*संपूर्ण जग त्यांच्या कार्याला मुजरा करते*..
"जर शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते !"
-- लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड.
"भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेन तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजा न प्रमाणे लढा !
-- नेताजी सुभाषचंद्र बोस.
"नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजा च्या इतिहासाची गरज आहे !"
-- अॅडॉल्फ हिटलर.
"शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर शिवाजीमहाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !"
-- स्वामी विवेकानंद.
"जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास ‘सुर्य‘ संबोधले असते !"
-- बराक ओबामा, अमेरिका.
"जर शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !"
-- इंग्रज गव्हर्नर.
"काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजी महाराजांना पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काही माझ्या हाती नाही आले ! या अल्लाह ! दुश्मन दिया भी तो कौण दिया? * सिवा_भोसला* जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है !"
-- औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर)
"उस दिन *सिवा भोसला*ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी *सिवा भोसला* से मिलना नही चाहता !"
-- शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर.
"क्या उस गद्दारे दख्खन से *सिवा* नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !"
-- बडी बेगम अलि आदिलशाह.
१७ व्या शतकात युरोप खंडात "लंडन गॅझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला !
वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो, जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच ! महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय, बाकी सर्वजण हे परकिय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते !
ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणि त्याच्या मनात शिवाजी महाराज या नावाचा खौफ निर्माण केला, तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता. तर तो अबू तालिबानचा नवाब होता, तुर्कस्तानचा नवाब होता ! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता. त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता. पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणि काही कळायच्या आत पसार झाले ! परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी महाराज या नावाची इतकी भिती घेतली की शिवाजी महाराजांना आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही. असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता !
बेहलोलखान पठाण, सिकंदर पठाण, चिडरखाण पठाण इ. ज्यांना महाराजांनी रणांगणावर धुधु धुतलं, हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते !
दिलेरखान पठाण, मंगोलियन सरदार, मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा ! महाराजांनी याचा पराभव केला !
सिध्दी जौहर, सिध्दी सलाबत खान हे इराणी होते, इराणचे शुर सरदार होते ! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं !
उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला, तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता, म्हणजे आत्ताच्या रशियाचा ! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली. कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव ! (१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणि या ३०,००० पैकी एकही जिवंत राहीला नाही. आणि १००० पैकि एक ही मावळा गमावला नाही. ⛳🙏🏻
#ChhatrapatiShivajiMaharaj
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच गोष्टी सांगितल्या जातात....!
1.अफजलखानाचा कोथळा
2.शाईस्तेखानाची बोटे
3.आग्राहून सुटका
पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात....!
1.आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती" करणारे होते...!
2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे होते...!
3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते...!
4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक" होते...!
5.समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक" होते ...!
6. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून "अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे चिकीत्सक राजे"
7. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे ! "जलतज्ञ" राजे छत्रपती शिवराय!!
8. ३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे १०० राहून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते, "उत्तम अभियंते राजे"
9. सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे!!
10. परस्त्री मातेसमान मानत महिलांना सन्मानाने वागवाणारे "मातृभक्त, नारीरक्षक" छत्रपती शिवराय
खऱ्या अर्थाने ते "लोकराजे" होते कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते हीच खरी शिवशाही होती.....!
*शिवाजी महाराज दोन आहेत*
आपल्या इतिहासात दोन छत्रपती शिवाजी महाराज आहेत.
एक राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचे शिवाजी महाराज आणि दुसरे
एक टिळक, पुरंदरे यांचे शिवाजी महाराज.
आता पर्यंत आपण शाळा, कॉलेज मधून टिळक, पुरंदरचे शिवाजी शिकलो पण राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचे शिवाजी महाराज आम्हाला शिकायला मिळालेच नाहीत.
आणि मला वाटतं ते शिवाजी महाराज जे टिळक पुरंदरे सांगितले ते सांगत बसण्यात, वेळ घालवण्यात काही अर्थ नाही, परंतु जे शिवाजी महाराज जाणीवपूर्वक लपवून ठेवलेत, दडवून ठेवलेत, Hide केलेत. हे शिवाजी महाराज आपणा पर्यंत पोहोचणे आवश्यक वाटते ते सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
*राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचे शिवाजी महाराज कसे आहेत :*
ते कुळवाडीभूषण आहेत. कुळवाडी ह्याच्या अर्थ शेती करणाऱ्या व शेतीवर अवलंबून असणाऱ्या सर्व जाती. याचाच अर्थ शेतीत काम करणाऱ्या सर्वांच भूषण तेच कुळवाडीभूषण. हि कुळवाडी उपाधी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी १८६९ ला शिवाजी महाराजांना दिली,
याउलट टिळक, पुरंदरचे यांना शिवाजी महाराज हा "गोब्राह्मण प्रतिपालक" आहे. अशी दोनच कामे त्यांना दिली. म्हणजे त्यांना गायीचे आणि ब्राह्मणांचे रक्षण. *बाकी तिसरं कामच नाही*.
*राष्ट्रपिता फुलेंचे शिवाजी महाराज होते ते "रयतेचे राज्य" निर्माण करणारे होते,*
टिळक, पुरंदरचे जे शिवाजी महाराज होते ते "हिंदवी स्वराज्य" निर्माण करणारे होते,
एक रयतेचे राज्य आणि एक हिंदवी स्वराज्य आहे.
आम्हाला एक लक्षात आले पाहिजे शिवाजी महाराजांबद्दल.
राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारीला झाला, तारखेनुसार झाला. टिळक, पुरंदरेंच्या शिवाजी महाराजांचा जन्म तिथीला झाला. आणि आताच मराठा मोर्चा मध्ये शिवजयंती १९ फेब्रुवारी लाच होनार यावर सर्वांचे एक मत झाले.
राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचे शिवाजी महाराज होते त्यांना "विष देऊन" मारण्यात आले.
टिळक, पुरंदरें चे शिवाजी महाराज होते ते "गुडघे रोगाने" मेले. म्हणजे इथे ब्राम्हणांनी महाराजांना कट करून मारला हे जाणीवपूर्वक लपवण्याचा हा प्रयत्न आहे.
राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या शिवाजी महाराजांचे गुरू *"माँ साहेब जिजाऊ, शहाजी राजे, संत तुकाराम महाराज, बाबा याकुब"* होते.
टिळक, पुरंदरेंच्या शिवाजी महाराजांचे गुरू "रामदास स्वामी आणि दादा कोंडदेव" .
*एक शिवाजी महाराज सांगितले आणि एक सांगितलेच नाही हि आपली अडचण आजची.*
म्हणून शिवाजी महाराजांची दुसरी बाजू लोकांसमोर आली पाहिजे. इतिहासाचा हा तगादा असती कि दोन बाजू असल्या पाहिजे. मग लोकं निर्णय घेतील खोटं काय आणि खर काय ते...
*चिकित्सक व्हा*.
*निर्भिड रहा.*
🚩 जय जिजाऊ 🚩
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा