जास्त पुस्तके/ ग्रंथ संच* आहेत...

८२. महापुरुष इतिहास घडवतात पण हे असे आहेत कि ज्यांनी ५००० वर्षांचा विषमतावादी, रूढी परम्परांनी वेढलेला इतिहास बदलला...

८३. *पाकिस्तान* मध्ये *एका भारतीयाची जयंती साजरी* होते ती व्यक्ती म्हणजे 
👉🏻* *बाबासाहेब* *  ....

८४. बाबासाहेब एक महान *अर्थशास्त्री* ,
 *समाजशास्त्री* , 
 *विधिज्ञ* , 
 *राज्यघटनाकार* , 
 *आधुनिक* *भारताचे जनक* 
इतिहासाचे गाढे अभ्यासक व स्वतः घडविणारे सुद्धा,
 *मानववंशशास्त्र* अभ्यासक, 
 *पाली* साहित्याचे महान अभ्यासक, 
बौद्ध साहित्याचे महान अभ्यासक “ *बोधिसत्व* ”, 
महान तत्त्ववेत्ते, 
निष्णात राजकारणी, *दीन-दलित-महिला-मजूर यांचे उद्धारक* , 
विज्ञानवादी शोधाचे समर्थक, 
संस्कृत व हिंदू तसेच इतर सर्व *प्रचलित धर्मांचे गाढे अभ्यासक* 
होते..

 *“आधुनिक भारत देशाचा निर्माता”* (NATION BUILDER) हे एकच... 
ते म्हणजे 
👉🏻  *बोधिसत्व* *प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर...*
                              --

रविवार, १९ जानेवारी, २०२०

छत्रपती शिवाजी गौरव

*संपूर्ण जग त्यांच्या कार्याला मुजरा करते*..
 "जर  शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते !"
           -- लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड.

"भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेन तर एकच पर्याय आहे,  शिवाजी महाराजा न प्रमाणे लढा !
                -- नेताजी सुभाषचंद्र बोस.

"नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या  शिवाजी महाराजा च्या इतिहासाची गरज आहे !"
                   -- अॅडॉल्फ हिटलर.

"शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर  शिवाजीमहाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !"
                 -- स्वामी विवेकानंद.

"जर  शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास ‘सुर्य‘ संबोधले असते !"
              -- बराक ओबामा, अमेरिका.

"जर  शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !"
                  -- इंग्रज गव्हर्नर.

"काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला  शिवाजी महाराजांनी रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजी महाराजांना पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काही माझ्या हाती नाही आले ! या अल्लाह ! दुश्मन दिया भी तो कौण दिया? * सिवा_भोसला* जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है !"
              -- औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर)

"उस दिन *सिवा भोसला*ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी *सिवा भोसला* से मिलना नही चाहता !"
               -- शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर.

"क्या उस गद्दारे दख्खन से *सिवा* नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !"
               -- बडी बेगम अलि आदिलशाह.

१७ व्या शतकात युरोप खंडात "लंडन गॅझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला !

वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो, जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच ! महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय, बाकी सर्वजण हे परकिय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते !

ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणि त्याच्या मनात शिवाजी महाराज या नावाचा खौफ निर्माण केला, तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता. तर तो अबू तालिबानचा नवाब होता, तुर्कस्तानचा नवाब होता ! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता. त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता. पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणि काही कळायच्या आत पसार झाले ! परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी महाराज या नावाची इतकी भिती घेतली की शिवाजी महाराजांना आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही. असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता !

बेहलोलखान पठाण, सिकंदर पठाण, चिडरखाण पठाण इ. ज्यांना महाराजांनी रणांगणावर धुधु धुतलं, हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते !

दिलेरखान पठाण, मंगोलियन सरदार, मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा ! महाराजांनी याचा पराभव केला !

सिध्दी जौहर, सिध्दी सलाबत खान हे इराणी होते, इराणचे शुर सरदार होते ! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं !

उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला, तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता, म्हणजे आत्ताच्या रशियाचा ! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली. कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव ! (१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणि या ३०,००० पैकी एकही जिवंत राहीला नाही. आणि १००० पैकि एक ही मावळा गमावला नाही. ⛳🙏🏻
#ChhatrapatiShivajiMaharaj 

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच गोष्टी सांगितल्या जातात....!
1.अफजलखानाचा कोथळा 
2.शाईस्तेखानाची बोटे 
3.आग्राहून सुटका
पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात....!
1.आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती" करणारे होते...!
2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे होते...!
3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते...!
4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक" होते...!
5.समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक" होते ...!
6. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून  "अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे  चिकीत्सक राजे"
7. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे ! "जलतज्ञ" राजे छत्रपती शिवराय!!
8. ३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे  १०० राहून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते, "उत्तम अभियंते राजे"
9. सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे!!
10. परस्त्री मातेसमान मानत महिलांना  सन्मानाने वागवाणारे "मातृभक्त, नारीरक्षक" छत्रपती शिवराय

खऱ्या अर्थाने ते "लोकराजे" होते कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते हीच खरी शिवशाही होती.....!
*शिवाजी महाराज दोन आहेत*

आपल्या इतिहासात दोन छत्रपती शिवाजी महाराज आहेत.
एक राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचे शिवाजी महाराज आणि दुसरे 
एक टिळक, पुरंदरे यांचे शिवाजी महाराज.

 आता पर्यंत आपण शाळा, कॉलेज मधून टिळक, पुरंदरचे शिवाजी शिकलो पण राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचे शिवाजी महाराज आम्हाला शिकायला मिळालेच नाहीत.

आणि मला वाटतं ते शिवाजी महाराज जे टिळक पुरंदरे सांगितले ते सांगत बसण्यात, वेळ घालवण्यात काही अर्थ नाही, परंतु जे शिवाजी महाराज जाणीवपूर्वक लपवून ठेवलेत, दडवून ठेवलेत, Hide केलेत. हे शिवाजी महाराज आपणा पर्यंत पोहोचणे आवश्यक वाटते ते सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

*राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचे शिवाजी महाराज कसे आहेत :*

ते कुळवाडीभूषण आहेत. कुळवाडी ह्याच्या अर्थ शेती करणाऱ्या व शेतीवर अवलंबून असणाऱ्या सर्व जाती. याचाच अर्थ शेतीत काम करणाऱ्या सर्वांच भूषण तेच कुळवाडीभूषण. हि कुळवाडी उपाधी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी १८६९ ला शिवाजी महाराजांना दिली,

 याउलट टिळक, पुरंदरचे यांना  शिवाजी महाराज हा "गोब्राह्मण प्रतिपालक" आहे. अशी दोनच कामे त्यांना दिली. म्हणजे त्यांना गायीचे आणि ब्राह्मणांचे रक्षण. *बाकी तिसरं कामच नाही*. 

*राष्ट्रपिता फुलेंचे शिवाजी महाराज होते ते "रयतेचे राज्य" निर्माण करणारे होते,*

 टिळक, पुरंदरचे जे शिवाजी महाराज होते ते "हिंदवी स्वराज्य" निर्माण करणारे होते, 

एक रयतेचे राज्य आणि एक हिंदवी स्वराज्य आहे.

आम्हाला एक लक्षात आले पाहिजे शिवाजी महाराजांबद्दल. 
राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारीला झाला, तारखेनुसार झाला. टिळक, पुरंदरेंच्या शिवाजी महाराजांचा जन्म तिथीला झाला. आणि आताच मराठा मोर्चा मध्ये शिवजयंती १९ फेब्रुवारी लाच होनार यावर सर्वांचे एक मत झाले.

 राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचे शिवाजी महाराज होते त्यांना "विष देऊन" मारण्यात आले.
 टिळक, पुरंदरें चे शिवाजी महाराज होते ते "गुडघे रोगाने" मेले. म्हणजे इथे ब्राम्हणांनी महाराजांना कट करून मारला हे जाणीवपूर्वक लपवण्याचा हा प्रयत्न आहे.

राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या शिवाजी महाराजांचे गुरू *"माँ साहेब जिजाऊ, शहाजी राजे, संत तुकाराम महाराज, बाबा याकुब"* होते. 

टिळक, पुरंदरेंच्या शिवाजी महाराजांचे गुरू "रामदास स्वामी आणि दादा कोंडदेव" . 

*एक शिवाजी महाराज सांगितले आणि एक सांगितलेच नाही हि आपली अडचण आजची.*

 म्हणून शिवाजी महाराजांची दुसरी बाजू लोकांसमोर आली पाहिजे. इतिहासाचा हा तगादा असती कि दोन बाजू असल्या पाहिजे. मग लोकं निर्णय घेतील खोटं काय आणि खर काय ते...

*चिकित्सक व्हा*.
*निर्भिड रहा.*
🚩 जय जिजाऊ 🚩

बुधवार, १ जानेवारी, २०२०

नवीन वर्षाचा संकल्प

                  2020 या ग्रेगरियन वर्षाची सुरवात झाली आहे.शाळाकरी मुले नवीन वर्षाचा संकल्प करीत असतात .कोणी पाढे पाठांतर ,तर कोणी नियमित शाळेत उपस्थित राहण्याचा ,नियमित आभास करण्याचा, तर कोणी श्लोक ,इंग्लिश शब्द पाठांतर ,तर कोणी सर्वामध्ये मिळून मिसळून चांगले रहाण्याचे  किंवा दैनंदिनी लिहीण्याचाअसे विविध संकल्प केले जातात.बऱ्याचवेळा वर्ष पूर्ण होण्यापूर्वी ह्या वर्षाचा संकल्प विसरून ही  जातो त्या साठी तो लिहून ठेवावा  किंवा घरात दर्शनी जागी  लिहून ठेवला म्हणजे आपल्याला संकल्पनांची आठवण राहील. त्यामुळे संकल्प पूर्ण करण्यास प्रेरणा मिळेल .
                   मनुष्याला काही वर्षांचं जीवन मिळाले आहे . ते सार्थकी होण्यासाठी संकल्प करायला हवेत . छत्रपती शिवराय , संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम ,स्वामी विवेकानंद , मा. गांधी ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,व इतर महान विभूतींना अल्प आयुष्य जगून ही अजरामर झाल्या . छत्रपती शिवरायांनी वयाच्या चौदाव्या वर्षी रयतेचे स्वराज्य  स्थापनेची प्रतिज्ञा केली ती पूर्ण ही केली .वय चौदा म्हणजे आठवी -नवीवच्या मुलाप्रमाणेचे आहे .संकल्प मोठा असावा राजाच्या उदाहरणावरून लक्षात येते . ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहला . मा. गांधी यांनी शाळकरी वयात रोज एक श्लोक या प्रमाणे चार हजार श्लोक पाठ केले.महान विभूतींना व आपल्याला उपलब्ध कालावधी  समानच आहे. या कालावधी साठीचे संकल्प व संकल्प पूर्ण करणेची जिद्द या मध्ये फरक झाल्याने आपल्याला प्रतित यश मिळत नाही .
            व्यक्तिमत्व विकासात संकल्पन्ना  फार महत्व आहे . आपल्या समोर रॉलमॉडेल व्यक्तिमत्व असणे आवश्यक आहे .त्यासाठी थोर व्यक्तिमत्वांची चरित्र वाचनाचा छंद उपयोगी पडतो .त्याप्रमाणे आपले संकल्प करून ते पूर्ण करता येतात. मूर्तीर्कार ज्याप्रमाणे दगडातील नको तो भाग काढून टाकतो आणि सुंदर मूर्ती तयार करतो त्याप्रमाणे आपल्यातील दुर्गुण काढून टाकण्याचा प्रयत्न  वा संकल्प केल्यास आपण ही सगुण चैतन्याचा पुतळा होऊन जाऊ. 
                 संकल्प करीत असताना दीर्घकालीन मोठा संकल्प महत्वकांक्षा  नजरेत ठेवून अल्पकालीन संकल्प करावेत . अल्पकालीन संकल्प हे दीर्घकालीन महत्वकांक्षेचे छोटे भाग असावेत म्हणजे  आपली महत्वकांक्षा पूर्ण होईल.
             थोडक्यात जे - जे मला करायचे  आहे ते- ते , त्या - त्या वेळी उत्तमोत्तम करेन असा संकल्प केल्यास व तो पूर्ण करत राहिलो तर  आपले सर्व आयुष्य सार्थकी झाल्याचा आनंद होईल.