गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

तुकोजी होळकर(3) यांचा आंतरजातीय विवाहप्रसंगी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकार्य

·
राजे तुकोजी होळकर (||| ) आंतरजातीय विवाह  व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सहसंबंध
------------------------------------------------
---–--------------------------------------------

महाराज तुकोजी  होळकर ( ||| ) यांनी राजपद त्यागल्या नंतर ते अमेरिकेत गेले. तेथे त्यांची मिस नैंसी मिलर या तरूणीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला.
 राजे तुकोजी यांना तेथेही तिच्याशी विवाह करता आला असता. परंतु भारतावर, भारतीय संस्कृतीवर तथा जनतेवर प्रेम व होळकर परिवारावर त्यांचे अफाट प्रेम. त्यामुळे भारतात जाऊन विवाह करण्याचा महाराजांनी प्रस्ताव ठेवला. नैंसी मिलरच्या आई - वडिलांनीही त्यासाठी होकार भरला.
        इ.स. १९२८ मध्ये महाराज मिस नैंसी मिलरला घेऊन भारतात आले. आंतर धर्मीय विवाह करण्याची घोषण केली .
     मात्र भारतातील सनातनी वैदिकांच्या पोटात पोटशूळं उठला. त्यांनी ख्रिश्‍चन धर्मिय युवतीशी विवाह करण्यास जाहीर विरोध सुरू केला. त्यांना धर्म - संस्कृतीच्या रक्षणाचे उमाळे फुटले. परदेशी तथा परधर्मीय मुलीशी विवाह केल्याने आमचा धर्म बुडेल, संस्कृती बुडेल अशा वावटळी उठवण्यास त्यांनी प्रारंभ केला. विवाह राजे तुकोजी व नैंसी मिलर यांना करायचा आहे. आयुष्याची सोबत त्यांना करायची आहे. परंतू धर्म - संस्कृती या वैदिकांची बुडते हे जागातील एक आश्चर्यच. महाराजांनी त्यांच्या कारकिर्दत केलेल्या सामाजिक सुधारणांना यांनी किती विरोध केला असावा याची कल्पना येते. म्हणूनच सनातनी वैदिकांनी त्यांच्या वृत्त पत्रात बावला खून प्रकरणाचा निर्थक बवाल केला होता. महाराजांवर आरोप करत खूनी म्हणून केलेली निर्भत्सना हा महाराजांच्या सामाजिक सुधारणांचा उगवलेला सुडच म्हणता येईल.
महाराजांच्या विवाहाच्या बाजूने सबंध देशातून उभे राहिलेत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. राजसिंहासनावर असतांना राजे तुकोजी यांनी केलेल्या बहूमोल सामाजिक कार्याची बाबासाहेबांना जाणिव होती. लगेच बाबासाहेबांनी त्यांच्या सोबत कार्य करणारे धनगर जमातीचे सहकारी हरी पिराजी धायगुडे यांना तातडीने धनगर जमातीची परिषद लावण्यास सांगितले. त्यात मिस नैंसी मिलर हिला आम्ही धनगर करून घेतले आहे असा ठराव पारित करण्यास सांगितले.
             दिनांक ७ मार्च १९२८ रोजी बारामतीस धनगर जमातीची परिषद आयोजित केल्या गेली. या परिषदेत महाराज तुकोजी होळकरांच्या विवाहाला मान्यता देऊन नेमलेल्या धनगर पंचांनी मिस नैंसी मिलर हिला धनगर करून घेतल्याचा ठराव पारित केला. नैंसी मिलरला लांभाते कुटुंबांनी दत्तक घेतले. अन् तिचे नामकरण शर्मिष्ठा लांभाते असे करण्यात आले. जर त्या परदेशी व परधर्मीय स्त्रीस महाराज तुकोजीची धनगर जमात आपुलकिने आपली म्हणून स्वीकारण्यास तयार असतांना त्यास विरोध करणारे वैदिक कोण? असा सवाल बाबासाहेबांसह धनगरांनी उपस्थित केल्याने नाचक्की झालेल्या वैदिकांना आता विरोध करण्यास जागाच उरली नव्हती. लगेच सनातनी वैदिक विवाहा निमित्त महाराजांकडून दान - दक्षिणा ऐटण्यासाठी विवाह लावण्यास पुढे सरसावलीत.
 दिनांक १३ मार्च १९२८ रोजी नाशिक येथे कुर्तकोटीचे शंकराचार्य यांनी मिस नैंसी मिलरला हिंदू धर्माची दिक्षा दिली. दिनांक १७ मार्च १९२८ रोजी वडवाई येथे विवाह संपन्न झाला. विशेष म्हणजे त्या विवाहात अनेक प्रतिष्ठित लोकाना सोबत महाराष्ट्रातील सुमारे पाचशेच्या वर धनगर सामाज घटक उपस्थित होते. या सर्वांना हरी पिराजी धायगुडे यांनी त्या विवाहासाठी स्वतः सोबत नेले होते. महाराजांनी मिस नैंसी मिलरचे नामकरण शर्मिष्ठा असे केले.
        बावला खूनाचा आरोपाच्या प्रकरणानंतर पुन्हा दुसर्‍यांदा विवाहाप्रसंगी वैदिकांनी केलेली अवहेलना व अपमान यामुळे उद्विग्न झालेले राजे तुकोजीराव होळकर ( ||| ) पुन्हा लगेच युरोपला निघून गेले ते कायमचेच युरोपात राहिले.
          २१ मे १९७८ मध्ये राजे तुकोजी यांची पॅरिस येथे प्राणज्योत मालवली. ही वार्ता इंदोर राज्यात पसरताच होळकर राज्यातील जनता शोका मग्न झाली. संपूर्ण भारत हळहळला. यातच महाराजांच्या कार्याचे गमक आहे. मृत्यूपरांत त्यांचे प्रेत शेवटी इंदोरला आणून सन्मानाने त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.
                अशा प्रकारे महाराजांच्या विवाहाप्रसंगातून तत्कालीन होळकर - आंबेडकर सहसंबंध वर्तमानात लक्षात घेणे गरजेचे आहे.
                   ही एक धनगर समाजाची एक ऐतिहासिक आंतरजातीय विवाहाची सत्यकथा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा