सोमवार, ७ जून, २०२१

काही आठवणी बाबासाहेबांच्या*

*काही आठवणी बाबासाहेबांच्या*         *वाचल्या सिवाय डीलिट करु नका*

मघाशी बाबासाहेबांची आठवण म्हणून मी एक पोस्ट केली होती,बाबासाहेबानी राष्ट्रपतीपदाचा अर्ज नाकारला, बऱ्याच जणांनी बाबासाहेबांचे असे माहीत नसलेले पैलू वाचायला आवडतील असे मत व्यक्त केले, म्हणून लागलीच हे लिहायला घेतलं, 

*राष्ट्रपती पद नाकारणारे बाबासाहेब*

"डॉ.बाबासाहेब आंबेडकर  आणि विनोद",या पुस्तकाचे लेखक,प्राध्यापक,दामोदर मोरे,आणि पुणे विद्यापीठ कुलगुरू डॉ.नरेंद्र जाधव यांचे"डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वसमावेशक सामाजिक धोरण" या विषयावर सह्याद्री चॅनलवर "सखी-सह्याद्री" या कार्यक्रमात चर्चासत्र घेतले होते,त्यावेळी प्रा.दामोदर एक महत्वाची आठवण सांगतात की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शताब्दी वर्षांमध्ये डॉ.माईसाहेब आबेडकर यांची मुंबई दुरदर्शनला मुलाखत घेतली होती,आणि त्यानंतर प्रा.मोरे, माईसाहेबांसोबत उत्तर भारताच्या प्रवासासाठी गेले होते,त्यावेळी प्रवासादरम्यान बाबासाहेबांच्या आठवणी त्या सांगत होत्या.

अशीच एक आठवण सांगताना त्या म्हणाल्या की,भारताच्या पहिल्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होती,त्यावेळी नेहरु प्रधानमंत्री होणार होते,पण,स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती बाबासाहेबानी व्हावे अशी नेहरूंची इच्छा होती,आणि त्यामुळे नेहरूंनी बाबासाहेबांना फोन केला,त्यावेळी बाबासाहेब घरी नव्हते,नंतर नेहरूंनी घरी उमेदवारी अर्ज पाठवला,बाबासाहेब घरी आल्यानन्तर माईसाहेब म्हणाल्या की,तुम्ही तो नेहरूंनी पाठवलेला राष्ट्रपती पदाचा अर्ज भरून पाठवा,त्यावेळी बाबासाहेब काहीच म्हणाले नाहीत,शांत होते,पुन्हा नेहरूंचा फोन आला,तेव्हा माईसाहेबांनी,बाबासाहेबांना तो अर्ज भरून पाठविण्याची आठवण करून दिली,शांत असलेले बाबासाहेब अचानक उसडून उभे राहिले आणि म्हणाले *माझी लायकी पंतप्रधान होण्याची आहे मला स्टॅम्प व्हायचे नाही.*

बाबासाहेबांचा स्वतःच्या ज्ञाना विषयीचा आत्मविश्वास आपल्याला इथे दिसून येतो,

बाबासाहेब हे नाव इतकं जिवंत आहे की,एखादा प्रसंग लिहिताना,वाचताना किंवा सांगताना आपल्या समोर ते चित्र उभं राहतं, आणि आपण ही त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत असे वाटू लागतं, बाबासाहेबांचे जीवन संघर्षमय होतेच पण त्यापेक्षा बाबासाहेबानी आणि रमाईंनी समाजासाठी फक्त त्याग केला.त्या त्यागाची आठवण म्हणून दोन किस्से सांगतो. एक विनंती करतो,खालील दोन्ही प्रसंग वाचताना तुम्ही अगदी जवळ उभे राहून हे सगळं पाहताय,या घटनेचे तुम्ही ही साक्षीदार आहात या दृष्टीने वाचा,तर आणि तरच बाबांचा त्याग तुम्हाला लक्षात येईल.

बाबासाहेबांना गोलमेज परिषदेसाठी लंडनला जायचे होते, परंतु त्याच दिवशी त्यांचा मुलगा राजरत्न याचे निधन झाले, बाबासाहेबांचे मोठे बंधु बाबासाहेबांना म्हणाले,"भिवा,तू कोठे चालला आहेस? राजरत्न आता राहिला नाही. बाबासाहेब सुन्न झाले होते, रमाईची अवस्था ही रडून-रडून वाईट झाली होती, काहिक्षणात स्वतःला सावरून बाबासाहेब म्हणाले,"जर मी लंडनला पोहचलो नाही तर,करोडो अस्पृश्य जनतेच्या हक्कांची आणि अधिकारांची हत्या होईल"...मी एका मुलासाठी माझ्या करोडो मुलांना नाही मारू शकत" 
हा प्रसंग जेव्हा डोळ्यासमोर येतो,तेव्हा आपसूकच डोळे डबडबतात..

दुसरा प्रसंग असा की,बाबासाहेबानी ग्रंथासाठी राजगृह बांधले,पण ते बांधताना बाबासाहेबाना किती अडचणींना सामोरे जावे लागले याची आपल्याला कल्पनाही नसेल, राजगृह बांधताना त्या भवन निर्मात्या कारागिराला बाबासाहेबानी आधीच बजावले होते की,एकूण खर्च किती येईल ते आताच सांग,नंतर असे व्हायला नको की,जास्तीचे पैसे लागतील आणि ते माझ्याजवळ द्यायला नसतील,आणि घडलेही तसेच कारागिराने अतिरिक्त चाळीस हजार मागितले,पण बाबसाहेबांकडे त्याला द्यायला पैसे नव्हते,तेव्हा त्याने बाबासाहेबांना नोटीस पाठवली,ही आठवण सांगताना माईसाहेब म्हणतात की,आम्ही तळघरात बसलो होतो,तेव्हा मी बाबासाहेबांना विचारले की,हे चाळीस हजार फीटणार कसे? त्यावेळी बाबासाहेब ढसा-ढसा रडू लागले,त्यांना रडताना पाहून मी ही रडू लागली"

बाबासाहेबानी त्यावेळी समाजाकडे एक-एक रुपया जरी मागितला असता तर हे पैसे अगदी सहज फिटले असते,पण बाबासाहेबांचा तो स्वभाव नव्हता,आपल्या फाटलेल्या आयुष्याची भोकं शिवलेल्या,आपल्या आयुष्याचं सोनं केलेल्या आपल्या बापाला त्यावेळी असं रडावं लागलं हे लिहिताना डोळे ओले झालेत, त्यागाचे जिवंत उदाहरण म्हणजेच आपला बाप अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आपली आई रमाई...

*रमाई आणि बाबासाहेब.*(अंतिम क्षण)
रमाईचा ताप वाढला होता डॉक्टर निदान करत होते तपासणी आणि गोळ्या देऊन डॉक्टर निघाले तेवढ्यात मी उठलो त्यांची बॅग घेतली आणि विचारलं... डॉक्टर साहेब  बरी आहेना तब्येत आता रामूची डॉक्टरांनी दीर्घ श्वास घेतला. आणि म्हणाले आंबेडकर रमाबाई अर्धउपाशी राहायच्यात त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती नष्ट झाली आहे बऱ्याचदा आपण काही काम करतो थकवा आल्यानंतर भूक लागते आणि आपण शरीराला हवं तेवढं अन्न सेवन करतो, पण रमाबाईंनी कष्ट घेतले पण परिपूर्ण आहार घेतला नाही कदाचित यामुळेच त्या ह्या अवस्थेत आहेत काळजी घ्या.
डॉक्टर आले आणि निघून गेले पण विचारांचं चक्र सुरु झालं. एकामागे एक चार मूल गेली पण माझ्या शिक्षणावर कधीच परिणाम होऊ दिला नाही.
 खूप कष्ट घेतले पोटाला मारून पै पै जमवली माझ्या शिक्षणासाठी कसे फेडायचे तिचे उपकार काही कळत नाही.
खंत तर एकच आहे की तिला सुख देता नाही आलं.
मी रमा जवळ गेलो रमाचे डोळे डबडबले होते.
मी तिचा हातात हात घेतला आणि म्हटलं लवकर बरी हो तुला अजून चांगल्या दवाखान्यात न्यायचं आहे.
 रामू म्हणाली साहेब आता त्याची आवश्यकता नाही माझी जाण्याची वेळ आली.
साहेब मी अनेक मृत्यू पाहिले मला मृत्यूची भीती वाटत नाही.
 माझे आईवडील तुमचे आईवडील आणि आपले चार मुले बाहेर पाऊस सुरु होता भायखळाच्या बाजारात पाऊस सुरु झाला तेव्हा रमाचा हात माझ्या हातात होता आजही पाऊस सुरु आहे. 
तेव्हा पाऊस सुरु होता तेव्हा रमाने माझा हात घट्ट पकडला होता.आणि आज तोच हात थरथरत होता.जिथून तिच्या आणि माझ्या जगण्याचा प्रवास सुरु झाला त्याच एक एक चित्र डोळ्यासमोर येत होत.
चार मुलांना दिलेली माती कुटुंबाचा गाडा ओढताना तिची झालेली धावपळ.
मी कुठे ही गेलो तरी अगदी मानाने ओवळणीचे ताटं घेऊन ओवळणारी माझी रमा डोळ्यासमोर येत आहे. खूप आक्रोश करावा आणि ओरडाव की,रमा उठ अजून तुझ्या साहेबाला खूप जिंकायचं आणि अजून तुझी गरज आहे मला.
 उठ आणि हस एकदा पाठीवर हात ठेवून म्हण मला की साहेब मी सदैव तुमच्या पाठीशी आहे.
माझा एकदा सत्कार होता सत्कार सुरु होता पण माझी रामू मला नजरेस पडत नव्हती सत्कार समारंभ संपणार तेवढ्यात रामू दिसली आणि तिच्या अंगावर शाहू महाराजांनी मला भेट दिलेला फेटा दिसला माझी रमा तो फेटा नेसून आली होती. 
आणि तेव्हा कळालं मला की माझी रामू आतापर्यंत का दिसली नाही.
माझ्या रामुला एक चांगल लुगडं घालायला नव्हतं जेव्हा घरी गेलो तिने पाट टाकला त्यावर बसलो ती ओवाळत होती.
आणि मी तिच्या चेहऱ्यावरचा आंनद पाहत होतो.
खरंतर मी जे घडलो किंवा काही करू शकलो रामुमुळे. 
माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते थरथरत्या हाताने रमाने ते अश्रू पुसले आणि म्हणाली साहेब मी जेव्हा नसेल तेव्हा निराश होऊ नका,
आपला जो समाज आहे त्यांच्यासाठी खूप काही करा. कारण हा समाज आपल्या चार मुलाचं बलिदान कधी विसरणार नाही. 
रमा बोलत होती समाजाबद्दल तिच्या शब्दात तळमळ होती बोलता बोलता माझी रामू शांत झाली.
रामू रामू रामू रामू रामू,
 मी ढसाढसा रडू लागलो मी पोरका झालो माझं सर्वस्व मला सोडून गेल. 
साहेब थोडी विश्रांती घ्या अस म्हणणार तो आवाज कायम शांत झाला.
 मी डोक्याला हात लावला मी हरलो होतो,
 माझं जग पोरक झालं सगळं सुनेसुने वाटू लागलं. जीवनातील गोडी संपली होती कारण साहेब कधी रमाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
 तिला अग्नी देताना अंतःकरण जड झालं अजून, 
अन आतून आक्रोश होता रामू आणि रामू.
रामू गेली होती साहेबाला एकटं सोडून, 
कायमची दूर निघून..….....
         
     *हिंदू कोड बिल*
" बाबासाहेब दिल्लीवरून नेहरूंची तार आली आहे ते म्हणतायेत की,
हिंदू कोड बिल ला देशात सर्वत्र विरोध सुरू आहे.
त्यामुळे हे बिल संसदेत पारित होणार नाही.
" स्त्रियांच्या शैक्षणिक,घटस्फोट आणि पुनर्विवाह या मागण्यांना प्रचंड विरोध आहे.
" देशात जर स्त्रियांना हे हक्क जर यावेळी दिले तर देशात  असहिष्णुता जन्म घेईन आणि नव्या वादाला वाचा फुटेल. 
त्यामुळे देशात स्थेर्य राखण्यासाठी सदर बिल आम्ही रद्द करीत आहोत....
" तुमच्या स्त्रियांच्या उन्नतीच्या तळमळीला आम्ही समजू शकतो आमच्या या निर्णयाला तुम्ही ही समजून घ्या.....
"" बाबासाहेब रागावले,क्षणभर विचार केला.
" आणि ते नेहरूंना लिहतात...
स्त्रियांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळावे म्हणून हे बिल मी संसदेत मांडले होते परिणामी ते पारित न होता खारीज होत आहे याचे मला अतोनात दुःख होत आहे...
खरंतर स्त्रियांच्या प्रगतीसाठी मी मंत्रिमंडळात सहभागी झालो होतो... स्त्रियांना मूलभूत अधिकार देणे हाच माझा हेतू होता परिणामी तो जर सफल होत नसेल तर मी माझ्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा देत आहे तो स्वीकार करावा ...... कळावे....
देशातल्या बहुधा स्त्रियांना हे माहित नसेल की त्यांच्या अधिकारासाठी जे आज मिळत आहेत त्यासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारे प्रथम व्यक्ति हे बाबासाहेब होते......
ते स्वंतत्र भारतातील पाहिले कायदेमंत्री होते...
" पहिले राष्ट्रपती, पाहिले पंतप्रधान सगळं काही लक्षात असेल तर पहिल्या कायदेमंत्र्यांचे विस्मरण होणे दुःखदायक आहे........! 
नंतर हे बिल एकूण चार टप्यात पास करण्यात आले.
"वर्षानुवर्षे केवळ चूल आणि मूल यात बंदिस्त असणारी स्त्री मुक्त झाली........!! 

*बाबासाहेब आणि रमाई काही क्षण*
          अनेक प्रतिनिधिकडून बरीच पत्रे आली होती.. सगळ्या पत्रांना उत्तर देणे शक्य नव्हतं.. पण एखादं महत्वाचं पत्र सुटू नये म्हणून.. नजरेखालून काढत होतो हल्ली पुस्तकात मन रमत नाही हल्ली जेवायची इच्छा मरूनच गेली.. रामू अंथरुणावर खिळली होती तिचं शरीर क्षीण झालं होतं आणि तिच्या त्या आजारपणाने माझ्यावर खूप दडपण आहे...! मला अजून आठवतो तो भायखळाचा बाजारातील दिवस ज्या दिवशी रमा माझ्या आयुष्यात आली नुकतच  लग्न लागलं आणि पाऊस सुरु झाला रमा भिजली होती आणि मी ही एक टोपली डोक्यावर घेऊन आम्ही दोघे उभे होतो..! नऊ वर्षाची रमा माझ्याकडे बघत होती आणि मी तिच्याकडे.. संसार सुरु झाला आणि मग हळूहळू रमा मला कळत गेली माझी रामू म्हणजे रामू आयुष्याचं सोन केलं माझ्या मी परदेशात शिकायला गेलो सारा संसाराचा गाडा एकटीने ओढला आणि एवढं असून सुद्धा माझी रमा पैसे पाठवत राहिली.
माझ्या रामुन कधी आयुष्यभर मला दागदागिना मागितला नाही..! खूप नम्र स्वभाव तिचा साहेब साहेब म्हणून नेहमी माझ्याभोवती असायची माझी सावली..!
एकदा तर तिला ताप आला होता आणि मी विचारलं गोळी वगैरे घेतली का तर ती नाही म्हणाली बाहेर पाऊस सुरु होता आणि तिचा ताप वाढत चालला होता मी तसाच छत्री न घेता बाहेर पडलो मेडिकल वर आलो गोळी घेतली आणि रामुला म्हटलं ही गोळी घे रामू म्हणाली एवढ्या पावसात का गेले आजारी पडले तर मी नाही घेणार गोळी एवढ्या पावसात जाण्याची काही गरज नव्हती ती रुसली होती माझ्यावर मग मी तिला रागाने म्हटले गोळी घे आणि जर तू नाही घेतली तर मी कपडे बदलणार नाही रामू हसली आणि म्हणाली तुमच्या सोबत मला भांडताच येणार नाही तुम्ही खूप जिद्दी आहे...! 
जेव्हा इंदू गेली तेव्हा मी परदेशात होतो तिने मला पत्राने कळवलं पण आईला काय वेदना होतात हे तिच्याशिवाय कोण जाणनार...! रमा मला कायम स्फूर्ती देत आली साहेब तुम्ही शिका मोठे व्हा अन समाजाचं भलं करा..
मी त्यात लै खुश आहे... बाया म्हणतात मला तुझ्या गळ्यात सोन नाणं नाही पण एक सांगू साहेब तुम्हाला तुम्ही इतके शिकेल हायसा की मला लै अभिमान आहे तुमचा.. तिचे हे शब्द आठवले की काळीज भरून येते..! 
रामू आजारी असल्यापासून मी दर क्षणा क्षणाला तिची विचारपूस करत आहे तिला काही होणार तर नाहीना.. तिला जर काही झालं तर हा भीमा एकटा होईल नाही नाही ही कल्पना सहन होत नाही रामुला काही होणार नाही मी तिला अस एकटीला सोडून जाऊ देणार नाही..
ती वेडी मला सोडून जाऊ शकत नाही मला सोडून जाण्याअगोदर तिने विचार करावा... तिला माहित आहे मी तिच्याशिवाय अपूर्ण आहे रमा नसेल तर भीमाला काय अर्थ...! खरंच मी एकटा तर होणार नाही...! 
रामू ने खूप त्रास सहन केला मी तिची ओंजळ सुखाने भरणार आहे.. मी रामुच्या खोलीचा दरवाजा उघडला रामू हसली मी तिच्या जवळ जाऊन बसलो खाटेवर असलेली रामू मी तिचा हातात हात घेतला आणि त्या खाटेवर डोकं ठेवून रामुजवळ बसलो डोळे माझे भरून आले आहे आणि रामू माझ्याकडे बघून स्मितहास्य करत आहे...! 

*रमाई आणि बाबासाहेब.... परत एकदा*
                        
रमाबाई कंदीलाची वात कमी करत.. खोलीभर पसरलेला लख्ख प्रकाश मंद केला..आणि बाबासाहेबासमोरील पुस्तक उचलून घेतलं.. बाबासाहेब म्हणाले अरे रमा एक पान वाचू तर द्यायचं..! रमाबाई हसत म्हणाल्या झोपा आता थोडं शांत.. बाबासाहेबानी डोळ्यावरचा चष्मा काढत रमाबाईकड पाहिलं आणि म्हणाले रामू मलाही वाटत मी शांत झोपावं पण लहानपणी जातीमुळं वर्गात बसता नाही आलं.. वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं ग मला..! शाळेत त्या माठातील पाणी पिता आलं नाही केवळ जातीमुळं कधी बालमित्रांसोबत सहभोजन करता नाही आलं केवळ जातीमुळं.. आणि हो ह्या माझ्या साऱ्या समाजाचा आक्रोश त्यांच्यावर झालेले अमानुष अत्याचार मी डोळे बंद केले की, मला ऐकू येतात मला न्याय मागतात. तूच सांग अश्यावेळी मी शांत झोपू शकेन..
बाबासाहेंबांच्या शब्दात समाजाप्रती अतोनात प्रेम होत..
ते रमाबाईला दिसलं.. रमाबाईंनी परत खोलीत मंद केलेला कंदीलाचा प्रकाश लख्ख केला उचलले पुस्तक परत बाबासाहेबाना दिलं आणि वाचा म्हणाली..!! 
रमाबाई म्हणजे नुसता त्याग पोटची चार पोर नजरेसमोर मेली पण बाबासाहेंबाच्या अभ्यासावर कुठलाही परिणाम होऊ दिला उपाशी राहिली पण कधी त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ दिला नाही...! रमाबाईंनी दिलेले पुस्तक त्याची पाने वाचत असताना बाबसाहेबांच्या चेहऱ्यावर मंद स्मितहास्य आलं.. पुस्तक देऊन आणि कंदीलाचा प्रकाश लख्ख करून झोपी गेलेल्या रमाबाईंच्या त्या निरागस चेहऱ्याकडे बाबासाहेब पाहत होते आणि मग हळूच डोळे डबडबले आणि बाबासाहेब म्हणाले मनाशीच रामू तू सोबतीला आहे म्हणून कसलीही चिंता नाही मला...!! रमाबाईंच्या डोक्यावरून हात फिरवत बाबासाहेबानी रमाबाईंच्या अंगावरील पांघरून व्यवस्थित केलं..!! आणि कंदिलाच्या प्रकाशात हातात पुस्तक परत पुस्तक घेतलं..!! 
 "आणि ते विद्वान परत ते राहिलेलं पान वाचू लागले अन रमाई साहेबांकडे बघत थोडीशी हसली ...
आजच सुख "आई बाबा तुमच्या त्यागामुळे…......

*पुणे करार*
खरं तर स्वंतत्र मतदार संघ बाबासाहेबांची मागणी रास्त होती.
"गेल्या अनेक वर्षापासून इथला वंचित समाज हा राजकीय भूमिकेपासून वंचितच आहे.
त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी हक्काचा प्रतिनिधी हवा आणि असायलाच हवा त्याशिवाय गंत्यतर नाही.
गेल्या कित्येक वर्षापासून इथला शोषित पिढीत समाज लाचारीचे जीवन जगत आला आहे.
" त्यांच्या शैक्षणिक,राजकीय हक्कावर इथले " काही विखारी लोक फणा मांडून बसले आहेत....
आणि ढोंग करून डोळ्यात दोन सहानुभूतीचे अश्रू आणून कोरड्या आणि नाटकी मायेला मातृत्व लाभत नाही....
गांधी कितीही बोलत असले तरी ते अस्पृशांचे कैवारी नाहीत त्यांना अस्पृशांची राजकीय भूमिका नकोच आहे.
"पण हा खटाटोप अस्पृश्याना स्वंतत्र मतदार संघ मिळू नये म्हणून गांधीने जे आमरण उपोषण केले ते मात्र बाबासाहेबांना मान्य नव्हतं.....
गोलमेज परिषेदेच्या वेळेस  गांधीजींना भेटण्यासाठी बाबासाहेब गेले असताना गांधी हे गृहस्थ काहीच बोलले नाही त्यावेळी ते सूत विणत होते.
आणि म्हणाले तर एक मला अस्पृश्याना काही द्यायचे नाही... ही असूया का?
 पुणे कराराच्यावेळी महात्मा गांधींचे प्राण वाचविण्यासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले.. तेव्हा त्यातील एक गृहस्थ पुढे आले आणि बाबासाहेबाना म्हणाले की, आंबेडकर अहो बापूच्या प्राणापेक्षा काही मोठे नाही. अटी मान्य करून, करून टाका करार. तेव्हा बाबासाहेब म्हणाले मला फासावर चढवा पण माझ्या समाज हिताच्या आड जाऊ नका.  ज्यात माझ्या समाजाचे हित नसेल तो करार मी कधीच मान्य करून घेणार नाही. 
"मी माझं वैयक्तीक सुखाचा त्याग करू शकतो बापूसाठी.. ते महत्वाचे आहेत देशासाठी...
पण माझा समाज मला त्यांच्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे...बाबासाहेब म्हणाले......
" पण अखेर करार मान्य झाला,
अस्पृश्याना स्वंतत्र मतदार संघ न देता राखीव मतदार संघ देण्यात आला....
" त्यावेळी बाबासाहेबांनी कदाचित माघार घेतली नसती तर,
गांधींचे प्राण कधीच वाचले नसते.
" एक उरलेला पर्याय म्हणून बाबासाहेबांनी तो करार काही अटीसह मान्य केला...! 

*अर्थ प्रशासक बाबासाहेब*

मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी घेतल्यानंतर,बाबासाहेब अमेरिकेला गेले व कोलंबिया विद्यापीठातून १९१५ साली, एम.ए. ही पदवी मिळवली  व त्याच विद्यापीठातून १९१७ साली त्यांनी अर्थशास्त्रात पी.एच.डी. ही पदवी मिळवली,नंतर ते इंग्लंडला गेले तेथून बॅरिस्टर पदवी मिळवली. नंतर, लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स या जगविख्यात संस्थेतून त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स ही अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी मिळवली, त्यामुळे आपल्या देशात सर्वोत जास्त शिक्षित अर्थतज्ञ व अर्थप्रशासक जर कोणी असतील तर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरच, अमर्त्यसेन नाही..

*गांधी नेहरूंचा जीव वाचविणारे देशप्रेमी बाबासाहेब*

१९४२ ला गांधीजींनी चलेजाव आंदोलन सुरू केले होते,ही गोष्ट चर्चिलला समजली व त्याने भारतातील ब्रिटिश सरकारला व्हाइसरॉय कौन्सिल घेवुन एक ठराव पास करायला सांगितले, तो ठराव असा होता की,भारतातील पुढारी स्वातंत्र्याची मागणी करीत आहेत,ती देशद्रोहाची मागणी आहे,त्यामुळे अशा पुढार्यांना काळ्यापाण्याच्या शिक्षेसाठी पाठविले जाईल" या कौन्सिलचे बाबासाहेब आंबेडकर ही सदस्य होते,तसे त्यात अनेक ब्रिटिश व काही भारतीय असे सदस्य होते. बाबासाहेब या कौन्सिलमध्ये उपस्थित होते, त्यांनी या ठरावाला जोरदार विरोध केला,आणि म्हणाले की,ब्रिटन हा लोकशाहीवादी देश आहे आणि जर का तुम्ही हा ठराव पास कराल तर, ब्रिटनच्या लोकशाहीला लागलेला हा कलंक असेल,तरीही ब्रिटिश व्हाइसरॉय कौन्सिल ऐकत नव्हती, ठराव पास करीत होते, त्यावेळी बाबासाहेबानी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा त्या बैठकीत ठेवला.आता बाबासाहेबांचा राजीनामा म्हणजे कोणी ऐऱ्यागैरयाचा राजीनामा नव्हता, कारण या मंत्रिमंडळात बाबासाहेबांकडे १)मजुरमंत्री २) PWD ( पब्लिक वर्क डिपार्टमेंट) ३) वॉटर मॅनेजमेन्ट ४) ऊर्जा (पॉवर मॅनेजमेंट) ५) मिनरल्स मॅनेजमेंट ..इत्यादी खाती होती.त्यामुळे त्यावेळचे व्हाइसरॉय लिनलिथगो यांनी हा ठराव मागे घेतला.

जर हा ठराव पास झाला असता तर काय झालं असतं? याचा विचार बाबासाहेबांच्या देशभक्तीवर आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी बाबासाहेबानी काय केले? असे उपटसुंभ प्रश्न  विचारणार्यांनी जरूर करावा. हा ठराव पास झाला असता तर, नेहरू व गांधीना अंदमान मध्ये काळ्यापाण्याची शिक्षा झाली असती, आणि स्वातंत्र्य चळवळीतील या नेत्यांना जर शिक्षा झाली असती तर स्वातंत्र्यलढ्याचे काय झाले असते? याचा ही विचार करावा, शेवटी या दोन्ही नेत्यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेवर न पाठवता नेहरूंना नगरच्या तुरुंगात तर गांधींना येरवड्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले.

एकीकडे इंग्रजांशी सनदशीरपणे भांडून आपले हक्क घेणारे व दुसरीकडे आपल्या समाजबांधवांच्या उद्धारासाठी अहोरात्र झटणारे व स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचे प्राण वाचवून देशाच्या स्वातंत्र्याचा व ऐक्याचा विचार करणारे आपले बाबासाहेबच होते

*बाबासाहेब आणि गांधी गोलमेज परिषेद*
होय मी गांधी विरोधी आहे बाबासाहेबांचे उदगार
त्याला कारणही तसंच आहे. मी गांधींचा विरोध करतो ते माझ्या स्वार्थासाठी नाही.. गांधी विश्वासघातकी आहेत याचे माझ्याकडे पुष्कळ पुरावे आहेत.. गांधीना मी विश्वासघातकी का म्हणतो कारण राऊंड टेबल कॉन्फरणसाठी हिंदुस्थानातील दलितवर्गाचा प्रतिनिधी म्हणून इंग्लडला जाण्यापूर्वी मी गांधीना भेटलो होतो..
त्यावेळी गांधी म्हणाले मी अस्पृश्याना स्वतंत्र जागा देण्यास माझा विरोध आहे..
दुसऱ्या वर्तुळ परिषेदेला जेव्हा बाबासाहेब गेले तेव्हा सरोजिनी बाईंनी बाबासाहेबाना गांधीजीकडे नेले.. गांधीजींना अस्पृश्याचे म्हणणे समजून घ्यायचे होते..
रात्रीचे 10 वाजले होते.. बाबासाहेब पोहचले तेव्हा गांधी चरखा चालवत होते.. बाबासाहेब बोलत होते तेही दीड तासापासून तेवढ्या वेळेत गांधीजी एक शब्दही बोलले नाही. शेवटी त्यांचा चरखा थांबल्यावर बाबासाहेब उठले तेव्हा गांधी म्हणाले मी तुमचे बोलणे ऐकले आहे, मी जरूर विचार करेन.
पुढे बाबासाहेबाना निरोप आला की सर्व अल्पसंख्याक प्रतिनिधीला गांधीने बोलावले आहे आणि जेव्हा सगळे प्रतिनिधी गोळा झाले तेव्हा गांधीजी प्रत्येकाला विचारत होतो की कुणाला काय पाहिजे तेव्हा सगळ्यांनी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. बाबसाहेबांनीही आपल्या मागण्या मांडल्या..
तेव्हाही गांधी म्हणाले मी सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे पण मला अस्पृश्याना काही द्यायचे नाही..
जातीभेद करणारा महात्मा ठरू शकतो का? नेहमी अस्पृश्याबद्दल अन्याय करणारा गांधी राष्ट्रपिता कसा ठरू शकतो. 
      
*रामजी बाबा आणि बर्फी.....!!*
          
बाबांची तब्येत बरोबर नाही...! 
बातमी मिळताच मी बडोद्यावरून  निघालो.
डोक्यात विचारचक्र सुरू झालं....! 
आणि राहिलेत अनेक चित्र डोळ्यासमोर, 
एका ब्राम्हण शिक्षकाने मला संस्कृत शिकविण्यासाठी नकार दिला आणि ते त्वेषाने म्हणाले,
की तुझ्याकडून मला ती भाषा अपवित्र करायची नाही.
मी रडत रडत घरी आलो.
बाबा अंगणात होते मला रडण्याच कारण विचारलं..
मी उत्तर दिलं,
मला संस्कृत शिकविण्यासाठी शिक्षकांनी नकार  दिला...
पाठीवर हात ठेवत बाबा म्हणाले---
रडू नकोस भिवा...
तू वाघाचा पोरगा आहे.
डोळे पूस अगोदर..! 
तो पाठीवरचा प्रेमळ स्पर्श मला आजही आठवतो.
माझी जी जडणघडण जी झाली ती केवळ माझ्या वडिलांमुळे---
पुस्तके विकत घेण्यासाठी जेव्हा माझ्याकडे पैसे नसायचे आणि माझी ज्ञानाची भूक बघून माझे वडील---
माझ्या आईचे दागिने गहाण ठेवत असत आणि पैसे आले की सोडवून आणायचे---
माझे बाबा म्हणजे शिक्षणाचे पुरस्कर्ते होते..
आम्हाला संध्याकाळी कबिरांचे दोहे म्हटल्याशिवाय जेवायला मिळत नसे.
बाबांची शिकवण ती! 
रेल्वे स्थानकावर बर्फीची दुकान होती आणि मी बाबांना बर्फी आवडते म्हणून मी   स्टेशवर उतरलो आणि त्या 
घाईत माझी रेल्वे सुटली...! 
तेव्हा मला स्वतःचा खूप राग आला पण बाबांना बर्फी आवडते म्हणूनच उतरलो ना मी..--
रात्री खूप उशिरा गाडी लागली आणि जेव्हा घरी पोहचलो तेव्हा--
केवळ माझ्यासाठी श्वास थांबवून ठेवले होते..
मी पिशवीतली बर्फी काढली एक तुकडा मी चारत असताना आणि मृत्यूच्या दारात असताना मला बघून त्यांचे डोळे आंनदाश्रूने भरून आले....! 
हातात हात घेतला आणि मायेने हात फिरवत म्हणाले की 
भीमा मला आणि या समाजाला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत----
पूर्ण कर....!!
आणि एवढं बोलून माझे बाबा निघून गेले या जगातून कायमचे आणि माझ्यात राहिलेत---
त्यांची शिकवण त्यांची प्रेरणा, त्यांचं शिक्षणप्रेमी बनून अगदी कायमचे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा