मनुष्याला काही वर्षांचं जीवन मिळाले आहे . ते सार्थकी होण्यासाठी संकल्प करायला हवेत . छत्रपती शिवराय , संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम ,स्वामी विवेकानंद , मा. गांधी ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,व इतर महान विभूतींना अल्प आयुष्य जगून ही अजरामर झाल्या . छत्रपती शिवरायांनी वयाच्या चौदाव्या वर्षी रयतेचे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली ती पूर्ण ही केली .वय चौदा म्हणजे आठवी -नवीवच्या मुलाप्रमाणेचे आहे .संकल्प मोठा असावा राजाच्या उदाहरणावरून लक्षात येते . ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहला . मा. गांधी यांनी शाळकरी वयात रोज एक श्लोक या प्रमाणे चार हजार श्लोक पाठ केले.महान विभूतींना व आपल्याला उपलब्ध कालावधी समानच आहे. या कालावधी साठीचे संकल्प व संकल्प पूर्ण करणेची जिद्द या मध्ये फरक झाल्याने आपल्याला प्रतित यश मिळत नाही .
व्यक्तिमत्व विकासात संकल्पन्ना फार महत्व आहे . आपल्या समोर रॉलमॉडेल व्यक्तिमत्व असणे आवश्यक आहे .त्यासाठी थोर व्यक्तिमत्वांची चरित्र वाचनाचा छंद उपयोगी पडतो .त्याप्रमाणे आपले संकल्प करून ते पूर्ण करता येतात. मूर्तीर्कार ज्याप्रमाणे दगडातील नको तो भाग काढून टाकतो आणि सुंदर मूर्ती तयार करतो त्याप्रमाणे आपल्यातील दुर्गुण काढून टाकण्याचा प्रयत्न वा संकल्प केल्यास आपण ही सगुण चैतन्याचा पुतळा होऊन जाऊ.
संकल्प करीत असताना दीर्घकालीन मोठा संकल्प महत्वकांक्षा नजरेत ठेवून अल्पकालीन संकल्प करावेत . अल्पकालीन संकल्प हे दीर्घकालीन महत्वकांक्षेचे छोटे भाग असावेत म्हणजे आपली महत्वकांक्षा पूर्ण होईल.
थोडक्यात जे - जे मला करायचे आहे ते- ते , त्या - त्या वेळी उत्तमोत्तम करेन असा संकल्प केल्यास व तो पूर्ण करत राहिलो तर आपले सर्व आयुष्य सार्थकी झाल्याचा आनंद होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा